नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

फळांचे शरीराला होणारे फायदे

फळे हि मानवी जीवनाला लाभलेले ‘वरदान’ आहे. ‘फलाहार’ हा उत्तम आहार आहे. निसर्ग फळांच्या माध्यमातून मानवी आरोग्याचे रक्षण करतो. फलाहाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपल्या आहारात योग्य ते बदल घडविण्याची जिद्द आपण सर्वांनी बाळगावी. […]

ऐन तारुण्यात हार्ट अटॅक येण्याची कारणे

बऱ्याच वेळेला पेपरचं पान उघडलं की कोणाच्या तरी अचानक मृत्यूची बातमी आपलं लक्ष वेधून घेते. इतक्या लहान वयात असं कसं झालं? नुकतंच लग्न झालं होतं. लहान मुलं देखील आहेत, आता त्यांचं कसं होणार? यासारख्या विचारांनी त्याच्या कुटुंबियांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात एक सहानुभूतीची भावना निर्माण होते. त्याच्या जागी आपणही असू शकतो या जाणिवेने एक थंड शिरशिरी डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला अक्षरशः थिजवून जाते. एखाद्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर घरी परत येऊ का? असा अपशकुनी विचारही मनात येऊन जातो. नेमका काय हा प्रकार आहे? […]

या मार्गाने थकवा दूर करा

सततचे काम, शरीराला विश्रांती न दिल्याने खूप थकवा आणि अशक्तपणा येतो. अशावेळी काम करायचे ठरवले तरी शरीर मात्र साथ देत नाही. या थकव्याला दूर करण्याचे उपाय हे आपल्याच हातात आहेत हे आपण काय लक्षात ठेवले पाहिजे. […]

ऑफिसमध्ये सतत झोप येते का? ‘ही’ असू शकतात कारणं!

आजकाल आपण आपल्या आजूबाजूला हेच पाहत आहोत की रोज सकाळी तयारी करून घाईगडबडीमध्ये आज लाखो लोकं ऑफिसला जात आहेत. पण ऑफिसमध्ये जाईपर्यंत सर्व ठीक असते पण ऑफिसमध्ये  गेल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांना झोप येते किंवा थकवा जाणवू लागतो. समोर कामाचे कितीही मोठे टार्गेट असले तरीही झोप काही केल्या आवरता येत नाही. पण तुमच्या माहितीसाठी म्हणून एक लक्षात ठेवा की असं कधीतरी झालं तर त्यामागे छोटेसे सामान्य कारण असू शकते. पण जर असं वारंवार होत असेल तर मात्र त्या गोष्टीकडे आपण तात्काळ लक्ष दिले पाहिजे आणि त्याची कारणं जाणून घेतली पाहिजेत, तर आज आपण जाणून घेऊयात यामागच्या काही कारणांबाबत….. […]

दोरीवरच्या उड्या एक उत्तम व्यायाम प्रकार

लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा नक्कीच मारल्या असतील, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही आपण लावल्या असतील. परंतु मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम, पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, ह्याचे उत्तर होय आहे. […]

कार्डिअॅक कॅथेटरायझेशन – डॉ. वेर्नर फोर्समान

कार्डिअॅक कॅथेटरचा मानवी शरिरावर वापर करण्‍याचे श्रेय डॉ. वेर्नर फोर्समान या जर्मन डॉक्‍टरला जाते. डॉ. फोर्समान यांनी प्रथम मानवी शरिरावर कार्डिअॅक कॅथेटर वापरून पाहिला इतकेच नव्‍हे तर एक्‍स-रे मशीन वापरून त्‍याची प्रतिमाही तयार केली. डॉ. फोर्समान यांची ही कहाणी केवळ रोचकच नव्‍हे तर एखाद्या रहस्‍यकथेप्रमाणे रोमहर्षक आहे. […]

निष्‍णात शल्‍यचिकित्‍सक डॉ. व्हिविअन थॉमस

डॉ. ब्‍लॅलॉक यांच्‍या जगप्रसिद्ध ‘ब्‍लॅलॉक-टॉऊसिग-थॉमस’ ही उपचारप्रणाली विकसित करण्‍यात ज्‍यांचे मोलाचे योगदान आहे ते व्हिविअन थॉमस! थॉमस, डॉ. ब्‍लॅलॉक यांचे शल्‍यचिकित्‍सेदरम्‍यान सहायक होते. चौतीस वर्ष डॉ. ब्‍लॅलॉक व थॉमस यांनी एकत्र काम केले. डॉ. ब्‍लॅलॉक यांच्‍या कित्‍येक संशोधनांचा पाया थॉमस यांनीच रचला होता. थॉमस कृष्‍णवर्णी-आफ्रिकन वंशाचे होते. त्‍यामुळे त्‍यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागत असे. ब्‍लॅलॉक यांच्‍याइतकेच […]

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्‍या पहिल्‍या महिला अध्‍यक्ष डॉ. हेलन टाऊसिग

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्‍या पहिल्‍या महिला अध्‍यक्ष डॉ. हेलन टाऊसिग या बालहृदयरोजतज्‍ज्ञ म्‍हणून प्रसिद्ध होत्‍या. जन्‍मतःच हृदयात दोष असणार्‍या बालकांवर हृदयशस्‍त्रक्रिया करून त्‍यांचे आयुष्‍यमान उंचावणारी शल्‍यचिकित्‍साडॉ. ब्‍लॅलॉक यांनी प्रथमतः यशस्‍वी केली व त्‍यानंतर त्‍यांचे नाव सर्वतोमुखी झाले. […]

फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राखायचंय ?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) म्हणजेच डब्ल्यू.एच.ओ. नुसार, दरवर्षी जवळपास 3 लाख लोकं श्वसनासंबंधी आजारांनी पीडित होतात , ह्याचे मूळ कारण दूषित हवा आणि धकाधकीचा दिनक्रम असून, असा दिनक्रम तुमच्या फुफ्फुसांना नुकसान पोहोचवत राहतो. त्यामुळे तुम्हाला कालांतराने श्वास घेण्यास त्रास होऊन श्वसनासंदर्भातील विकारही होऊ शकतात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार , योग्य आहार आणि जीवनशैलीमुळे तुम्हाला फुफ्फुसांचं आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते. […]

1 … 37 38 39 40 41 … 163
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..