नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

आहारातील बदल भाग ५६ – चवदार आहार -भाग १८

नेहमीच्या वापरातील मसाल्याच्या तिखट पदार्थांच्या यादीतील एक प्रमुख औषधी घटक म्हणजे मिरी. जिथे मिरची वापरता येणार नाही, अशा ठिकाणी मिरी वापरावी, एवढी तिखट. हिच्या तिखटपणापेक्षा भगभगीतपणा लक्षात रहातो. तोंडाची, जीभेची हायहुय करत, सर्वांना हाऽय् हाऽय् म्हणायला लावणारी, डोळ्यातून पाणी वाहायला भाग पाडणारी ही काळी मिरी आता जगप्रसिद्ध झाली आहे. सूप असो वा सॅलेड, मिरीशिवाय चवच नाही. […]

काही आयुर्वेदिक उपाय काळ्या केसांसाठी

घनदाट काळ्या केसांसाठी केसांच्या मुळांना मिळणारे पोषण हेच काळ्या, दाट आणि लांबसडक केसांचे रहस्य आहे. योग्य आयुर्वेदिक उपायांनी केस केवळ काळेच होतात असे नव्हे, तर त्या केसांवर एक नैसर्गिक चमकही दिसून येते. केस काळे करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. कलर, डाय किंवा शाम्पूने केसांना पोषण मिळत नाही. आयुर्वेदिक जडी-बुटींनी केस धुतल्याने तसेच आयुर्वेदिक तेल […]

वजन कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक टिप्स

आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं “परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात”. आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी […]

आपले आरोग्य व आयुर्वेद

तरुण पिढी आपल्या प्रकृतिस्वास्थ्याविषयी पूर्वीच्या पिढीपेक्षाही चांगलीच सजग झालेली दिसते. विविध वर्तमानपत्रं, मासिकं, पुरवण्यांद्वारे अनेक तज्ज्ञ, व्हॉट्सअप, फेसबुक, या सारखी सोशल मिडीया साधने, डॉक्टर, वैद्य, डाएटिशियन्स लोकांना जागरूक करत असतात. आयुर्वेद या उपचारपद्धतीत मानवी शरीर आणि त्याचा मानसिक स्वास्थ्याशी असलेला दृढ संबंध यांचा विचार करतं आणि प्राथमिकतेने रोग होऊच नयेत यावर भर दिला जातो. त्यातूनही जर […]

आहारातील बदल भाग ५६ – चवदार आहार -भाग १७

  तिखट पदार्थात सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मिरची. कोशिंबीरी लोणच्या पासून ते सर्व भाज्या आणि फक्त मिरचीच्या ठेच्यापर्यत आपला ठसका दाखवणारी ही मिरची, तिखट पदार्थात आपले स्थान अबाधित राखून आहे. अति सर्वत्र वर्ज्ययेत, या न्यायाने प्रदेश विचार करून, मिरचीचा वापर युक्तीने करावा. काही जण मिरच्या चराचरा चावून खातात, त्यांना भविष्यात काही गंभीर आजारांना सामोरे […]

आहारातील बदल भाग ५५ – चवदार आहार – भाग १६

पानाची जवळपास अर्धी बाजू या तिखट पदार्थांनी व्यापलेली असते. सुरवात गोड पदार्थांने करावी, नंतर आंबट तिखट. चवी चवीनं जेवावं. पूर्ण आस्वाद घेत जेवावं. एका पदार्थाचा ओघळ दुसऱ्या पदार्थात जावून, दोन्ही पदार्थांचा स्वाद बिघडू नये, यासाठी पानात द्रोण किंवा वाट्या असतात. केळीच्या पानापासून हे द्रोण बनवले जायचे. त्याचा तळ हा डुगडुगणारा असे, किंवा आमटी, भाजी वाढेपर्यंत हाताने […]

आहारातील बदल भाग ५४ – चवदार आहार -भाग १५

  रस्साभाजी मधे रस्सा महत्वाचा ! ग्रेव्ही महत्वाची. त्यातले पदार्थ बदलले की परिणाम बदलणार . जसं कोणत्याही भाजीतले पाणी हे वात वाढवणारे असते. पण पाण्याशिवाय, केवळ परतून किंवा वाफेवर, ज्या भाज्या बनवल्या जातात, त्या वात वाढवत नाहीत. पण पाणी घालून शिजवलेल्या भाज्या वात वाढवतात. जसं बटाटा हा वात वाढवतो. म्हणजे बटाटावडा करताना बटाटा जसा शिजवला जातो […]

आपले शरीर व बांधा

मूल जन्माला येते, ते नैसर्गिकरित्या सुडौल व बांधेसूदच असते. त्यानंतर वाढीच्या वयात आहार व व्यायाम जसा असेल त्याप्रमाणे शरीराचे आकारमान, वजन बदलत जाते. नैसर्गिकरित्या असलेला बांधा/चण मात्र तसाच राहतो. उदाहरणार्थ, व्यक्ती बारीक, मध्यम किंवा रुंद चणीच्या असू शकतात. ज्या व्यक्ती मुळातच बारीक चणीच्या आहेत, त्यांनी कितीही आहार व व्यायाम केला तरी मूळची चण बदलत नाही. त्यावर […]

आहारातील बदल भाग ५३ – चवदार आहार -भाग १४

तिखट झणझणीत असणाऱ्या, लालबुंद दिसणाऱ्या, कट तरंगणाऱ्या, रसभाज्या हे भारतीय आहाराचे वैशिष्ट्य आहे. अन्य पाश्चात्य देशात एवढे तिखट खाल्ले जात नाही. भाजी खाल्ली की पाची बोटांना सचैल अभ्यंगस्नान झाल्याशिवाय एकही बोट बाहेर येणार नाही. एवढे तिखट कसे काय चालते ? हीच प्रकृती आहे, प्रदेश विचार आहे, हेच आहाराचे रहस्य आहे. या तिखटाचे सर्व अॅण्टिडोटस् याच आहारात […]

1 127 128 129 130 131 163
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..