नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

प्रमुख आहार सूत्र – भाग ४

दुधाचा जो उल्लेख या सूत्रात केलाय, ते नक्की देशी गाईचेच आहे का ? अशी विचारणा काल काही गोप्रेमींनी, काही राजीव दीक्षितजीच्या अनुयायांनी केली. मला कोणाच्याही व्यक्ती भावना दुखवायच्या नाहीयेत, पण जे चुकतंय त्याची दुरूस्ती केल्याशिवाय पूर्ण आरोग्याची प्राप्ती होणार नाही, हे लक्षात घ्यावे. काय झालंय, ज्याला त्याला प्रत्येकाला आपण सांगतोय तेच बरोबर असे वाटतेय. आणि मूळ […]

‘इंटिग्रेटेड’ मेडिकल प्रॅक्टिस

आयुर्वेदाच्या क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध असलेला शब्द म्हणजे ‘इंटिग्रेटेड प्रॅक्टिस’. शब्दकोषानुसार या शब्दाचा अर्थ एकात्मिक असा असला तरी आयुर्वेदात मात्र हा शब्द वेगळ्या अर्थाने पाहिला जातो. इंटिग्रेटेड म्हणजे आयुर्वेदाची पदवी घेऊन आधुनिक शास्त्राचे उपचार देणे वा त्यांची सरमिसळ करणे. आयुर्वेदाची विद्यमान शिक्षणपद्धती आणि धोरणे ठरवणाऱ्या शीर्ष परिषदेची उदासिनता यामुळे सध्याचा आयुर्वेदाचा विद्यार्थी ग्रंथांपासून दूर आणि औषधी विक्रेत्यांच्या […]

जांभई येणे

दररोजच्या जीवनात आपण ‘जांभई’ देतांना इतरांना पाहतो. तसेच ‘जांभई’चा अनुभव आपण स्वत:ही घेतलेला आहेच म्हणा. ‘जांभई’ येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. झोपी जाण्यापूर्वी अथवा झोपेतून उठल्या- उठल्या आपण तोंड व शरीर वेडेवाकडे करून जांभई देतो. एखाद्या वेळी अधिक थकतो. तेव्हा आपल्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. तेव्हा या प्राणवायूची कमी ही ‘जांभई’ भरून काढत असते, असे […]

प्रमुख आहार सूत्र – भाग ३

मधुमेह होऊ नये म्हणून एक सूत्र चरकाचार्यांनी वर्णन केले आहे. आस्यासुखं स्वप्नसुखम् दधिनी ग्राम्यौदकः पयांसि नवान्नपानं गुडवैकृतंच प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम ! हे सूत्र मधुमेह होऊ नये म्हणून काय काय करू नये याविषयी माहिती सांगणारे आहे. काय आश्चर्य किंवा एकरूपता आहे पहा. हे सर्व ऋषी एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी ‘काय करू नये’ ते पहिल्यांदा सांगताना दिसतात. मनाचे […]

नाश्त्याला खायचे तरी काय?

“तुम्ही वैद्य लोक ब्रेड बटर खाऊ नका,आंबवलेला डोसा इडली खाऊ नका म्हणतात.अहो मग नाश्त्याला खायचे तरी काय आम्ही ?’”असे डोळे मोठे आणि चेहरा एवढासा करून निरागस जाब विचारणाऱ्या माझ्या समस्त पेशंट वर्ग/मित्रमैत्रिणी/नातेवाईकांना हि पोस्ट समर्पित आहे.अगदी महिनाभर नाश्त्याला पुरतील एवढे म्हणजे २९ पथ्य पदार्थांची यादी देत आहे.महिना तर ३०/३१ दिवसांचा मग एक दोन पदार्थ कमी का […]

सूर्याला ‘अर्घ्य’ का वाहतात……

शास्त्रात संध्या करताना सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व विशद केले आहे. हाताच्या ओंजळीत पाणी (जल) घेऊन सूर्यासमोर तोंड करून सूर्यास जल समर्पित केले जाते. त्यालाच ‘अर्घ्य’ म्हटले जाते. वेदांमध्ये सूर्यास डोळ्याची उपमा दिली गेली आहे. सूर्यात सप्तरंगी किरणे असतात. या सप्तरंगी किरणांचे प्रतिबिंब ज्या रंगात पडते तेथून ती किरणे परत येतात. केवळ काळा रंगच असा रंग आहे […]

गुण सांगता.. दोषांचे काय?

ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही. सफरचंदाने होणारा मलावरोध आणि मलावरोधजन्य विकृती, शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतडय़ाची पुर:सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फायटिक अ‍‍ॅसिडमुळे आतडय़ांमधून कॅल्शिअम, जस्त […]

झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?

झोप (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का ? असे ऐकीवात आहे की “लवकर नीजे  लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे “हे किती खरे आहे ? ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही चालणार का ? चला पाहूया…. खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील […]

फुडग्रेड प्लॅस्टीकच्या टेस्टला निकष आहेत का?

ज्याला फुडग्रेड प्लॅस्टीक म्हणतात त्याच्या टेस्ट्स कुठल्या निकशावर केल्या जातात? 50 वर्षे असे प्लॅस्टिक वापरल्यास पुढच्या पिढ्यांवर कांय परिणाम होतील याची टेस्ट कशी करणार?Aging Effect Test ही जनरलाइज संख्याशास्त्रावर प्रयोग शाळेत केली जाते. एकच आजार असलेल्या २०० रोग्यांना एकाच औषधाची एकच मात्रा चालु शकत नाही. प्रत्येकाच्या रंघ्रा रंघ्राला particular वागण्याची व रिझल्ट देण्याची सवय (खोड) असते. […]

सौंदर्य प्रसाधने आणि आरोग्य

फॅशनची व्याख्या बदलू शकते पण आरोग्याची व्याख्या मात्र बदलत नसते. बदलून चालतही नाही श्रीमती पिंटो नावाच्या एक महिला एक दिवस माझ्याकडे आल्या. त्यांची तक्रार जरा वेगळीच आणि काहीशी गमतीशीर होती !श्रीमती पिंटोच्या चेहऱ्यावर गेली दोन वर्षे पुटकुळ्या उठत होत्या पण पुटकुळ्यांची पद्धत अशी की त्या शनिवार-रविवारी अगदी फुलून येत आणि नंतर आपोआप हळूहळू मावळून जात ! […]

1 100 101 102 103 104 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..