भूगोल दिन
२२ डिसेंबर पासून सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यामुळे हवामानातल्या संक्रमणाच्या बदलाचा प्रत्यक्ष अनुभव यायला १४ जानेवारीपासूनच आपल्याकडे सुरवात होते. म्हणूनही १४ जानेवारी या दिवसाला विशेष भौगोलिक महत्त्व आहे. याच दोन्ही गोष्टी मनात ठेवून ज्येष्ठ भूगोलतज्ञ डॉ. सुरेश गरसोळे यांनी राज्यात ‘भूगोल दिन’ साजरा करण्याची प्रथा १४ जानेवारी १९८८ पासून सुरू केली. […]
