नवीन लेखन...

जागतिक महिला दिन

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. […]

दैनिक नवाकाळचा स्थापना दिवस

नाट्याचार्य खाडिलकर यांनी ७ मार्च १९२३ रोजी दैनिक ‘नवाकाळ’ ची स्थापना केली. त्यांनी ‘नवाकाळ’ धडाडीने यशस्वी केला. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर नवाकाळमधील अग्रलेख आणि टिका टिप्पणी याबद्दल राजद्रोहाचा खटला ९ फेब्रुवारी १९२९ रोजी भरला. २७ मार्च रोजी त्यांना एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची सजा झाली. पण तो ब्रिटिशांचा तुरुंग होता. त्यांनी जातानाच मनोमन ठरविले आणि त्यानुसार ‘नवाकाळ’ चे संपादकपद सोडले. […]

सुनील गावसकर यांच्या कसोटी कारकिर्दीची ५१ वर्षे

६ मार्च १९७१ रोजी सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करून आपली कसोटी कारकीर्द सुरू केली होती. त्या वेळी ते भारतीय संघात एक सर्वात लहान वयाचे खेळाडू होते. ज्याने आंतरशालेय, विद्यापीठ, रणजी अशा विविध स्तरांवरील क्रिकेट सामन्यांमध्ये धावांचे डोंगर रचले होते-त्या वेळी गावसकर विंडिजच्या तोफखान्यासारख्या भासणार्याा, अक्षरश: आग ओकणार्यार गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत असताना या मालिकेतील त्या खेळाडूचा खेळ क्रिकेट रसिकांना थक्क करून सोडणारा होता. संपूर्ण मालिकेत १ द्विशतक आणि ३ शतके यांच्या साहाय्याने १५४.८० च्या सरासरीने एकूण ७७४ धावांचा पर्वत या खेळाडूने रचला. […]

साने गुरुजी यांचा ‘श्यामची आई’ चित्रपट

श्यामची आई हा चित्रपट मराठीतच नव्हे तर अमराठी रसिकांमध्ये इतका लोकप्रिय आहे की, गेल्या वर्षी मदर्स डे ला आंध्र प्रदेशातील आंध्र ज्योती या वर्तमानपत्राने याचे तेलगु व इंग्रजी सबटायटल करून हा चित्रपट आंध्र प्रदेश येथे सर्वत्र झळकावला. तर पंजाब येथील प्रीती लाहिरी या मासिकेच्या संपादिका पूनम सिंघ यांनीही हा चित्रपट भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या पंजाबच्या खेडय़ांमध्ये झळकावला. […]

जागतिक वन्यजीव दिवस

नामशेष होण्याचा धोका असलेल्या वन्य सृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा (CITES) ३ मार्च १९७३ रोजी १८० देशांनी मान्य केला म्हणून या दिवसाला महत्व आहे. […]

बॉम्बे टू गोवा चित्रपट

पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं जाणार गाणं म्हणजे ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील ‘देखा ना हाय रे सोचा ना हाय रे’ हे गाणं. १९७२ साली मेहमुद यांनी त्याचा भाऊ अनवर अली व अमिताभ बच्चन यांच्या साठी एस. रामनाथन यांच्या निर्देशनाखाली यांच्यासाठी नितांत सुन्दर कॉमेडी बॉम्बे टू गोवा हा सिनेमा कढला होता. […]

जागतिक श्रवण दिन

कर्णबधीरता व श्रवणशक्तीचे नुकसान टाळण्यासाठी तसेच श्रवणशक्तीचा काळजी घेण्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठीच तीन मार्च हा दिवस जागतिक स्तरावर श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. […]

शालिवाहन शक संवताची सूरवात

हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. […]

जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा वर्धापनदिन

कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांची जे. जे. मधील प्राचार्य-संचालक पदाची कारकीर्द (१९१९-३६) विशेष संस्मरणीय ठरली. त्यांच्या काळात जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या व त्यामुळे या कलाशाळेचे नाव भारतभर गाजू लागले. १९२० च्या दरम्यान चौथ्या वर्षाच्या विदयार्थ्यांसाठी सॉलोमन यांनी प्रत्यक्ष नग्न व्यक्तिप्रतिमानावरून (न्यूड मॉडेल) अभ्यास करण्यासाठी ‘न्यूड लाइफ-क्लास’ सुरू केला. त्यामुळे विदयार्थ्यांस शरीरशास्त्राचा प्रत्यक्ष मानवी शरीरावरून अभ्यास करण्याची संधी मिळाली. नग्न व्यक्तिप्रतिमान व त्याच्या अभ्यासामुळे प्राप्त झालेल्या अभ्यासाला दिशा व उत्तेजन देण्यासाठी सॉलोमन यांनी भित्तिचित्र-सजावटीचा (म्यूरल डेकोरेशन) वर्ग सुरू केला (१९२०). […]

महाशिवरात्री विशेष

आज भारत देशामध्ये सर्वत्र ‘महाशिवरात्री’ हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जात आहे. शिव मंदिरामध्ये बेल पत्र, धोतऱ्याचे फूल, दूध.. घेऊन रांगेत उभे राहून दर्शनाची वाट बघणारे भक्त दिसत आहेत. व्रत, उपवास करून ईश्वराकडे मनोमन आपली इच्छा पूर्ण व्हावी अशी याचना सर्व करतात. पण ज्याची मनोभावे पूजा केली जात आहे त्या ईश्वराची खरी ओळख तसेच मंदिरातली अनेक प्रतीकात्मक रुपकांची ओळख आज आपण करून घेऊ या. […]

1 20 21 22 23 24 73
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..