नवीन लेखन...

सुनील गावसकर यांच्या कसोटी कारकिर्दीची ५१ वर्षे

सुनील मनोहर गावसकर. क्रिकेटच्या इतिहासात कधीही न पुसले जाणारे नाव. विक्रमादित्य हे बिरूद त्यांना सार्थ ठरू शकेल.गेल्या पाच दशकात क्रिकेटमधील विविध भूमिका बजाविणारे ‘लिटिल मास्टर’ या खेळाशी इमान राखून आहेत.

६ मार्च १९७१ रोजी सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करून आपली कसोटी कारकीर्द सुरू केली होती. त्या वेळी ते भारतीय संघात एक सर्वात लहान वयाचे खेळाडू होते. ज्याने आंतरशालेय, विद्यापीठ, रणजी अशा विविध स्तरांवरील क्रिकेट सामन्यांमध्ये धावांचे डोंगर रचले होते-त्या वेळी गावसकर विंडिजच्या तोफखान्यासारख्या भासणार्याा, अक्षरश: आग ओकणार्यार गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत असताना या मालिकेतील त्या खेळाडूचा खेळ क्रिकेट रसिकांना थक्क करून सोडणारा होता. संपूर्ण मालिकेत १ द्विशतक आणि ३ शतके यांच्या साहाय्याने १५४.८० च्या सरासरीने एकूण ७७४ धावांचा पर्वत या खेळाडूने रचला. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्या भूमीत सामना जिंकला, मालिकाही (१-०) जिंकली. पुढे जाऊन याच क्रिकेटपटूने क्रिकेटच्या इतिहासात आपले एक वेगळे, उच्चतम स्थान निर्माण केले. सुनील गावस्कर यांनी कसोटीत १० हजारापेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. हा टप्पा ओलांडणारे ते पहिले खेळाडू.

त्यांची बॅट निवृत्तीपर्यंत तळपत राहिली. १९८३ मध्ये त्यांनी डोनाल्ड ब्रॅडमन यांचा सर्वाधिक कसोटी शतकांचा (२९ शतके) हा विक्रम मोडला. गावसकर यांनी कारकिर्दीत ३५ कसोटी शतके ठोकली. त्यांचा हा विक्रम २००५ पर्यंत अबाधित होता. नंतर मास्टर ब्लास्टर सचिन ‍तेंडूलकरने तो मोडला. सलग तीन डावात शतक काढण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. (२००६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंगने या विक्रमाशी बरोबरी केली.) गावसकर ७० ते ८० या दशकात बराच काळ भारतीय संघाचे कर्णधारही होते. भारताला १९८३ सालचा विश्वकरंडक जिंकून देण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. फलंदाजीबरोबर गावसकर उत्तम क्षेत्ररक्षकही होते. यष्टीरक्षक सोडून कसोटीत १०० हून जास्त झेल घेण्याचा पहिला भारतीय होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.

गावसकर आक्रमक फलंदाज नसले तरी त्याचे फटके मारण्याचे तंत्र विशेष होते. लेट फ्लिकचे ते बादशहा होते. खर्या अर्थाने ते कसोटी क्रिकेटचे खेळाडू होते. त्यामुळे एकदिवसीय सामन्यात त्यांना पहिले शतक काढण्यासाठी १९८७ साल उजाडावे लागले.

कसोटीतील त्याच्या अव्दितीय कामगिरीमुळे १९८० मध्ये त्यांना व्हिस्डेन या क्रिकेटमधील प्रसिद्ध मासिकातर्फे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. त्यांच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन गौरव केला आहे.

निवृत्तीनंतर त्यांनी सनी डेज, रन्स अन रूइन्स व वन डे वंडर ही तीन पुस्तकेही लिहिली आहेत. सध्या ते एक प्रसिध्द समालोचक व स्तंभलेखक आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..