नवीन लेखन...

दिवसभरात आपल्या मनात येणारे अनेक विचार.. त्या विचारांना कागदावर.. नव्हे.. संगणकाच्या पडद्यावर उमटवणारे हे सदर

जाणिव हिशोबाची

गोष्ट १५ वर्षांपूर्वीची असेन कदाचित पण वार शुक्रवार होता हे नक्की. नांदेडला दर शुक्रवारी ज्योती टॉकीज जवळ बाजार भरतो. आठवडी बाजाराची ओढ प्रत्येक शेतकऱ्याला तेवढीच असते जेवढी नोकरमान्याला महिन्याच्या पगारीची !. मी आणि माझ्या मोठ्या भावाने ४ दिवसापासूनच शुक्रवारच्या बाजाराची प्लांनिंग सुरु केली होती. प्लॅन असा होता – ” गुरुवारी संध्याकाळीच भोपळे तोडून दोन पोती भरून […]

सोशल मिडीया आणि त्यावर व्यक्त होणं-एक तारतम्य..

मी सोशल मिडीयावर लिहितो. खूप लिहितो. बऱ्याचदा वैचारीक, जड असं काहीतरी लिहीतो. सहज मनात आलेले विचार असतात ते. हे असं का आणि ते तसंच का, असे खुप विचार माझ्या मनात सतत पिंगा घालून मला छळत असतात. हे कुणाकडे व्यक्त करावेत, तर ते ऐकून घ्यायला कुणाकडे वेळच नाही आणि पुन्हा या विचारांचा तसा काही उपयोगही नाही (असं […]

सत्य; मरण आणि शेवट

सत्याला मरण नाही, सत्य हे शवटी उजेडात येते ही वाक्य किती सहजतेने आपण उच्चारतो. आणि कोणत्याही गोष्टीत सहजता आली की त्यातील गांभिर्य निघून जाते. सत्याचं तसंच झालंय असं मला वाटतं. सत्य हे सत्य असतं आणि सत्य बोलणं नेहेमीच चांगलं असतं असं म्हणून आपण सर्वच दररोज धडधडीत असत्याची काय धरत असतो, ते त्यातील गांभिर्य गेल्यामुळेच. गांधीजींची तसबिर […]

जीवन

जीवन हे निर्सगाने दिलेली एक सुंदर देणगी आहे. मानवाची निर्मिती हा एक अदभूत  चमत्कार आहे. या जगात प्रत्येक मनुष्य हा खास व महत्वपूर्ण आहे व प्रत्येकाला आनंदाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकाराला कोणीही त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. निसर्गाने मानवाची निर्मिती केली व त्याचा पालनकर्ताही निसर्गच आहे. निसर्गाने मानवाला भरपूर काही दिलं व तो निसर्गाचं देणं […]

स्वभावाचं परावर्तन

‘डिस्कव्हरी चॅनल’वर मागे एकदा एक फिल्म पाहिली होती. एक वाघीण एका हरणाच्या पाडसाचा जीवावर उदार होऊन सांभाळ करते असं त्या एक तासाच्या फिल्ममधे दाखवलं बोतं काळजाला भिडणारंच होतं ते त्या वाघीणीचं वागणं. आहार, निद्रा, भय आणि मेथून येवढ्याच जाणीवा असलेला वाघासारख्या हिंस्त्र पशूतील ‘प्रेम’ जागृत होत असेल चर एक प्राणीच असलेला माणूस त्याला अपवाद कसा असेल? […]

काचेची घरं

‘काचेची घरं’ हे या लेखाचं शीर्षक असलं तरी ‘घर’ म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर जे चटकन चित्रातलं वा प्रत्याक्षातलं घर येतं, त्याबद्दल मला काही लिहायचं नाही. मला मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांत अलिकडे ज्या काचेच्या तावदानांच्या भल्या मोठ्या इमारती उभ्या राहील्या आहेत व अजूनही उभ्या राहात आहेत, त्यावर मला काय वाटतं ते तुम्हाला सांगायचंय. मोठ्याल्या, आकाशाला स्पर्शायला निघालेल्या या इमारती […]

बुके; की बुक?

हल्ली कार्यक्रम कोणताही असो, फुलांचा गुच्छ उर्फ ‘बुके’ देण्याची प्रथा चांगलीच रुजलीय. ही प्रथा एवढी रूजलीय, की एकदा भोईवाडा स्मशानात एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या प्रेतावर एकाला बुके ठेवताना पाहीलं. “अरे हे काय?” म्हणालो, तर म्हणे “हार संपले होते म्हणून बुके आणला. हारातही फुलं आणि बुकेतही फुलंच, काय फरक पडतो?” हे ही वर सांगत होता. लाॅजिक तर बरोबर […]

ते तर हिन्दू होते..!

नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्र दिना’बद्दल काहीतरी लिहावं म्हणून लिहायला बसलो होतो. ह्या दिवसाबद्दल लिहायचं तर महाराष्ट्र, देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या विभूती आणि देशरक्षणार्थ वेळोव्ळी धावलेला महाराष्ट्र याचा थोडक्यात आढावा घ्यावा लागतो. आणि असा आढावा घेताना पहिलं नांव चटकन मनात येतं आणि बोटातून बेशुद्धतही उतरतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं..! ह्या नांवाला महाराष्ट्रात सोडा, देशातही पर्याय […]

आपलं मुल खरंच ‘आपलं’ असतं का?

‘माझं’ किंवा ‘आमचं’ मुल ही घटना सत्य असली तरी मला ही कल्पनाच मान्य नाही. त्या जीवाचा जन्म आपल्यामुळे झालेला असला किंवा त्या जीवाला जगात आणण्याच्या निसर्गाच्या करामतीनुसार आपण केवळ निमित्तमात्र ठरलेलो असतो आणि म्हणून त्याला आपण ‘आपलं’ म्हणत असतो. बायोलाॅजिकल दृष्टीने ते मुल आपलं असतही. पण ते तेवढंच..! आपल्या पोटी रूजून आलेलं ते रोपटं नक्की कुठल्या […]

1 8 9 10 11 12 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..