नवीन लेखन...

सत्य पहिल्या प्रेमाचा

सागर घरी आला पण आज नेहमीसारखा हसतमुख, खूष दिसत नव्हता. जणू त्याचे कोणाशी तरी बिनसले आहे. उदास चेहऱ्याने तो सोफ्यावर बसतो आणि तितक्यात त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडतो.
‘’काय रे ब्रेकअप झाले की काय? सागर पटकन आपल्या चेहऱ्यावरची उदासी लपवत मागे वळून बघतो. ‘’अरे आई तु ? आज ऑफिस मधून लवकर कसे काय आली ?
‘’काही नाही रे… आमच्या ऑफिसचे शिफ्टींग होतय नविन ठिकाणी त्यामुळे आजपासून पुढचे तीन दिवस आम्हाला सुट्टी दिली आहे… बरं माझे सोड तुझे सांग, का इतका उदास झाला आहेस ? मस्करीच्या स्वरात आई विचारते ‘’खरे सांग ब्रेकअप तर नाही झाले ना ? सागर हा प्रश्न पुन्हा ऐकून जरा ओशाळला. काय सांगू काय नको असे झाले पण तरीही सागर म्हणाला ‘’काय आई तुपण चेष्टा करतेस माझी…
आईनी त्याच्या नजरेला नजर मिळवली आणि म्हणाली , ‘’काही झाले ना बेटा तरी मी तुझी आई आहे रे… सांग नक्की काय झाले ? आईचे असे शब्द ऐकताच सागरचे अश्रू वाहू लागले. त्याला त्याच्या भावनांना आवर घालणे अवघड झाले होते.
सागर सांगू लागला.. ‘एक मुलगी आहे प्रिती नावाची. मला ती खूप आवडते आणि तिलाही मी आवडतो . आमच 15 ऑगस्ट पासून तर 20 फेब्रुवारी पर्यंत खूप चांगल चालल होत . आम्ही एकमेकासिवाय राहू शकत नव्हतो . ती सुद्धा माझ्याशिवाय राहू शकत नव्हती . ती माज्यासी लग्न सुद्धा करणार होती . पण तिच्या घरच्यांचं आमच्या लग्नाला नकार आहे . ती आपल्या आई वडिलांना खूप मानत होती . तिला स्वतःच अस्तित्व सुद्धा निर्माण करायचं होत . माझीही खूप इच्छा होती कि ती खूप मोठी व्हावी . ती खूप समजूतदार होती . ती माझी खूप काळजी घ्यायची आणि मला खूप समजून पण घ्यायची . तिचा नेहमी call यायचा तेव्हा मी तिला म्हणायचो कि अभ्यास कर . पण तीच मन काही लागायचं नाही .मग मला वाटल कि आपणच काही तरी कराव जेणेकरून माझी आठवण येणार नाही आणि तीच मन अभ्यासत लागेल , तीच खूप नाव व्हाव अशी माझी मनापासून इच्छा होती , पण तीच अभ्यासात मन लागत नव्हत. मी हळूहळू तिला टाळू लागलो . तिचे call येणे कमी झाले. तीच अभ्यासात मन लागल . तिने नवीन मित्रांसोबत अभ्यास करायला सुरवात केली. पण त्यातला तिचा एक मित्र मात्र तिच्याकडे वाईट नजरेनं बघायचा . ही गोष्ट मला माहीत झाली. म्हणून मी तिला म्हटल कि त्याच्यापासून तू दूर राहा पण ती मानायला तयार नाही . यापूर्वी ती माझी प्रत्येक गोष्ट मानत होती पण त्यादिवसी तिने माजी कोणतीच गोष्ट मानली नाही . मग काही दिवसानंतर परत आम्ही भेटलो . तेव्हा मात्र तीच अभ्यासात चांगला मन लागला होता. हे बघून खूप आनंद झाला . तिने मला म्हटल कि चल आपण लवकर लग्न करू , पण मला माहीत होत कि आमच लग्न होण शक्य नव्हत म्हणून मी तिला सरळ (माझ्या मनात नसूनही ) तिला मी नकार दिला फक्त तिच्या carrier साठी .पण तिने मात्र मला त्यादिवसपासून खूप वेगळ समजल. ती मला hate करू लागली . पण तिला हे माहीत नव्हत कि मी जे करत आहे फक्त तिच्या सुखासाठी . ‘’मग पुढे काय झाले? आईने विचारले…
‘’मग काय एके दिवसी तिच्याशी खूप भांडण झाले त्यात चूक माझीच होती पण ती चूक मी जाणूनबुजून केली होती जेणेकरून ती मला विसरावी आणि तीच स्वप्न पूर्ण व्हाव . कदाचित तिच्या स्वप्नाच्या मधात मी येत असेल . तिला शेवटची विनंती केली कि फक्त एकदा मला तुज्यासी भेटायचं आहे .आणि ती भेटली सुद्धा .मी देवापुढे खूप विनवणी घातली तिच्यासाठी देवाचा प्रसाद सुद्धा नेला तिला पाहिजे होत तो लाल गुलाबच फुल दिला पण तीच उत्तर मात्र हृदयाचे तुकडे करून देणार मिळाल . तीन म्हटल कि मी तुझ्यासी लग्न नाही करणार, तू दुसर्या मुलीशी लग्न कर . माझी अवस्था पागलासारखी झाली आणि मी काय बोललो आणि काय नाही हेच मला माहीत नाही . मी पूर्णपणे तुटून गेलो . कारण ते माझ पाहिलं प्रेम होत . मी तिच्या प्रत्येक चुका माफ केल्या होत्या तिला समजून घेतल होत पण ती मात्र मला समजून घेतली नाही . त्यात चूक तिची नाही कदाचित मीच तिच्याशी चुकीचा वागलो पण माझ प्रेम माझ्या पासून दूर गेला होत. मी तिच्या मानातुन पूर्णपणे उतरलो होतो …. मी तिला विनवणी करू लागलो झालेल्या चुकीबद्दल माफीची भिक मागू लागलो पण तिने मला माफ केल नाही …………..
‘’अरे मग ती काय म्हणाली? पुन्हा आईने विचारले.
‘’थँक्स. मला सध्या या गोष्टी नकोय because i want to focus on my carrier. सागर पुन्हा पाणावलेल्या डोळ्यांनी आईला विचारतो. का ग आई या मुली इतक्या स्वार्थी असतात ? यांना का कळत नाही आपले प्रेम ? हे सारे ऐकून आई हसायला लागते . सागर गोंधळलेल्या चेहऱ्याने आईकडे पाहू लागतो.
‘’अरे सॉरी पण मला हसू आवरत नाहीये. म्हणून मी तुला काही सांगत नव्हतो , डोळे पुसत सागर म्हणाला. तसे नाही रे. हे बघ तू मला आई न समजता एक मित्र समजतो आणि सगळे सांगतो, यातच मला खूप आनंद आहे आणि मी जे हसले , ते तू जे काही केलेस त्यावर नाही. तर तुझे प्रेम आहे या वाक्यावर हसू आले.
‘’म्हणजे ? सागरने विचारले.
‘’अरे बेटा प्रेम म्हणजे काय ? सांग बघू ? सागर विचारात पडला.
तो म्हणाला ‘’एखादी गोष्ट किंवा व्यक्ती जी आपल्याला खूप आवडते आणि जिच्या शिवाय आपण राहू शकत नाही म्हणजे प्रेम.
आई परत हसली आणि म्हणाली . ‘’बरं मला सांग तुला शेजारच्या काकांशी बोलायला आवडते म्हणून तुझे काकांवर प्रेम आहे का ? हे ऐकून सागर हसायला लागला.
‘’नाही.. नाही.. काय आई तुपण!
‘’म्हणजेच एखादी गोष्ट किंवा व्यक्ती आपल्याला आवडते म्हणून आपले त्यावर प्रेम आहे असे होत नाही. पण आपले ज्यावर प्रेम असते मग ती गोष्ट किंवा व्यक्ती कशी का असेना, आपल्याला ती आवडतेच. सागर हे सगळे ऐकून गोंधळतो.
‘’मग आई प्रेम म्हणजे नक्की काय ? आई म्हणाली ,
‘’प्रेम असे काही प्रकार नाही,
ते फक्त एक नाव आहे..
शत्रूत्व, राग, घृणा, कटूता जिथे नाही,
असे मनाने वसवलेले एक गाव आहे.’’.
‘’आई तु जे बोलत आहेस ते कुठेतरी कळतय पण झेपत नाहीये. आई हसते आणि सागर ला म्हणते ‘’चल पॅकींग कर. दोन दिवस जरा आपण फिरून येऊ .
‘’आई हे काय अचानक मधूनच ?
‘’चल रे. हे बघ तुला फिरायला आवडते आणि मलाही . तसेही मला तीन दिवस सुट्टी आहे. तुझा ही मूड जरा चेंज होईल आणि मलाही छान वाटेल.
हे ऐकून सागर तयारीला लागतो. बॅग पॅक करतो. आई चावी घेते आणि दोघेही निघतात गाडीवरून फिरायला .
जस जसे ते शहर सोडत जातात तस तसे त्यांना हिरवीगार झाडी, दूरवर पसरलेली शेती उंच उंच डोंगर दिसू लागतात. अंगाला भिडणाऱ्या गार वाऱ्याने सागर थोडा फ्रेश आणि रिलॅक्स फील करतो. पण अश्या वातावरणामुळे तो कुठेतरी प्रितीला मिस करतोय. आईचे शब्द, प्रेम म्हणजे नक्की काय ? ह्याचा ही गोंधळ त्याच्या डोक्यात चालूच आहे. तेवढ्यात आई गाडी थांबवते .
सागर विचारतो ‘’का ग आई गाडी का थांबवली ?
‘’काही नाही रे… चल जरा चहा घेऊ तेवढीच जरा तरतरी येईल. असे बोलून हायवेला रस्त्याच्याकडेला एका झाडाखाली असलेल्या चहाच्या टपरीवर आई सागरला घेऊन जाते . आजूबाजूला नुसती हिरवीगार शेती पसरलेली असते.
‘’अरे इथला चहा खूप छान असतो. आज खूप वर्षांनी आलेय . आठवण झाली म्हणून जरा थांबले .
‘’पण आई मला सांग ना तू अचानक का प्लॅन केलीस फिरायला जाण्याचा?
‘’मला सांग तुला छान वाटत नाहीये का ? मजा येत नाहीये का ? तसं असेल तर आत्ताच सांग आपण परत जाऊ घराकडे.
‘’नाही नको आई उलट खूप भारी वाटतय. जाऊ आपण .
‘’एक लक्षात ठेव बेटा. चांगल्या गोष्टी करताना खूप विचार नाही करायचा. मनात आले की करून टाकायचे. जसे तू केलेस. तुझ्या मनात आले कि प्रितीच्या भल्यासाठी तुझ प्रेम तू गमवाव , पण तिला मात्र कळूही दिला नाही.
‘’पण आई आपले बोलणे अर्धवट राहिले. आता सांग ना प्रेम म्हणजे नक्की काय ?
समोर एका शेतात झाडाखाली झोपलेल्या शेतकऱ्याकडे बोट दाखवत आई सागरला विचारते . तुला झोपलेला शेतकरी दिसतोय का ? सागर म्हणाला ‘’हो दिसतोय ना….
आई म्हणते ‘’मग मला सांग एवढ्या दुपारी भर उन्हात तो घरी जाऊन पण निवांत झोपू शकला असता पण तो या मातीत का झोपलाय ?
’’नाही सांगता येत पण त्याच्या झोपण्याचा आणि प्रेमाचा काय संबंध ? सागर म्हणाला.
‘’अरे वेड्या हेच तर प्रेम आहे. तो त्या मातीला आई म्हणतो कारण ती त्याला खायला देते, तिच्यामुळे त्याला पैसा मिळतो त्याचे कुटुंब पोसले जाते. मग अश्या आईच्या कुशीत कोणालाही ऊब मिळेल आणि शांत झोप लागेल…
‘’अग आई झोप लागेल वैगरे सगळे ठीक आहे… पण असे मातीत झोपले तर त्याला भीती नाही का साप किंवा विंचू येऊन चावेल…
‘’अरे हेच तर विश्वास आहे. जी त्याला एवढे सगळे देते ती त्याची काळजी पण नक्कीच घेईल. आणि हाच विश्वास म्हणजे प्रेम करणं जिथे प्रेम असते तिथे माणूस निर्धास्त असतो कारण त्याला विश्वास असतो. जर प्रीतीही तुज्यावर खर प्रेम करत असेल तर एक दिवस नक्कीच तुला मिळेल .
‘ हे लय भारीये. म्हणजे विश्वास असणे म्हणजे प्रेम. बरोबरना आई ? आई हसते आणि पुन्हा गाडी सुरु करुन सागरला चल म्हणते .
सागर त्याच विचारात बसतो आणि दोघे पुढच्या प्रवासाला निघतात. दोघांच्या गप्पा सुरु होतात.
सागर म्हणतो ‘’थँक्स आई खूप रिलॅक्स फील होतंय. आणि तुझ्यामुळे मला नवीन गोष्टी कळतायेत. प्रेमाची व्याख्या समजली…
‘’प्रेम हि एका वाक्यात बसणारी व्याख्या नाहीये. पण समजले या प्रवासात नक्की समजेल… एक लक्षात ठेव सागर प्रेम कसे करायचे, प्रेमात काय करायचे हे सांगणारे खूप भेटतील पण प्रेम म्हणजे नक्की काय हे जाणणारे खुप कमी भेटतील. त्यांचे असे बोलणे चालू असतानाच अचानक सागर ओरडतो ‘’आई … थांब….
आई गाडी थांबविते , ‘’काय रे काय झालं?
सागर म्हणतो ‘’काही नाही ग ते बघ आंब्याचे झाड. कैऱ्या लागल्या आहेत. चल तोडू असे म्हणून सागर झाडापाशी पळतो. आई गाडी साईडला लावून त्याच्या बरोबर लहान होऊन कैऱ्या तोडायला जाते . दोघेही खूप कैऱ्या तोडतात. तितक्यात आई विचारते , ‘’तू का कैऱ्या तोडलेस ?
सागर म्हणतो, ‘’अग असे काय करते ? इतक्या भारी कैऱ्या त्यात हे झाड असे एकटेच रस्त्याच्याकडेला बर त्या झाडाचे मालक हि कुणी नाही. मग काय हरकत आहे तोडल्या तर ?
‘’हो काही हरकत नाही आणि कोणी विचारणार पण नाही. पण तू ह्याला पाणी दिलेस का ? कधी खत घातलेस का ? कधी याची निगा राखून संगोपन केलेस का ? तरीही तू कैऱ्या तोडल्यास आणि असे करूनही झाड तुला काहीच बोलले नाही.
सागर बुचकळ्यात पडतो… ‘’अग आई झाड कसे काय बोलेल ? आई हसते आणि म्हणते ‘’बेटा हेच प्रेम आहे. प्रेम म्हणजे निसर्ग. तो तुमच्याकडून पाण्याची,खताची अपेक्षा ठेवत नाही. संगोपनाचे स्वार्थ ठेवत नाही. तुम्ही त्याच्याकडे वर्षभर दुर्लक्ष करता, जेव्हा फळ किंवा फूल लागते तेव्हा त्याच्या जवळ येता आणि बिनधास्त तोडता. तरीही तो नाराज होत नाही, चिडत नाही. काही न बोलता तो फक्त देत राहतो. थोडक्यात कुठलीच अपेक्षा,स्वार्थ न ठेवता देत राहणे म्हणजे प्रेम.
हे ऐकून सागरचे डोळे चमकले. त्यालाही हळूहळू समजायला लागले आहे नक्की आईला सांगायचे काय.
त्या दोघांचा प्रवास पुन्हा सुरु होतो. सागर या दरम्यान प्रिती आणि त्याचे दुःख पार विसरून गेलाय. त्याला आता मजा यायला लागलीये. तो प्रवासात आणि आईशी बोलण्यात तल्लीन झालाय.
एक काम करू पुढे जे गाव लागेल तिथे थांबूया मस्त जेवण करू मग पुढे निघू म्हणजे नॉन स्टॉप जाता येईल. टेन्शन राहणार नाही….
‘’चालेल आई तसही खूप भूक लागलीये… कारण आपण काहीच न खाता तसेच निघालो… बर आई मला आता सांग तु पहिले म्हणालीस प्रेम म्हणजे विश्वास. मग आत्ता सांगितले जिथे अपेक्षा नाही स्वार्थ नाही ते म्हणजे प्रेम. पण असे तर होत नाही ना. For example तु माझ्यावर प्रेम करतेस माझी काळजी घेतेस . मला हवे नको ते सगळे देतेस . मग तुलाही कुठेतरी अपेक्षा असेलच ना. कि मी असे वागावे तसे रहावे. मीही पुढे जाऊन तुझी काळजी घ्यावी वैगरे वैगरे.
‘’हे बघ बेटा. वाटणं आणि अपेक्षा यात खूप फरक असतो…. तुम्हाला जे वाटतं ते तसे होईलच असे काही नसते आणि जरी ते नाही झाले तरी त्याचे दुःख तुम्हाला होत नाही…. पण अपेक्षा तशी नसते…. अपेक्षा म्हणजे तुम्ही गोष्टी granted धरता… तुम्ही एखादी गोष्ट करत असेल तर त्यात तुम्ही स्वार्थ ठेऊन त्या गोष्टीचा रिझल्ट तोच निघेल जो तुम्हाला हवाय अशी ईच्छा ठेवता…. जेव्हा ते तसे होत नाही…. थोडक्यात जेव्हा तुमची अपेक्षा भंग होते तेव्हा तुम्हाला त्याचा खूप त्रास होतो…. दुःख होते.
तुझ्याच भाषेत for example – तुज्यावर प्रीतीचा जोवर प्रेम होते तोवर तुला काही टेन्शन नव्हते. उलट तिचे बोलणे, हसणे, भेटणे तू ते एन्जॉय करत होतास. पण जसे तुला तिच्या कडून कळले की ती तुज्यासी लग्न नाही करणार . इथेच तुझ्या वाटण्याचे अपेक्षे मध्ये रूपांतर झाले. आता तुझी हि अपेक्षा होती की तू तिला विचारल्यावर ती तुला होच म्हणेल. पण जेव्हा ती नाही म्हणाली तेव्हा अपेक्षा भंग झाली. तुला दुःख झाले… त्रास झाला…
सागर हे सगळे ऐकून पुन्हा विचारात पडला. त्याला हे सगळे समजत होते पण नक्की वागायचे कसे हेच त्याला कळत नव्हते. थोड्यावेळाने आईने गाडी थांबवली.
सागर विचारातून बाहेर आला. काय ग आई काय झाले ? कुठे काय झाले ?
‘’अरे आले ते गाव. जेवायचे आहे ना आपल्याला ? हो हो जेवायचं ना…
‘’विसरूनच गेलो होतो भूक लागलीये. आई आपण ज्या कैऱ्या तोडल्यात ना त्याला मस्त मीठ लावून जेवताना खाऊया.
आईपण आनंदाने हो म्हणते आणि गाडी हॉटेल समोर पार्क करतात.
जसी आई गाडी पार्क करते त्याच वेळेस रस्त्याच्या पलीकडे एका छोट्या मुलाच्या हातातून कुत्र्याचे पिल्लू उडी मारून रस्त्यावर पळू लागते. समोरून ट्रक येत असतो. सागर हे पाहतो. कोणत्याही क्षणी ते पिल्लू ट्रक खाली जाऊ शकते हे कळताच सागर धावतो आणि त्या पिल्लाला वाचवतो. ज्याचे ते पिल्लू असते तो छोटा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत पळत सागर जवळ येतो आणि म्हणतो ‘’थँक्यू दादा…. तुम्ही माझ्या जिवलग मित्राला वाचवले…. हा सोडून माझे कोणीच असे जवळचे नाहीए….
सागर हे सगळे पाहून गालातल्या गालात हसतो पण कुठेतरी त्याच्याही डोळ्यात आनंद अश्रू तरळताना दिसतात. हे पाहून आई सागरच्या जवळ येते .
‘’बेटा…. आत्ता तू हे जे काही केलेस ना…. यालाच माणुसकी असे म्हणतात…. आणि माणुसकी म्हणजे प्रेम…. माणसाचे माणसावर असलेलं…. एखाद्याला त्याची आवडती गोष्ट मिळवून देणे किंवा त्याचे प्रेम मिळवून देणे. यातून जे समाधान मिळते जो आनंद मिळतो ते समाधान तो आनंद म्हणजे प्रेम….
‘’हो आई अख्खा प्रवासभर तु सांगितलेल्या गोष्टींचा विचार करत होतो आणि आत्ता घडलेल्या गोष्टींवरून मला क्लिअर झाले… मला कळले आई प्रेम म्हणजे काय…
‘’अरे वा…. मग सांग बघू प्रेम म्हणजे काय?
‘ प्रेम म्हणजे , आई जस आपल्या मुलाला सांभाळते… त्याची काळजी करते… त्याचे संगोपन करते… कोणतीही अपेक्षा, स्वार्थ न ठेवता… मग तो काळा असो पांगळा असो… चोर असो किंवा गरीब… म्हणूनच त्या शेतकऱ्याला ती माती आई वाटते…
आपले आपल्या देशावर प्रेम आहे म्हणून आपण तिला भारतमाता म्हणतो… आणि बघना आई आपण ज्यावर प्रेम करतो त्याला अगदी आपल्या बाळासारखे जपतो… आणि बाळाकडून आपण कोणतीच अपेक्षा ठेवत नाही.त्याच्या हातून चूक जरी झाली तरी माफ करतो . आपल्या हातात फक्त एवढेच असते. जे बाळाला हवंय ते फक्त देत राहणे….
जे निसर्ग करतो. तो फक्त देत राहतो. थोडक्यात कोणतीही अपेक्षा न करता. कुठलाही स्वार्थ न बाळगता. कसलाही भेदभाव न ठेवता जेवढे शक्य होईल तेवढे देत राहणे म्हणजे प्रेम….
हे ऐकून आईच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. तिला कळून चुकले सागरला प्रेमाचा खरा अर्थ समजलाय. आई खुश होऊन सागरला म्हणते …. ‘’बेटा चल इथे जेवण करू आणि परत घरी जाऊ….
सागर आईकडे बघतो आणि म्हणतो ‘’पण आई आपल्याला तर अजून फिरायचे आहे ना….
आई म्हणते ‘’वेड्या जिथे तुला तुला न्यायचे होते तिथे तू पोचलास…..
सागर आईकडे बघून हसतो आणि दोघेही जेवायला हॉटेल मध्ये शिरतात….

प्रा. हितेशकुमार पटले
About प्रा. हितेशकुमार पटले 15 Articles
प्रा. हितेशकुमार पटले हे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक असून ते लेखकही आहेत. ते सोशल मिडियावर कार्यरत असून स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..