उत्तर भारत आणि जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी आणि दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी लष्कर मोठय़ा प्रमाणावर प्रयत्नशील आहे. यामध्ये दरवर्षी किमान ७००-८०० जवान आणि २५ ते ३० अधिकारी शहीद होतात. १९८८ पासून असलेली ही परिस्थिती कायम आहे. ही घुसखोरी थांबवताना सुमारे तीन हजार जवान दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर जखमीही होतात. अनेक जवान आपले हात-पाय, डोळे गमावून बसतात. असं अपंगावस्थेत जिणं किती […]
२६ जुलै रोजी कारगिल युद्धाला १७ वर्षे पूर्ण झाली. अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या युद्धावर अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ […]
अफस्पा काढण्याआधी लष्कर मागे घेणे जरुरी अस्थिर भागात लष्कराने अतिबळाचा वापर करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, यावर निव्रुत्त लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिकुल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मणिपूरमध्ये मागील 20 वर्षांत अनेक बनावट चकमकीची प्रकरणे घडली असून, त्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. संरक्षण व पोलिस दलांनी अतिबळाचा वापर लष्करी विशेषाधिकार […]
मुस्लिम धर्मातील सगळ्यात पवित्र असा रमझान ईदचा सण किंवा उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना आशियातील अनेक देशांमध्ये जो रक्तपात सुरु आहे तो अंगावर काटा आणणारा आहे. दहशतवादी हल्ल्यामागे जमायतुल मुजाहिदीन, आयएसआयचा हात बांगलादेशची राजधानी ढाक्यात १ जुलैला शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे इसिसचा नाही, तर बांगलादेशातीलच जमायतुल मुजाहिदीन या अतिरेकी गटाचा आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच देशांचा यशस्वी दौरा भारताची आर्थिक, संरक्षण चौकट मजबुत करण्यासाठी उपयुक्त…. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५-१० जुनच्या पाच देशांच्या दौर्यामागे मुख्य उद्देश होता तो अणू पुरवठादार गटामध्ये (न्युक्लिअर सब्स्क्रायबर्स ग्रुप किंवा एनएसजी) भारताला प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यातील सदस्य देशांचा पाठिंबा मिळविण्याचा. पाचपैकी तीन देश एनएसजीचे सदस्य आहेत.मोदी यांनी अफगाणिस्तान, कतार,स्वित्झर्लंड,अमेरिका,मेक्सिको या 5 […]
सौदी अरेबियातून पकडून आणण्यात आलेल्या झबीउद्दिन अन्सारी उर्फ अबू जुंदाल याच्या कारवायांबाबत प्रसारमाध्यमं भरभरून माहिती देत आहेत. वृत्तवाहिन्यांवर चर्चेची गुर्हाळं चालू आहेत. हा सगळा तपशील तपासयंत्रणाच पुरवत आहेत, हे उघड आहे. असा हा तपशील प्रसिद्ध झाल्यानं, आपण किती मोठं घबाड पकडून आणलं आहे, असा दावा भारताच्या गुप्तहेर संघटना करतात व तसं ठसविण्यासाठीही असा तपशील प्रसारमाध्यमांना पुरवला […]
विदर्भातल्या पुलगावमधल्या सेंट्रल ॲम्युनिशन डेपो (केंद्रीय दारूगोळा भांडार, सीएडी) मध्ये ३१ मेला मोठा स्फोट होऊन आगीचा डोंब उसळला. हा भारतातला सगळ्यात मोठा आणि आशियातला दुसऱ्या क्रमांकाचा डेपो होय. बंदुकीच्या गोळ्या, ८१ मिलिमीटर बाँब, १५५ मिलिमीटर गन शेल्स, टॅंक शेल्स, हॅंड ग्रेनेड्स, भूसुरुंग, ब्रह्मोस व इतर विद्ध्वंसक क्षेपणास्त्रं आणि इतर अमाप दारूगोळा या डेपोमध्ये असतो. या स्फोटाच्या निमित्ताने एकूणच दारुगोळा सुरक्षा यंत्रणेबाबत घेतलेला एक आढावा… […]
अतिरेक्यांचे तुष्टीकरण थांबवा बंदुकविहीन अतिरेकास हाताळण्याबाबत सरकार हतबुद्ध का आहे? जम्मु काश्मीर राज्यामधील हंडवारा शहरात असलेले लष्कराचे तीन बंकर हटविण्यात आले. हंडवाडा येथील स्थानिक नागरिकांनी हे बंकर हटविण्यात यावेत, अशी मागणी केली होती. मात्र या बंकरचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याची भूमिका लष्करातर्फे घेण्यात आली होती. स्थानिक नागरिकांनी बंकरच्या दिशेने जोरदार दगडफेकही केली होती. या पार्श्वभूमीवर, […]
१४ एप्रिलला मणिपूरच्या तामेंगलोंग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 21 पॅराचे मेजर अमित देसवाल शहीद झाले आहेत. झेलियांगग्राँग युनायटेड फ्रंटच्या (झेडयूएफ) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजर अमित देसवाल यांना वीरमरण आलं. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मादेखील करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंडवारामध्ये १८ एप्रिलला सुरु असलेल्या चकमकीत सैन्याने दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. श्रीनगर येथे कायदा आणि सुव्यवस्था […]
सामरिक रणनीती तयार करण्याची गरज गेल्या वर्षी तंगधार परिसरात चिनी लष्कराच्या हालचाली वाढल्या होत्या. आता पाकव्याप्त काश्मीरच्या नौगाम क्षेत्रात त्या वाढल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.पाकिस्तानने पाक व्याप्त काश्मीरमध्ये विकासासाठी प्रकल्प उभे करण्याची योजना आखली आहे व हे काम चीनला दिले आहे. या प्रकल्पांच्या कामासाठी व संरक्षणासाठीही सुमारे 30-50,000 हजार चिनी सैन्य या प्रदेशात […]