नवीन लेखन...

ऑईल स्पिल

वेक अप कॉल वाजल्यापासून आठ ते दहा मिनिटे झाले नव्हते की लगेच पुन्हा रिंग वाजली. तोंडातला ब्रश काढून घाईघाईत तोंड धुवून फोन उचलला तर पलीकडून मोटर मन म्हणाला जसे असाल तसे या खाली इंजिन रूम मध्ये ऑईल स्पिल झाले आहे. खाली जाताना चीफ इंजिनियर, सेकंड इंजिनियर आणि जुनियर इंजिनियर हे पण सगळे घाई घाईत पळत चालले होते. खाली जाऊन बघतो तर प्यूरीफायर रूम मधून काळे हेवी फ्युएल ऑईल दरवाजा बाहेर ओसंडून वाहत होते. […]

रोलिंग

सोमालियन पायरेट्सने केलेल्या अयशस्वी हल्ल्या नंतर आमच्या जहाजावर असणारे रायफलधारी सिक्यूरीटी गार्ड श्रीलंकेच्या ग्याले बंदरात उतरणार होते. सोमालियन पायरेट्सने दिवसा ढवळ्या जहाजाला हायजॅक करायचा प्रयत्न केला होता. पण जहाजावर ए के 47 रायफल हातात घेऊन उभे असलेले सिक्यूरीटी गार्ड बघून पायरेट्स जास्त वेळ व त्यांची शक्ती खर्च न करता माघारी फिरून गेले होते. […]

इक्वेटर क्रॉसिंग

जहाज जेव्हा पृथ्वीचे विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात किंवा दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवेश करते त्यावेळी जहाजावर इक्वेटर क्रॉसिंग सेरेमनी साजरी केली जाते. […]

रिओ निग्रो

फोर्थ इंजिनियर , थर्ड मेट, कॅप्टन, स्टीवर्ड, मोटरमन , एक ए बी आणि मी पकडून असे एकूण सात जण मनौस शहरात सकाळी दहा वाजता गेलो होतो आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास परत आलो होतो. सकाळी जहाजावरुन जाताना छोट्या स्पीड बोट मध्ये पायलट लॅडर ने सगळे एका मागोमाग उतरले. […]

ग्राऊंडिंग

झोपेत असताना जहाज एकदम कशाला तरी धडकल्याचे जाणवले आणि हळू हळू धक्के लागत असल्याचा भास झाला आणि तेवढयात अचानक इमर्जन्सी अलार्म वाजायला लागला. सगळ्यांच्या केबिन चे दरवाजे एका मागोमाग उघडायला लागले आणि जो तो मस्टर स्टेशन कडे पळायला लागला होता. […]

रेस्क्यू

सत्तावीस वर्षीय इलेक्ट्रिक ऑफिसर डेक वर असणारी लाईट दुरुस्त करत होता उंची जास्त नसल्याने सेफ्टी बेल्ट आणि हार्नेस न लावता तो छोटयाशा शिडीवर उभा राहून काम करत होता. मेन डेकवर शिप साईड जवळची लाईट असल्याने शॉक लागल्या बरोबर त्याचा तोल गेला आणि तो समुद्रात पडला. […]

नाईट ड्युटी

जहाज गल्फ मध्ये ओमान च्या किनाऱ्याजवळ अँकर टाकून उभे होते. इंजिन रूम मध्ये तापमान बेचाळीस अंश पेक्षा जास्त होते सी वॉटर टेम्परेचर वाढल्यामुळे जनरेटर चा लुब ऑइल टेम्परेचर हाय अलार्म येत होता. जहाज गल्फच्या बाहेर पडे पर्यंत गर्मीत जास्त काम काढू नका आणि करू पण नका अशी सूट चीफ इंजिनियरने सगळ्यांनाच देऊन ठेवली होती. […]

हेल्पलेस

अशा वेळी कोणाला कोरोनाची लागण झाली तर काय होईल ह्या भीतीने प्रत्येकजण हादरला आहे. जहाजावर कोणी नवीन माणूस येऊ नये असे सुद्धा प्रत्येकाला वाटत आहे. नवीन येणार असतील तर सगळ्यांनाच एकदम जाऊ द्या असेही काहीजणांना वाटते आहे. परंतु हे शक्य नाही कारण प्रत्येक जण हेल्पलेस आहे. […]

कार्तेगेना

पहाटे पहाटे जहाज जेट्टी वर बांधत असताना इंजिनच्या मुव्हमेंट जाणवल्या होत्या. जहाज पुढे मागे करताना इंजिन चालू बंद होण्याचा आवाज आणि व्हायब्रेशन मुळे कितीही झोपेत असलो तरी जाग आल्याशिवाय राहात नाही . तसही रात्री लवकर झोपल्यामुळे सकाळी साडे पाच वाजता जाग आली होती. […]

अडव्हान्स, रिटार्ड

ज्या दिवशी क्लॉक अडव्हान्स होते त्या दिवशी सर्व इंजिनियर आणि इंजिन क्रृ ला एक तास लवकर सुट्टी मिळते कारण जहाज नेहमी खोल समुद्रात असते पण डेक ऑफिसर चार चार तासाची वॉच ड्युटी करत असल्याने त्यांना वीस वीस मिनिटे वॉच वर लवकर यावे लागते. जेव्हा क्लॉक रिटार्ड म्हणजे एक तास मागे केले जाते त्या दिवशी रात्री घड्याळाचे काटे उलटे फिरवले जातात. रात्री बारा वाजता काटे फिरवून अकरा वाजेवले जातात. असे बोलतात […]

1 4 5 6 7 8 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..