नवीन लेखन...

दुबईमधील बुर्ज खलिफा

दुबई म्हटले की उंच आणि विचित्र आकाराच्या गगनचुंबी इमारती हे समीकरण पक्के झाले आहे. बुर्ज खलीफा या दुबईमध्येच असलेल्या जगातील सर्वात उंच इमारतीने आधीच विश्वविक्रम केला आहे. सर्वोत्तम इंजिनिअरिंगची चर्चा जेव्हा होते तेव्हा’ बुर्ज खलिफाचा उल्लेख होणार नाही असे होऊ शकत नाही. बुर्ज खलिफा हे व्हिजनरी आयडिया आणि सायन्सचे हे एक उत्तम उदाहरण आहे. बुर्ज खलिफा हे इस्लामिक आर्किटेक्चरचे हे उत्तम उदाहरण आहे. सध्या जगातील सर्वांत उंच फ्रीस्टॅंडिंग इमारत, फास्ट आणि लांब लिफ्ट, उंच मशिद, स्विमिंग पूल आणि रेस्तरॉंचा खिताब बुर्ज खलिफाच्या नावावर आहे. या इमारतीच्या १२४ व्या मजल्यावर सर्वांसाठी “निरीक्षण कक्ष” निर्मिती केली आहे. इमारतीच्या आसपासचा परिसर हा दुबई डाऊन टाऊन ह्या नावाने विकसित केला आहे.

८२८ मीटर म्हणजेच २७१६.५ फूट या उंच या इमारतीत १६० मजले आहेत. या इमारतीचे बांधकाम २००४ साली सुरु होऊन २००९ मध्ये समाप्त झाले. अधिकृतरीत्या अनावरण होण्यापूर्वी ही इमारत “बुर्ज दुबई” ह्या नावाने प्रसिद्ध होती. याचे नाव युएईचे अध्यक्ष खलीफा बिन जाएद अल नाहयान यांच्या नावावर ठेवले आहे.

बुर्ज खलिफाच्या बांधकामाशी निगडित काही काही रंजक गोष्टी.

बुर्ज खलिफाच्या बांधकामासाठी ९७ अब्ज रुपये खर्च आला. याचे प्रायमरी स्ट्रक्चर मजबूत सिमेंटपासून तयार केले आहे.
बुर्ज खलिफा साठी ३३०००० क्युबिक मीटर सिमेंट आणि ५५००० टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. यासाठी तीन टॉवर क्रेनचा वापर करण्यात आला आहे. यातील एक क्रेन २५ टन वजन उचलू शकत असे. ४५००० क्युबिक मीटर सिमेंटचा वापर बिल्डिंगच्या पायात करण्यात आला. पायाभरणी करण्यासाठी १.५ मीटर डायमीटर असलेले ४३ मीटर लांब १९२ पाइप्स बनविण्यात आले. या साठी जमिनीत ५० मीटर खोल खड्डे खोदण्यात आले. दुबईतील भीषण उन्हाळा रोखण्यासाठी खास डिझाईन करण्यात आले. व याच्या बाहेरच्या वाजुने २६००० ग्लास पॅनल्स वापरण्यात आले. यासाठी चीनमधून ३०० क्लॅडिंग स्पेशालिस्ट बोलविण्यात आले होते. याच्या टॉप फ्लोअरचे तापमान ग्राऊंड फ्लोअर पेक्षा १५ डिग्री कमी राहते.

आता या पुढे दुबईमध्ये असलेली बुर्ज खलिफा ही बिल्डिंग जगातील सर्वात उंच बिल्डिंग राहणार नाही. सर्वात उंच बिल्डिंग व सर्वात भव्य इमारत बांधण्याच्या स्पर्धेत सौदी अरेबिया देखील सहभागी झाला आहे. मक्का मदिना या धार्मिक स्थळांमुळे जाणला जाणार देश आता आता जगातील सर्वांत उंच इमारत बांधत आहे. जेद्दा येथे या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
“जेद्दा टॉवर” नावाच्या इमारतीची उंची ३,२८० फूट (एक हजार मीटर) असेल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, सौदी अरेबिया जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याचा विक्रम मोडणार आहे. सध्या दुबईमध्ये सर्वात मोठई इमारत आहे. दुबईतील बुर्ज खलिफा या सर्वात उंच इमारतीची उंची सुमारे २,७०० फूट आहे.

अलीकडेच या टॉवरच्या बांधकामाचा फोटो समोर आला आहे. ते काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. २५२ मजल्याचा हा टॉवर जगातील सर्वात उंच निरीक्षण डेक असेल. आपण २,१७८ फूट उंचीवरुन संपूर्ण सौदी अरेबिया तुम्ही येथून पाहू शकता. याशिवाय, जेद्दाह टॉवरवरील लिफ्ट 2,165 फूट पर्यंत जाईल त्याच वेळी, डबल डेकर लिफ्ट लोकांना थेट पहिल्या तळापासून अवलोकन डेकपर्यंत घेऊन जाईल. अपार्टमेंट, पंचतारांकित हॉटेल, शॉपिंग मॉल्स, सात मजल्यापर्यंत कार्यालये देखील येथे असणार आहेत.

या इमारतीची वैशिष्टे.

1.4 अब्ज डॉलर्स (8,938 कोटी) बांधकामावर खर्च सध्याचा रेकॉर्ड म्हणजे बुर्ज खलीफा सुमारे 2,700 फूट उंची
वायूचा दाब कमी करण्यासाठी ती त्रिकोण आकाराची असेल.

सध्या जगातील सर्वात उंच बिल्डिंग.

– बुर्ज खलिफा, दुबई (2010 मध्ये बांधकाम): 2,716 फूट

– तैपेई 101, तैवान (2004 मध्ये बांधकाम): 1,666 फूट

– शांघाय WFC, शांघाय (2008 मध्ये बांधकाम): 1,614 फूट

– आंतरराष्ट्रीय वाणिज्य केंद्र, हाँगकाँग (2010 मध्ये बांधकाम) 1,587 फूट

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..