नवीन लेखन...

मोठ्या प्रमाणावरील ओला कचरा

घरगुती स्तरावर जमा होणारा ओला कचरा हा घरटी अर्धा पाऊण किलो एवढाच असतो. पण भाजी मंडयात भाजीचा खूप कचरा जमा होतो. तो प्रत्येक मंडईमागे टन अर्धा टन एवढा सहज असतो.

मोठमोठ्या हॉटेलातही भाज्यांचा कचरा आणि उरलेले शिळे अन्न हे ही खूप असते. औद्योगिक कँटिन, मोठमोठया संस्थातील कँटिन या ठिकाणीही वरील सारखा खूप कचरा मिळतो. ह्या कचऱ्यावर भाभा अणु संशोधन संस्थेने तयार केलेले निसर्गऋण संयंत्र वापरुन मिथेन वायू तयार करता येतो, शिवाय पुरेसा मिथेन तयार होत असेल तर त्यावर वीज निर्मितीही करता येते.

भाभा अणु संशोधन संस्थेच्या निसर्गऋणाच्या प्रकल्पातून माथेरानला वीज निर्मिती प्रकल्प सुरु झाला आहे. त्यातून रस्त्यावरील दिवे लागू शकतात. याशिवाय असा कचरा शहरांच्या जवळील गावांच्या शेतात खत म्हणून जाऊ शकतो. यासाठी वाहतुकीचा वेगळा खर्च करायला नको. ज्या ट्रकमधून भाजी येते तो जाताना रिकामा जातो. त्यातच आदल्या दिवशीचा हा कचरा भरला तर तो शेताला खतासाठी फुकटात वापरता येईल. अशा खताच्या वापरामुळे रासायनिक खताची मात्रा नक्कीच कमी करता येईल. यात गावागावात असणाऱ्या ऊसाच्या गुऱ्हाळातील ऊसाच्या चोयटयांचा वापरही करता येईल.

यात एका ओल्या कचऱ्याचा उल्लेख आतापर्यंत केला नाही. तो म्हणजे रुग्णालयांचा कचरा. यात बाटल्या,इंजेक्शनच्या सुया, जखमेवरुन काढलेले कापसाचे बोळे, ऑपरेशनमधून काढून टाकलेले शरीराचे भाग असा हा सर्व संसर्गजन्य भाग असतो. तो इतर कचऱ्याबरोबर टाकू नये असा नियम आहे. कारण कचरा वेचक महिला कचरा चिवडून त्यांना उपयोगी पडणाऱ्या गोष्टी त्यातून बाजूला काढतात. अशा वेळी जर इतर कचऱ्यात रुग्णालयाचा कचरा असेल तर कचरा वेचक महिलांना जंतूसंसर्ग होऊन त्यांचे आरोग्य बिघडेल. हा कचरा भट्टीत टाकून जाळून टाकायचा नियम आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..