“बोरोचा गणेश” – देश – जावा

भारत देश नेहमीच विविधतेत एकता शोधात आला आहे, शोधणार आहे आणि यातूनच सर्वांना सुख, शांती, समाधान, सत्य, प्रेम आणि आनंद मिळणार आहे. हजारो वर्षापूर्वी परदेशात सुद्धा खाणीच्या उत्खननात आणि अन्य बर्‍याच ठिकाणी श्री.गणपतींच्या मूर्ती, शिलालेख, कोरीवकाम आढल्या मिळाल्या याच्यातून बरीच माहिती उपलब्ध झाल्याने आपल्या ज्ञानात भर पडत गेली. परदेशीय मंडळी जवळ आली त्यांची भाषा, संस्कृती समजायला लागली आणि गैरसमज दूर होण्यास मदत झाली. देशादेशांतील संबंध घट्ट व दृढ होत गेले. अशाच एका परदेशातील गणपतीची माहिती आपण पाहणार आहोत त्या देशाचे नाव आहे. जावा.

 

“बोरोचा गणेश” म्हणून ओळखली जाणारी ही पाषाणमुर्ती दिडोंबे गावाजवळ सापडली. डोके शरीराच्या मानाने फारच मोठे व अवजड आहे. इतके की ते शरीराचा मधला भाग जवळ जवळ झाकून टाकते. डोळे मोठे व मनुष्याच्या डोळ्यांसारखे असून भुवया जाड आहेत. चारही हातात विविध नेहमीची चिन्हे असून पाय मुडपलेला आहे व तळवे एकमेकांना स्पर्श करतात. त्याने रत्नखचित करंडमुकुट, कुंडले, बाजुबंद व वाळे धारण केलेले आहेत. भरतकाम केलेले दुपट्टे पायावरून खाली आसनावर लोंबत आहेत. आसनापुढे नरमुंडाची रांग आहे व मागच्या बाजूस एक लेख कोरलेला असून त्यावर शके १९६० हा आहे.

 

नरमुंडाचा आभूषण म्हणून गणेश मूर्तीच्या बाबतीत केलेला उपयोग ही जावाचीच खास कल्पना आहे. या गणेशाचा पुढला भाग भारतीय जावा पद्धतीचा आहे. तर मागील बाजू इंडोनेशियन पद्धीतीची आहे. त्यावर बटबटीत डोळ्याच्या कापालीकाचे डोके असलेले कापालिक यक्षरक्षक, जावा येथील देवळाच्या दोन्ही बाजूस भूत पिशाच्यांपासून निवारण करण्याकरिता उभे असतात.

श्री गणेश हा जावा येथील बायस नदीच्या धोक्याच्या उताराजवळ मिळाला. अश्या रीतीने या मूर्तीत जवाची मंगल देवता व इंडोनेशियाची “कापालिका” अशुभ गण निवारक या दोन्ही देवता कारागिराने एकत्रित केलेल्या आहेत.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 224 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…