नवीन लेखन...

आंतरराष्ट्रीय बायोडीझेल दिवस

बायो डीझेल म्हणजे अपारंपारिकरित्या मिळवलेले इंधन.

कुठल्याही वनस्पतीजन्य तेलाचे ट्रांसईस्टरिफिकेशन या रासायनिक प्रक्रियेद्वारे मोनो अल्कलीमध्ये रुपांतर केले तर मिळणारा पदार्थ म्हणजे बायो डिझेल. बायो डिझेलचे इंधन गुणधर्म हे पेट्रोलियम डीझेलसारखे असतात. मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते. म्हणून सल्फर अथवा गंधकाचे हवेतले प्रदूषण होत नाही. यासाठी लागणारे तेल हे वनस्पतीजन्य (तेल बिया) असल्याने हा नैसर्गिक व अपारंपारिक असा उर्जास्त्रोत आहे.

अमेरिकेत मका तसेच सोयाबीनचे तेल यासाठी वापरले जाते. तर पाम तेलाचा वापर युरोप खंडातील देश आणि भरपूर उपलब्धी मुळे मलेशियामध्येकरतात. भारतात खाद्यतेल बिया बायो डिझेलसाठी वापरल्या जात नाहीत त्या ऐवजी करंजी नामक झाडापासून मिळणाऱ्या बियांचा वापर केला जातो. मर्सिडीज ह्या प्रतिष्ठीत मोटारींच्या उत्पादकांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या बायो डिझेलच्या प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे.

बायो डिझेलच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या करंजीच्या लागवडी संदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन व्हावे, म्हणून ही कंपनी एनजीओच्या माध्यमातून उपक्रम राबवते आहे. सुरुवातीला महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. पडीक जमिनीमध्ये करंजीची लागवड करता येते, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून उत्पन्न मिळवता येईल. डेम्लर क्रायस्लर इंडिया या कंपनीने आतापर्यंत काही बायोडिझेलचे प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवले आहेत.

संजीव वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..