नवीन लेखन...

भोग

मनुष्याच्या आयुष्यात सुखाचा भोग असो किंवा दुःखाचा भोग ! तो मनुष्याला संचित पाप कर्म व पुण्यकर्म यामुळेच भोगावा लागतो. संतश्रेष्ठ जगतगुरु संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात प्रमाण देतात की,

भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ||
ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ||
देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ||
तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ||

संतश्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा गाथ्यातील अभंग आहे. संत तुकोबाराय या अभंगात असे सांगत आहेत की, एखादा मनुष्य प्रपंचातील विषय भोग घेत असेल आणि त्याला काही काळानंतर त्याचा त्याग करावा वाटला आणि त्याने त्या विषयांचा त्याग केला कि, त्याला लगेच त्या सर्व संचित पाप आणि पुण्य कर्माचा भोग भोगावा लागतो. म्हणजे एखाद्या वाईट व्यक्तीने वाईट कर्म करीत असताना तो करीत राहिला परंतु त्याने तो वाईट कर्म न करण्याचा संकल्प केला आणि त्याने ते वाईट करने सोडून दिले. परंतु त्याने वाईट कर्म सोडून देताच त्याच्यावर दुःखाचा डोंगर किंवा मोठा संकटांचा डोंगर कोसळतो. याचाच अर्थ असा की, त्याने वाईट कर्माचा त्याग करताच त्याच्या पूर्व कर्माचा भोग समोर उभा राहतो.

संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय असेही सांगतात की, हे असे उफराटे वर्म म्हणजे उलटे वर्म आहे. आणि धर्मा अंगीच अधर्म आहे. ज्या कर्मामुळे देवात आणि भक्तामध्ये अंतर पडते ते कर्म म्हणजे पाप कर्म ! आणि देवाचे कर्म म्हणजेच सत्कर्म ! हे लक्षात घेऊनच भक्ताने नीतीने आणि न्यायाने जगायला शिकले पाहिजे. खोटे व्यर्थ संकल्प चांगल्या व्यक्तीने कायमचे सोडून द्यावे.

तुकोबाराय शेवटच्या चरणात असे सांगत आहेत की खोटे संकल्प, व्यर्थ संकल्प, खोटी भीड न धरता जिथे आपला लाभ असेल, जिथे आपला परमार्थ असेल तेथे आपण आपला लाभ बघावा. आणि आपण नीती न्यायाने कर्म करीत जगत राहावे.

*विठोबासी शरण जावे |*
*निजनिष्ठे नाम घ्यावे ||*

विठोबाचे शरण जाऊन त्याचे नाम घेत अखंड चिंतन करत राहण्यातच खरा धर्म आहे, खरा स्वार्थ आहे आणि खरा लाभ आहे. कारण विठोबाचे नामस्मरण हे फक्त निमित्तमात्र आहे, परंतु त्यामुळे आपल्या मनात नकारात्मक विचार येत नाहीत. आपण सकात्मक विचाराने पुढील कार्य करायला लागतो, ज्याचे भोग आपणास सकारात्मकच मिळते.

— डॉ. शांताराम कारंडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..