नवीन लेखन...

भारतीय ज्ञानाचा खजिना

मी अलीकडेच ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ नावाचं प्रशांत पोळ ह्यांनी लिहिलेलं अतिशय महत्वपूर्ण पुस्तक वाचलं. सदर पुस्तकाचं प्रकाशन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी केलंय आणि पुस्तकाला मा. मोहन भागवतांची प्रस्तावना आहे.

सदर पुस्तकातून मुस्लिम आक्रमक भारतात येण्या आधीच्या संपूर्ण कालखंडात सर्व जगात आपला कसा दबदबा होता, आपण ज्ञानाच्या, संपत्तीच्या आणि समृद्धीच्या बाबतीत जगात कसे सर्वश्रेष्ठ होतो ह्यावर संशोधन करून प्रशांत पोळ ह्यांनी अभ्यासपूर्णपणे मांडलेलं आहे. पुस्तकातून उलगडलेली काही अद्भुत माहिती अशी –

१. पेशावर/रावळपिंडीपासून ते जावा-सुमात्रा (इंडोनेशिया) पर्यंतच्या भूभागावर सन २०० BC ते सन १००० अशी सुमारे १२०० वर्ष संस्कृत ही भाषा बोलली जायची.

२. ‘तक्षशीला’ विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिकायला यायचे. चाणक्य, पाणिनी ही काही तिथली विद्यार्थ्यांची नावे. जहाज बांधणी शास्त्रापासून वैद्यकापर्यंत आणि खगोल शास्त्रापासून धातू शास्त्रापर्यंत असे सुमारे २५ विषय तिथे शिकवले जायचे. एकावेळी १०,००० विद्यार्थी बसू शकतील एवढे मोठे तिथे सभागृह होते.

३. ‘मगध’ राज्यातले (आताचे बिहार) नालंदा विद्यापीठ ही असेच. चीनमधला युआन श्वांग तिथे राहून १० वर्षे शिकला आणि त्यावेळच्या बऱ्याच नोंदी त्याने करून ठेवल्या आहेत. पुढे १२०० साली खिलजीने ते विद्यापीठ जाळून टाकले आणि सगळे पुरावे नष्ट झाले.

४. आपला शिक्षण आणि व्यापार ह्या दोन्हीमध्ये जगात पहिला क्रमांक होता. एक्स्पोर्टसाठी जगात आपला २९% शेअर होता आणि आजतागायत हे रेकॉर्ड ब्रेक झाले नाही. युरोपिअन इतिहास तद्यांनी तश्या नोंदी त्यांच्या इतिहासात करून ठेवल्या आहेत.

५. कर्नाटकातले ‘हंपी’ हे शहर तर जवळपास जगाचीच राजधानी होते. (१४०० साल) त्याचं टाऊन प्लॅनिंग जागतिक दर्जाचं होतं. रस्त्यावर भाजी विकायला बसतात तसे लोक सोनं चांदी विकायला बसायचे आणि लोक भाजीपाल्यासारखे ते विकत घ्यायचे अशी नोंद परदेशातल्या इतिहासतद्यांनी करून ठेवली आहे.

६. ‘ऋग्वेद’ हा जगातला सगळ्यात जुना ग्रंथ. ५००० वर्षांपेक्षा जुना. त्यातल्या उपनिषदांमधल्या सूक्तांमध्ये आणि श्लोकांमध्ये सूर्याचे पृथीपासूनचे अंतर आणि प्रकाशाचा वेग लिहून ठेवला आहे.

७. ‘सिरीभूवलय’ ग्रंथ – हा ग्रंथ कोणत्याही भाषेत/ लिपीत लिहिलेला नाही तर अंकांमध्ये लिहिलेला आहे. हे अंक १ ते ६४ असे आहेत. ते विशिष्ट पद्धतीनं वाचले की विशिष्ट भाषेत विशिष्ट ग्रंथ वाचता येतो. मूळच्या १६,००० पानी ह्या ग्रंथापैकी १२७० पानेच सध्या उपलब्ध असून मूळ ग्रंथात ५६ अध्याय असताना त्यातल्या ३ अध्यायांचीच उकल (डी-कोडींग) आजपर्यंत होऊ शकली आहे. १८ लिप्या आणि ७१८ भाषांत हा ग्रंथ वाचता येतो. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, गणित, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, इतिहास, वैद्यक, तत्वज्ञान ह्यासारख्या विषयांवरील ग्रंथदेखील त्यातच वाचता येतात.

८. ‘कटपयादी’ (सर्व अक्षरांना एक एक अंक देऊन त्याचं कोष्टक करून ती भाषा वापरण्याची संकल्पना म्हणजे ‘कटपयादी’ संख्या संकल्पना) सूत्राच्या मदतीने ‘पाय’ ह्या गणिती संकल्पनेबद्दलचं आपलं संशोधन, पायची किंमत दशांशाच्या ३१ व्या स्थानापर्यंत काढून ती एखाद्या श्लोकात एम्बेड करणं ह्यासारखी जबरदस्त माहिती पुस्तकात मिळते.

९. ‘डोसा’ हा पदार्थ २००० वर्ष जुना आहे तसेच मसाल्यांपासून ते रेशीम, धान्य इत्यादी आयटम्स सगळ्या जगात एक्स्पोर्ट व्हायचे.. ह्याबद्दलची सविस्तर माहिती पुस्तकात वाचायला मिळते.

१०. गुजरातेत असलेल्या सोमनाथ मंदिराजवळ एक स्तूप आहे जो ३००० वर्ष जुना आहे (कार्बन डेटिंग पद्धतीनुसार) आणि त्यावर एक संस्कृत श्लोक आहे. त्याचा अर्थ आहे ‘इथून पुढे दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषा काढली असता मध्ये कोणताही मोठा भूखंड येत नाही’. ह्याचाच अर्थ आपले लोक जगभर फिरत होते. ‘वास्को द गामा’ हा त्याच्या जहाजापेक्षा पाच पट मोठ्या भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला. मात्र भारताचा शोध त्यानं लावला असं आपला इतिहास आपल्याला शिकवतो ! १८०० सालच्या सुमारास ब्रिटिशांनी आपल्या जहाज बांधणी कारखान्यांना बंदी घातली आणि आपले जहाज बांधणी शास्त्राचे सर्व ज्ञान लयाला गेले.

११. थायलंड मधल्या एअरपोर्टवर समुद्र मंथनाचा मोठा देखावा उभा केला आहे. सिंगापूरचे आधीचे नाव सिंहपूर होते. यूरोपमध्ये बोलली जाणारी ‘केल्टिक’ भाषा, रशिया जवळच्या युक्रेन देशातल्या मुर्त्या, इराक-सीरिया प्रदेशातले ‘येझदी’ लोक, कंबोडिया, व्हिएतनाम मधली मंदिरे, शिल्पे ही सगळी भारतीय रूपे आहेत.

१२. प्लास्टिक सर्जरीचा शोध आपण लावला आहे आणि त्यालाही २००० वर्षे झाली अशी नोंद पुस्तकात आहे.

ह्याशिवाय आणखीही बरीच मौलिक माहिती पुस्तकात आहे. मुद्दा हा आहे की सन. १२०० नंतर आपल्यावर परकीय आक्रमणे झाली आणि तिथून पुढचाच इतिहास आपल्याला शिकवला जातो आहे. कारण त्या इतिहासात अन्याय, अत्याचार ह्यापेक्षा राजकीय अस्मिता दडल्या आहेत..एकदा आवर्जून वाचलंच पाहिजे असं पुस्तक!

सोबत बुकगंगाची लिंक – https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5534245388117916480?BookName=Bhratiya-Dnyanacha-Khajina

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..