नवीन लेखन...

बीज – वृक्षाचे चक्र कुणाचे ?

सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार

कोण देई हा आकार ?  १

तूं तर दिसत नाही कुणाला,  घडते मग  कसे ?

कोण हे घडवित असे ?  २

प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष

कोण देई ह्यांत लक्ष ?  ३

त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत

ही किमया असे कुणांत ?  ४

तोच वृक्ष वाढूनी फळे देतो,  फळांत असते बीज

फिरवी कोण चक्र सहज ?  ५

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2104 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..