नवीन लेखन...

बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर

सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर म्हणजे नंदकुमार महादेव नाटेकर यांचा जन्म १२ मे १९३३ रोजी सांगली येथे झाला .

१९५६ मध्ये भारतातर्फे नंदू नाटेकर यांनी पहिले विदेशी बॅडमिंटन विजेतेपद मिळवले .

१९५० ते ७० या काळात भारतीय बॅडमिंटनच्या क्षितिजावर एकच नाव तळपत होते, ते म्हणजे.. नंदू नाटेकर त्याकाळी आपल्या शैलीदार खेळाने नाटेकरांनी बॅडमिंटनमध्ये भारताची ओळख निर्माण केली. देशाबाहेरील स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू. राष्ट्रीय स्पर्धात पुरुष दुहेरीत व एकेरीत मिळून १२ वेळा, तर मिश्र दुहेरीत पाच वेळा त्यांनी अजिंक्यपद मिळवले.हल्ली बॅडमिंटनमधील यशामुळे खेळाडूंना अफाट लोकप्रियता मिळू लागली असली तरी नाटेकर हे भारतीय बॅडमिंटनमधले ‘पहिले सुपरस्टार’ होते असेच म्हणावे लागेल .

आज बॅडमिंटन म्हटले की आजच्या पिढीसमोर नावे येतील ती सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, ज्वाला गट्टा, श्रीकांत किदंबी यांची. थोडे आधीच्या पिढीला दीपंकर भट्टाचारजी, पुलेला गोपिचंद यांची नावे आठवतील. त्याही आधीच्यांना प्रकाश पदुकोण ह्यांचे स्मरण होईल .

१९६१ मध्ये अर्जुन अवॉर्ड मिळवणारे ते पहिले खेळाडू आहेत. मला आठवतंय त्यांच्यावर एक शाळेच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्यावर एक धडा होता. त्यावेळी वाचल्याचे आठवतंय , नंदू नाटेकर आणि सेठ याच्या खेळीबद्दल. सुदैवाने माझ्याकडे नंदू नाटेकर आणि सेठ यांच्या दोघांच्या स्वाक्षऱ्या आहेत.त्यांच्या खेळण्यात अत्यंत अचूकता होती आणि परफेक्ट टायमिंग होते. १९६१ मध्ये भारतामधील सर्वात लोकप्रिय खेळाडू म्ह्णून ठरले होते. नंदू नाटेकर आणि मीना शहा हे मिक्स डबल्समध्ये बँकॉक येथे खेळताना बँकॉक किंग्स इंटरनॅशनल डबल्समध्ये विजयी झाले होते. त्याच टूर्नामेंटमेट मध्ये मेन्स सिगल्समध्येही विजयी झाले होते. तर १९६५ मध्ये जमेकामध्ये झालेल्या कॉमनवेल्थ मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. खरे तर त्यांचे भारतीय बॅडमिंटनमध्ये त्यांचे योगदान ‘ पद्म ‘ पुरस्काराहून मोठे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यांचे चिरंजीव गौरव नाटेकर हेही उत्तम खेळाडू आहेत. अशा नंदू नाटेकर यांना मला भेटण्याची संधी दोन तीन वेळा आमच्या लिजेंट्स क्लब मध्ये मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

– सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 436 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..