नवीन लेखन...

बाल दिनाच्या शुभेच्छा..!

जीवन आता ‘चक्रीवादळ’ बनले आहे, ते निरागस बालपण कोणत्या हवेच्या झुळकेसोबत तरंगत गेलं कळलं पण नाही. ज्या जवाणीच्या हट्टापायी बालपण गमावलं, तीनं तर चक्रव्यूहातचं सोडलं..! ज्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. मागे फिरून पाहिलं की समजतं आयुष्यच वरदान तर बालपणातचं आहे. इंद्रधनुशाच्या सर्व रंगाच्या छटा बालपणातच होत्या. सळसळणाऱ्या नागीन सारखं जीवन मंद मांडुळासारखं झालेलं बघून कुणाला हसू येईल..?

यौन तर इंद्राचा आशीर्वाद म्हणतात, पण का कुणास ठाऊक बालपण आठवलं की तोच ‘शाप’ वाटायला लागतो. मानवी जिवणाच्या चमत्कारांसाठी प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं हे नाटक पूर्ण तर करावंच लागेल.

बालपणी आपल्याला आनंदी व्हावे म्हणून लोकांची गरज नव्हती. समुद्राच्या लाटासारखं निखळ हसणं, आपण या दुनियेचा सिकंदर आहोत असं भासवून जायचं..! आपल्या बोबड्या वाणीनं स्वर्ग सुद्धा चक्क घरात उतरल्याचा आपल्या आईवडीलांनी कित्येकदा अनुभवलाय…!

आता आपण ती व्यक्ती आहोत, जो एकटाच आनंद घेतो, थरच्या वाळवंटात एखादी हिरवी पालवी डोलावी तशी..!
कदाचित इतरांना माझं म्हणणं पटतही नसेल, कारण त्यांच्या आयुष्यात असेल आनंद आजही, जो सर्वांच्याच असतो. पण पूर्ण जवानी सुखात जायला आपण काही राजवंशीय ‘ययाती’ नाहीत. सोमरसाच्या पेल्या बरोबर आयुष्य ढवळत हिंडायला…!

पण बालपण आजच्या विचार करण्यापेक्षा खूप मोठं होत…

लहानपणी इवल्याश्या धडधणाऱ्या हृदयामध्ये उभा आसमंत गिळण्याची आकांक्षा होती. गाई-म्हशींच्या वासरात खेळून प्रेम आणि प्रेम जगणारी आत्मा होतो आपण..! जो आनंद, प्रेम आजच्या ‘पब’मध्ये विकत घेऊनही मिळत नाही..!
तुम्ही म्हणाल मला जीवनाची पूर्णता समजली नाही. समजली तेंव्हाच तर आठवणींचं कालचक्र बालपणाकडे फिरू लागलंय…!

आपण आज काय विचार करता त्यापेक्षा आयुष्य खरंच हळवं होत, अगदी सकाळी अंगणात पडलेल्या कोवळ्या उन्हासारखं..!

आईचे डोळे मिचकावने वेद पुरानांचं ज्ञान देऊन जायचं, वडिलांशी मिठी मारणं म्हणजे खूप मोठ्या विश्वविद्यालयात आल्यासारखं वाटायचं..!

खरंच बालपण आजच्या बनावट दुनियेपेक्षा खूपच निरागस होत…!

©आज

Avatar
About अनिलराव जगन्नाथ 10 Articles
उत्कृष्ट वक्ता, लेखक, ब्लॉगर, राजकीय सामाजिक आर्थिक घडामोडींचा अभ्यासक https://anilraojagannath.blogspot.com/?m=1

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..