नवीन लेखन...

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग अकरा

लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 7

फार बिकट अवस्था होते, रिपोर्ट अॅबनाॅर्मल आणि पेशंट नाॅर्मल असेल तर.
नेमका काय निर्णय घ्यायचा रुग्णाला कळतंच नाही. डाॅक्टर आपली जबाबदारी टाळून मोकळे झालेले असतात. आणि रुग्णाला अगतिकपणे चुकीचा निर्णय घ्यायला भाग पडते. अशी कितीतरी उदाहरणे व्यवहारात पहायला मिळतात. मुतखडे, पित्ताशयातील खडे, युटेराईन फायब्राॅईड पासून अगदी कॅन्सर च्या गाठीपर्यंत, आणि रक्तदाबापासून, ह्रदयरोगापर्यंत साऱ्या रोगाच्या निदानासाठी यंत्रावर अवलंबून रहाण्याची वेळ आली आणि आरोग्याचे आर्थिक गणितही पार कोलमडून पडले. त्यात भर पडली ती, इन्शुरन्सची. कंपन्यांकडून परतावा मिळतो आहे, मग पैशाचा प्रश्न सुटला पण आयुष्यभर औषधांचा खेळ मात्र सुरू झाला.

रोगाच्या दुष्परिणामापेक्षा, औषधांचे दुष्परिणाम जास्त दिसू लागले. आणि आहार वाटीत आणि औषधी ताटात दिसू लागली. म्हणजे आहारापेक्षा औषधांची संख्या वाढू लागली.

पूर्वीची गाणी कशी होती, गायकाला मधे श्वास घ्यायला मिळायला वेळ मिळायला हवा, म्हणून मधेच म्युझिकचा पीस वाजवला जाई. पण आता वाजंत्रीवाल्यांना थोडी विश्रांती द्यावी म्हणून गायकांना मधे मधे तेच तेच अर्थहीन शब्द आळवायला लागतात, तसं काहीसं झालंय. सतरा अठरा औषध घ्यायची. त्यानेच पोट भरते. एवढी औषधे गिळायला परत तेवढेच पाणी पण पाजवले जाते. गरज नसताना अवयवांना अनावश्यक कामाला लावले जाते. औषधे उष्ण पडू नयेत म्हणून दर दोन चार तासांनी काहीतरी खाण्याचा सल्ला शिरसावंद्य मानला जातो आणि पोटावर अत्याचार सुरू होतो.

एवढं सगळं सोसूनही मला त्याचा विशेष त्रास होत नाहीच.
कारण “तो”. आपल्यापेक्षा त्याला आपली जास्त काळजी आहे.
माझं, माझ्याकडे तरी लक्ष कुठाय ? हे सगळे अत्याचार पाहिले की खरंच “तो” आहे, याची खात्री पटते. नाहीतर एवढे सगळे अत्याचार सोसूनही मी मात्र सतत धावतोच आहे. नाॅर्मल होण्यासाठी …..

तो कस्तुरी मृग कसा सैराट होऊन धावतो, कस्तुरीच्या गंधाचा ठाव घेण्यासाठी. पण शेवटपर्यंत त्याला कळत नाही. तो सुगंध माझा मीच निर्मिलेला होता. फक्त तो मला कळत नव्हता. तसं आरोग्याचं झालंय. माझं आरोग्य माझ्यातच हरवलंय, माझ्या अज्ञानामुळे हरवलंय आणि मी मात्र माझा आयुर्वेदाचा दृष्टीकोन हरवून रानोमाळ दिशाहीन भटकतोय,
सैराट होऊन….

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.02.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..