नवीन लेखन...

आवाहन

भारत हा सर्वधर्म समभाव मानणारा लोकशाही देश आहे आणि म्हणून भारतात सर्व जाती, धर्म व पंथांचे सण, उत्सव व समारंभ आज कैक वर्ष सद्भावनेने होताना दिसतात. परंतू सण, उत्सव व समारंभाच्या आनंदात कळत न कळत आपल्याकडून कुठलेना कुठले प्रदुषण होत असते. हे टाळण्यासाठी नाईलाजाने शासनाला कायद्याचे बंधन घालावे लागते. सण, उत्सव किंवा मोठमोठाले समारंभ साजरे करताना कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होणार नाही याची प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपली तर सरकारलाही जाचक कायदे करावे लागणार नाहीत आणि आपापले सण, उत्सव व समारंभ आनंदाने साजरे करता येतील कुठेही कटुता येणार नाही आणि आपापसातील भांडण तंटयाला जागा राहाणार नाही.गणपती व नंतर येणार्‍या नवरात्र उत्सवात घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी अनुक्रमे श्री गणेशाच्या व देवींच्या मूर्तींची स्थापना होत असते. असे बघण्यात येते की अजूनही बरेच गणेश व देवीभक्त पीओपीच्या मूर्ती घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी पूजनास ठेवतात तसेच सजावटीसाठी पीओपी किंवा थर्माकॉलचा वारेमाप उपयोग केला जातो. गणेशाच्या किंवा देवीच्या मूर्ती विसर्जनाबरोबर सजावटींचेसुद्धा समुद्र नद्या तळी व विहीरीत विसर्जन केले जाते. सण व उत्सवाचा आनंद लुटत असताना कुठल्याही प्रकारचे प्रदुषण आपल्याकडून होणार नाही याचे सामाजिक भान ठेवायला हवे. यासाठी गणेशाच्या देवीच्या व सजावटीमधील मूर्ती ठरवून इकोफ्रेन्डली बनवून घेतल्यास समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवता येईल. सजावटही पुठयाची फुलांची किंवा कागदाच्या लगद्यापासून केलेल्या वस्तूंपासून करून प्रदुषण होणार नाही याकडे लक्ष देता येईल. दरवर्षी शासन मुंबई महापालिका सामाजिक संस्था व सर्व प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमाव्दारा वरील विषयी समाजात जनजागृति करण्यात येते पण ती नुसती ऐकून व बघून सोडून दिली जाते.जाहिराती ि
वा कुठल्याना कुठल्या कारणांसाठी मोठमोठया फ्लडलाईटचा उपयोग करण्यात येतो. त्यातच दिव्यांच्या आरासासाठी सण उत्सव व जंगी समारंभात मोठया प्रमाणत

वीजेची मागणी वाढलेली असते. वाढलेल्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी अखंड वीजेचा पुरवठा होणे गरजेचे असते. विज निर्माण करण्यासाठी पारंपारीक किंवा अपारंपारीक उर्जा स्त्रोतांचा उपयोग सर्व देशभर करण्यात येतो. विज निर्माण करण्यासाठी लागणार्‍या इंधनाचा पुरवठाही नित्यनेमाने होताना दिसत नाही. विज निर्मितीसाठी इंधन आयात करावे लागते व त्याचे भावही कडाडले आहेत. मुख्य म्हणजे विज निर्माण करण्यासाठी इंधन जळाल्याने उष्णतेच्या उत्सर्जनाचे हवेतील प्रमाणात वाढ होताना दिसते. महाराष्ट्रात सर्वत्र विजेच्या अपुर्‍या पुरवठयामुळे बर्‍याच गावखेडयात विजेचे भारनियमन चालू आहे. याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्यासाठी विज मिळत नाही कारखान्यात उत्पादन कमी निघते विजेवर अवलंबून असणार्‍या सर्व व्यवसायांवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि याने देशाची प्रगतिला आळा बसतो तसेच उत्पादनाचा आलेख घसरतो.वरील वीजनिर्मितीच्या मागणी व पुरवठयाच्या समस्येचे निराकारण करण्यासाठी एक विचार मनात आला तो मांडल्यावाचून राहावत नाही तो असा. आपल्या देशात जवळ जवळ ९ ते १० महिने चांगले हवामान असते. स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. केंद्र व राज्य शासनाच्या ऊर्जा पेट्रोलियम व वित्त मंत्रालयास या पत्राव्दारे अशी विनंती कराविशी वाटते की जसे इंधनात (पेट्रोल, डिझेल व रॉकेल इ.) सबसिडी देतात तशी सबसिडी सोलार पॅनल्सचे उत्पादन करणार्‍यांना द्यावी व प्रोत्साहित करावे. तसेच सोलार पॅनल्स बनविण्यासाठी आयात करावा लागणार्‍या कच्च्या मालाच्या सिमाशुल्क व इतर कर रद्द करावेत. सोलार पॅनल्स्चे उत्पादन देशात केल्याने रोजगार निर्मितीत भर पडेल. सोलार पॅ ल्
स् आयात करावे लागणार नाहीत. सोलार पॅनल्स् कमी दरात किंवा भाडे तत्वावर उपल्बध करून द्यावेत. किंवा आयात करण्यासाठी कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करावा. याचे फायदे खाली प्रमाणे,१. मुख्य म्हणजे विजनिर्मिती करताना होणारे प्रदुषण शुन्यटक्के असेल२. उर्जेची गरज भागविली गेल्याने भारनियमन टळेल३. शेतकरी व विजेवर अवलंबून असणारे व्यवसाय सुरळीत चालतील मुख्य म्हणजे शेतकर्‍यांच्या आत्महत्या टळतील,४. मागणी व पुरवठयातील तफावत दूर होण्यास मदत होईल,५. विजनिर्मितीसाठी कमी इंधन आयात करावे लागेल, चलनात बचत,६. पारंपारीक उर्जेची मागणी कमी झाल्याने विजेची बचत होईल म्हणजेच जास्तची विज दुसर्‍या कार्यासाठी वापरता येऊ शकेल,७. स्वस्तात विजनिर्मिती होऊ शकेल, विजेच्या दरात कपात करता येईल,८. सगळयाच स्थरावर वीजेवर होणारा खर्च टाळता येऊ शकेल.श्री गजाननाला स्मरून येत्या गणेशोत्सवापासून ग्रीनगणेशाच्या स्थापनेचा श्रीगणेशा करू तसेच इतर प्रदुषण टाळण्याचा प्रयास करू. जय गणेश.जगदीश पटवर्धन वझिरा बोरिवली (प.)

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..