नवीन लेखन...
Avatar
About विश्वास दात्ये
vishwasdatye@gmail.com | +९१ ९८५००३५३६२,

अकल्पित 

साधारण दहा अकराची वेळ असावी. रविवार सकाळ. वर निळेशार आकाश. मध्येच एखादा पांढऱ्या ढगाचा ठिपका. दोन घरी अगदी संथपणे लांब उंचावर घिरट्या घालत होत्या. एकूणच शांत वातावरण होते. वाऱ्याची एखादी मंद आल्हाददायक झुळूक मधूनच जाणवत होती. त्या झुळुकेवरून आतील कॅन्टीनमधून बनणाऱ्या आमलेटचा खमंग सुखद वास तेथील पोहोणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत होता. […]

क्वालिटी : क्लॉक रेडिओची कथा

त्या वेळेला आम्हाला क्लॉक रेडिओ डिझाईन करायचा अनुभव नव्हता. हा रेडीओ बाजारात [मार्केटमध्ये] लवकर आणता यावा म्हणून आम्ही आमच्याच कंपनीने परदेशात असाच एक क्लॉक रेडीओ डिझाईन करून त्याचे उत्पादन पण सुरु केले होते, त्याची मदत घ्यायची ठरवली. त्यांनी त्या रेडीओ मध्ये electric supply frequency ची मदत घेऊन त्यातलं घड्याळ चालवलं होत, तिकडे इलेक्ट्रिक सप्लायची कंपनसंख्या [electric supply frequency] खूपच स्थिर असल्यामुळे हे शक्य झालं होते. […]

गुपित

हा एक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आता निवृत्त झालेल्या शाळामित्रांचा ग्रुप आहे. महिन्यातून एकदा तरी क्लबवर निवांतपणे भेटतो. थोडंसं इकडचं तिकडच बोलणं आणि बिअरच्या फेऱ्यां झाल्यानंतर ग्रुपचा मूड एकदम रिलॅक्स झाला होता. कालीला फक्त रमच लागते. बाकीचे मित्र इतके चोखंदळ नाहीत. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..