नवीन लेखन...

क्वालिटी : क्लॉक रेडिओची कथा

आजकाल आपल्या बऱ्याच उपकरणांमध्ये अगदी अचूक वेळ दाखवणारे इलेक्ट्रोनिक घड्याळ [क्लॉक] असते. संपूर्ण वर्षात ते फारतर एखादे मिनिट मागेपुढे होते. piezoelectric crystals त्यात वापरले जात असल्यामुळे हे शक्य झाले आहे.

गमतीचा भाग असा आहे की पूर्वी पुढारलेल्या देशात piezoelectric crystals वरचा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रोनिक घड्याळामध्ये [electronic clocks] घरात वापरलेल्या विजेतील कंपनांचा [electric supply frequency] वापर [रेफरन्स] घेतला जात असे. त्या देशांमधून हे शक्य होत असे कारण त्या देशात विजेच्या सप्लाय मधली कंपने [frequency] अगदी स्थिर असायची. त्यामुळे ईलेक्ट्रोनिक घड्याळे बऱ्यापैकी अचूक वेळ दाखवत असत. अर्थात पुढे मात्र ह्या देशात सुद्धा piezoelectric oscillators  वापरले जाऊ लागले ज्यामुळे घड्याळांची अचूकता अजून खूपच वाढली.

जगात सर्वत्र इलेक्ट्रिक सप्लाय ची कंपनसंख्या [frequency] दर सेकंदाला ५० किंवा ६०  अशी असते, ज्याला Hertz असं म्हणतात. भारतात ती कंपनसंख्या ५० इतकी असते. खूप लोकांना या  frequency ची फारशी कल्पना पण नसते. शिवाय ती बऱ्याचवेळा तंतोतंत ५० इतकी नसते. जी सतत थोडीफार बदलत असते. आपल्याला फक्त व्होल्टेज माहिती असतं, जे भारतात २३० व्होल्ट असतं.

इलेक्ट्रोनिक क्लॉक बद्दल बोलताना मला एक अनुभव आठवतो, जो मला चांगला धडा शिकवून गेला. मी एका मोठ्या बहुराष्ट्रीय [multinational] कंपनीत भारतात काम करत होतो. ही कंपनी सर्व प्रकारच्या ऑडीओ व्हिडीओ उत्पादनांची [products] निर्मिती करत होती. कंपनीने एका क्लॉक रेडिओचे  उत्पादन करायचे ठरवले, भारतात हे प्रथमच होणार होते. हा क्लॉक रेडीओ त्याच्या आतल्या electronic clock मुळे तुम्ही सेट केलेल्या वेळेनुसार चालू किंवा बंद होणार होता. तो वेळ दाखवायचा, त्यात गजर सुद्धा लावता येईल अशी सोय होती.

त्या वेळेला आम्हाला क्लॉक रेडिओ डिझाईन करायचा अनुभव नव्हता. हा रेडीओ बाजारात [मार्केटमध्ये] लवकर आणता यावा म्हणून आम्ही आमच्याच कंपनीने परदेशात असाच एक क्लॉक रेडीओ डिझाईन करून त्याचे उत्पादन पण सुरु केले होते, त्याची मदत घ्यायची ठरवली. त्यांनी त्या रेडीओ मध्ये electric supply frequency ची मदत घेऊन त्यातलं घड्याळ चालवलं होत, तिकडे इलेक्ट्रिक सप्लायची कंपनसंख्या [electric supply frequency] खूपच स्थिर असल्यामुळे हे शक्य झालं होते.

थोड्याच दिवसात आम्ही आमचा लोकल क्लॉक रेडिओ विकसित केला. इथे आम्ही पण आमच्या परदेशातल्या कंपन्यांप्रमाणे इलेक्ट्रिक सप्लायची कंपनसंख्येची मदत आमच्या रेडिओच्या आतल्या घड्याळाची वेळ दाखवण्यासाठी घेतली.

प्रयोगशाळेत ह्यावर आमचे प्रयोग चालू असताना आमच्या असं लक्षात आलं की आमचे घड्याळ अचूक वेळ दाखवत नाहीये, पुढे मागे होतंय. त्याची कारणे तपासताना असं लक्षात आलं की भारतात इलेक्ट्रिक सप्लायची कंपनसंख्या जी  ५० हर्ट्झ अशी स्थिर असायला हवी, तशी नसते, १ किंवा २ टक्के पुढे मागे होते.

आमच्यापैकी काही जणांचं असं मत पडलं की आपण इलेक्ट्रिक सप्लायच्या कंपनसंख्येचा आधार घेण्याऐवजी पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टल च्या कंपनाचा वापर करू या ज्यामुळे घड्याळाची वेळ अचूक दाखवली जाईल.

गम्मत म्हणजे आमच्याचपैकी काही जणांचं असं म्हणणं पडलं की आपली बहुराष्ट्रीय  कंपनी आहे, जे आपली  कंपनी परदेशात आचरणात आणते आहे तेच आपण करावं, म्हणजेच आपण इथे पण इलेक्ट्रिक सप्लायच्या कंपनसंख्येचा उपयोग क्लॉक रेडिओ मध्ये केला तर त्यात चूक काय. आणि स्थिर कंपने असणारा सप्लाय देणे हे इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीचे काम आहे, त्यांनी स्थिर frequency दिली तर आपल घड्याळ पण अचूक वेळ दाखवेल, जर सप्लाय कंपनी ती कंपने स्थिर देत नसेल तर ती नक्कीच आपली जबाबदारी नाही, कारण आपण आपला प्रॉडक्ट दिलेल्या स्पेसिफिकेशन प्रमाणेच बनवलेला आहे.

लवकरच इलेक्ट्रिक सप्लायची कंपनसंख्या प्रमाणभूत मानलेला आमचा क्लॉक रेडिओ बाजारात आणला गेला. आम्हाला जी भीती वाटत होती तीच खरी ठरली. ग्राहकांच्या तक्रारींचा आमच्यावर पाऊस पडू लागला, ग्राहकांनी नाकारलेले क्लॉक रेडिओ परत येऊ लागले. सगळ्यांनी तक्रार एकच होती, ती म्हणजे घड्याळ अचूक वेळ दाखवत नाहीये.

त्याचे कारण काहीही असो, पण ग्राहकांच्या मते चांगला प्रोडक्ट देणे ही उत्पादकाचीच जबाबदारी आहे. परिणाम म्हणून कंपनीला घाईघाईने आपल्या डिझाईनमध्ये बदल करावा लागला. वेळ अचूक दाखवण्यासाठी आम्हाला घड्याळात पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टलच्या  कंपनांचा वापर करावा लागला. आम्ही समोर ठाकलेल्या समस्येतून बाहेर पडलो हे जरी खरे असले तरी हा धडा नक्कीच खर्चिक झाला होता.

मित्रानो, आम्ही क्वालिटी मॅनेजमेंट आणि ग्राहकांचे समाधान ह्याच्या बाबतीत मोठी गल्लत करत होतो हे आमच्या लक्षात आलं.

म्हणूनच क्वालिटीची व्याख्या अशी करता येते की ग्राहकाच्या गरजेनुसार बनवलेल्या स्पेसिफिकेशनची परिपूर्णता करणे.  मग ह्या गरजा ग्राहकाने सांगितलेल्या असोत की त्याच्या मनातल्या असोत. तो प्रोडक्ट किंवा ती सेवा प्रत्यक्ष ज्या परिस्थितीत वापरला जातो अथवा वापरली जाते त्या परीस्थितीत वापरण्यास योग्य करणे.

– विश्वास दात्ये

Avatar
About विश्वास दात्ये 3 Articles
vishwasdatye@gmail.com | +९१ ९८५००३५३६२,

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..