नवीन लेखन...

सुरात गुंफले शब्द प्रेमाचे

सुरात गुंफले शब्द प्रेमाचे ऋणानुबंध असतात जन्मोजन्मीचे, भाव सुंदर सुखद असतो मनी भेट आपुली साहित्यिक वरुनी.. नसेल नाते आपुले काही प्रेम भाव असेल मन मंदिरी, प्रेमळ काव्य करते स्वाती रसिकहो आनंद असावा कायम हृदयी.. — स्वाती ठोंबरे.

हळव्या होतात भावना

हळव्या होतात भावना तेव्हाच मनाला मोह होतो रे, साद नसेल तुझी काही तरी भावनेचा बहर खुलतो रे.. मोकळी वाट अनामिक तुझा अंतरी भास होतो रे, न भेट मुग्ध तुझी होणार कधी मन स्पर्शी तुझा भास मोहरतो रे.. दरवळे मोगरा गंधित फुलं इवले ते नाजूक रे, तुझ्या शब्दांचे चांदणे सख्या तुझ्यात मी गंधाळून रे.. आल्हाद रवी अस्तास […]

एक दिवस तुझी अन माझी गाठ पडावी

एक दिवस तुझी अन माझी गाठ पडावी अलवार भावनांची मेळ सहज जुळावी मन ओढ ओली हळवी तुझ्यात सांज फुलावी माझ्या मनाची तुझ्या मनाशी वीण जुळावी हात तू माझा हातात अलगद घेऊनी अंतरतील दुःखरी नस तुला कळावी घट्ट मिठीत तुझ्या मी ओथंबून रडावी तुझ्या मिठीत आर्त व्याकुळ मी मोहरावी न कसला पाश न जाणिव कसली रहावी तुझ्या […]

तुझ्या मिठीत सख्या

मी बेधुंद जराशी व्हावी स्पंदने हलकेच अधरी अंतरात उलघाल व्हावी घेशील मज तू कवेत जेव्हा चांदण सडा अंगणी बरसला लाजेल मी अलगद गाली तेव्हा तू ही सख्या हलकेच मोहरला स्पर्शीले तन आल्हाद तू बहरल्या रोमांचित खुणा ओठ ओठांनी टिपले तू साखर चुंबनाचा गुलाबी गोडवा अलवार मिठीत तुझ्या वेढून घे अलगद तू मजला स्पर्श मलमली गुंतून मोहक […]

प्रश्न पडतात अनेक काही

प्रश्न पडतात अनेक काही त्याची उकल होतं नाही, भाव साठतात हृदयात त्याची उत्तरं मिळतं नाही.. सूर ताल लय चुकतात पण शब्दांची मात्रा चुकतं नाही, अर्थही बदलतात सारे कधी पण भावनांची व्यथा कळतं नाही.. कवी कल्पनेत रंगवतो सदा दुनिया खरी आणि खोटी, शब्दही कवीचे मिटतात मग स्वार्थाची दुनिया पाहून खरी.. भाव विश्व सारे उभारतो कवी काव्यांतून नेहमी, […]

सगळं काही थांबू शकतं

सगळं काही थांबू शकतं पण मन थांबत नाही, किती आवरायचं म्हणलं तरी मन सावरत नाही.. विसरायचं सार सहज म्हणलं तरी मनाला कळतं नाही, गुंतायचं नाही म्हणलं तरी मनाच गुंतण सुटतं नाही.. कितीक समजावे बुद्धीने परी मनापुढे बुद्धी चालतं नाही, मोह अंतरीचे सोडायचे मोहक तरी मनाला काही ते कळतं नाही.. द्वंद अनेक चालती अलगद अंतरी परी मन […]

मौनातील काजळ वेदना

मौनातील काजळ वेदना निःशब्द हृदयात सलते अनेक दुःखाचे पड आयुष्यात भोग भोगूनी रडवुनी जाते.. सहज साधे काहीच कधी नसते आयुष्य कळसूत्री बाहुली असते, मन रडते उन्मळून आवेगात जीवन ही काटेरी झाडं बनते.. आयुष्य ही टोकास सहज जाते नशीब जेव्हा वाईट असते, कधीच सुखद झुळूक नसते तप्त बोलांचे घाव जिव्हारी उठते.. नशिबाच्या ललाटी खेळ रंगतो आयुष्य उध्वस्त […]

आयुष्यात कधी केव्हा

आयुष्यात कधी केव्हा काही अकल्पित घडतं, नियतीच्या हातातील सूत्र अचानक मग बदलतं.. काळ नावाचा घाला अवचित आयुष्यात येतो, होत्याचं नव्हतं एका क्षणात सगळं होतं.. नशीबापुढे माणूसही हतबल असह्य होतो, जितकं असेल जीवनात तितकचं दान पदरी पडतं.. क्षणभंगुर आयुष्य सारं शाश्वती कसलीच नसते, आज आहे तर उद्याची खात्री नक्कीच नसते.. भोग असतात जीवनात भोगून जायचे असतात, चार […]

व्याकुळल्या भावनांना काव्याचा

व्याकुळल्या भावनांना काव्याचा मोहर हलकेच अंतरी फुलला तो बहर अवचित गंधित तुझा अन जीव माझा धुंद झाला.. ती सांज ओढ कातर क्षणाची जीव तुझ्यात नकळत धुंदावला आरक्त लोचनात थेंब अश्रूचा अलगद दुःख मिटवून गेला.. का बहरल्या दग्ध चेतना प्राजक्त हलकेच होरपळला न फुलल्या कळ्या काही वेदना मनात अबोल उरल्या.. काव्यांचे प्रेम शब्दांवर सजले काव्यांत जीव आल्हाद […]

शारीरिक जखम बरी होते

शारीरिक जखम बरी होते पण मनाचं दुखणं गहिर असतं भावना खेळणं सहज होतं पण मनाचं तुटण जिव्हारी घडतं.. मनातल सगळंच बोलता आलं असत तर मोकळं आभाळ भरलं नसतं सगळंच जर हृदयातलं कळलं असतं तर मनालाही रडावं वाटलं नसतं.. भावनेत ओलं हळवं होणं सहज अलवार होत असतं मनाच्या तारा छेडल्या हलकेच तर दुःख सहज मोकळं होतं.. कुणी […]

1 7 8 9 10 11 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..