नवीन लेखन...
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

किचन क्लिनीक – काही दुधांचे उपयोग भाग २

ब) म्हशीचे दुध: १)भस्मक रोगात किंवा जेव्हा अतिभूक लागते व काही खायला न मिखाल्याच त्रास होतो तेव्हा नियमीत आहार मध्ये म्हशीचे दुध,तुप,लोणी हे पदार्थ असावेत. २)रात्री शांत झोप लागण्याकरिता म्हशीच्या १ ग्लास दुधात १/४ चमचा जायफळ घालून उकळावे व खडीसाखर घालून हे दुध प्यावे. ३)ज्या पुरूषाचे पुरुष बीज प्रमाण कमी असते त्यांनी आहारात म्हशीचे दुध,तूप व […]

किचन क्लिनीक – तांदुळ

५)भाताच्या लाह्या: पचायला हल्क्या, पथ्यकर,तहान शमविणाऱ्या,त्रिदोष शामक,गोड,थंड गुणाच्या,अम्लपित्त,उल्टी,मळ मळ ह्यात उपयुक्त. ६)ओदन(भात): नवीन तांदुळाचा भात पचायला जड,कफकर,कुकर मधला पाणी मुरवून केलेला भात देखील पचायला जड,शरीरात चिकटपणा निर्माण करणारा,कफकर असतो. पाण्या तांदुळ शिजवून वरचे पाणी काढून टाकले कि तो भात गोड,पचायला हल्का असतो. ताकात शिजवलेला भात वातनाशक,कफ पित्तकर असून मुळव्याधीत पथ्यकर आहे. भाजलेल्या तांदुळाचा भात रूचीकर,कफनाशक,वात पित्त नाशक,पचायला […]

किचन क्लिनीक – गहू

पंजाब मध्ये प्रमुख आहार घटक असलेले हे धान्य कधी आपण कोकण गोवा प्रांतीय मंडळींनी आपलेसे केले हे आपले आपल्यालाच समझले नाही. तरी आता आपल्या प्रदेशामध्ये देखील बरीच मंडळी वेगवेगळ्या स्वरूपात ह्याचे सेवन करताना पण पहातो.जसेरवा,सांजा,पिठ,खीर,पुरी, चपाती,पराठा,लाडू इ. म्हणूनच ह्या गव्हाचे गुण धर्म आपण ह्या सदरात पाहुया. गहू चवीला गोड,थंड,पचायला जड,स्निग्ध,सारक,वात पित्त नाशक,कफकर,बलकारक,वजन वाढविणारे,मोडलेले हाड सांधायला मदत करणारे […]

किचन क्लिनीक – काही दुधांचे उपयोग

अ) गाईंचे दुध: १)गुळवेलीच्या काढ्यात गाईंचे दुध घालून काढा आटे पर्यंत दुध उकळावे व ताप येत असणाऱ्या व्यक्तींचा पिण्यास द्यावे. २)पोटात काही गंभीर आजारामुळे पाणी झालेल्या रूग्णाला इतर औषधांसोबतच नियमीत गाईचे दुध पाजावे फायदा होतो. ३)पोटात आग होणे,पोट दुखणे,काही खाल्ल्यावर बरे वाटणे ह्या तक्रारीमध्ये कोमट दुध,खडी साखर व गाईचे तूप हे मिश्रण दिवसातून ४ वेळेस थोडे […]

किचन क्लिनीक – तांदुळ

कोकण गोवा केरळ प्रांतातील जनतेचे आहारामधील प्रमुख घटक होय.ह्याचा नुसता भातच नव्हे तर ह्या पासून अनेक पदार्थ बनविले जाता जसे पुलाव,बिर्याणी,साखरभात, घावन,इडली,डोसे,भाकरी,पायस इ.आणी प्रत्येक रूपात ह्याची चव अप्रतीम लागते. ह्याचे उकडे,सुरे असे दोन प्रकार असतात.तसेच ह्याच्या अनेक पोटजाती देखील असतात जसे कोलम,सोनामसुरी,बलम,बासमती इ.आणी हो प्रत्येक तांदुळाची चव वेगळी लागते बरं का. सर्व प्रकारच्या भातामध्ये साठे साळी […]

किचन क्लिनीक – काही दुधांचे गुणधर्म

आयुर्वेदामध्ये अनेक दुधांचे गुणधर्म सांगितले आहेत.पण त्यातील जे दुध मानव प्राणी प्यायला वापरतो तेवढ्याच दुधांचे गुणधर्म आपण ह्या लेखात पहाणार आहोत. १)गाईंचे दुध: हिचे दुध चवीला गोड,थंड,स्निग्ध,पचायला जड,शरीरात क्लेद व चिकटपणा अल्प प्रमाणात निर्माण करते,कफकर,वातपित्त कमी करणारे, संडासला व लघ्वीला सुकर करणारे,मानसिक आजारबरेकरणारे,दाहनाशक,शक्तिवर्धक, विषनाशक(असे म्हणतात कि जर गाईने चुकून एखादी विषारी वनस्पती खाल्ली तरी त्याचे विष हे गाईच्या […]

किचन क्लिनीक – दुध

दुध हे पुर्णान्न आहे पण देशी गाईचेच बरं का! देशी गाईमध्ये देखील गीर हि प्रजाती जी मुळ गुजरात येथील आहे तिचे दुध सगळ्यांपेक्षा गुणांनी श्रेष्ठ आहे. देशी गायीचे दुध हे तुलनेने  भरपूर गुणांनीयुक्त,पचायला हलके, स्निग्धांश कमी असणारे असे असते. लहान मुलांना देखील काही कारणाने आईचे दुध मिळत नसेल तर पावडरचे दुध घालून त्यांचे पोट खराब करण्यापेक्षा गाईंचे […]

किचन क्लिनीक – अक्रोड

अक्रोडाचे स्वरूप जर आपण पाहिले तर अगदी मानवी कवटी व मेंदूशी साधर्म्य असणारे वाटते. अक्रोडाचा वापर खायला,तेल काढायला तसेच अक्रोडाचा वापर स्क्रब म्हणून देखील केला जातो. अक्रोड चवीला गोड,उष्ण,स्निग्ध,पचायला जड असून वातदोष कमी करणारे व कफपित्त वाढविणारे आहे.हे शुक्रधातू वाढवितात,,वजन वाढायलामदतकरतात.पौष्टीक,बलकारक, हृदयाला हितकर असतात. अक्रोड खाल्ल्याने मेंदूची ग्रहण शक्ती वाढते व बुद्धि चांगली होते म्हणूनच लहान […]

किचन क्लिनीक – बदाम

आपण प्रत्येक जणच बदामाचे फॅन आहोत.अगदी लहान पणा पासूनच आपले नाते ह्याच्याशी जोडले जाते.लहान मुलांना बदाम पाण्यात भिजत घालून दुधात उगाळून देतात.परिक्षेच्या काळात अभ्यास चांगला लक्षात रहावा म्हणून आई मुलांना बदाम खायला देते. बदामाचा शीरा,बदाम खीर,बदाम तेल,बदाम पाक असे बरेच प्रकारे बदाम आपण वापरतो.मिठाई मध्ये सजावटी करिता देखील ह्याचा वापर केला जातो. चला मग बदामाचे गुणधर्म […]

किचन क्लिनीक – जवस

जवस हे तेल बीज चवीला गोड,कडू,उष्ण असते.हे स्निग्ध,पचायला जड असते.हे शरीरातील कफ व पित्त दोषाचा नाश करतात व वातदोष वाढवितात. जवसाचे बी हे डोळ्यांच्या आरोग्यास अहितकर असते.तसेच ते शुक्रधातूचा नाश करते. ह्या जवसामधील ओमेगा ३ फॅटी अॅसीड्स हे हृदयाचे आरोग्य उत्तम राखायला मदत करतात.तसेच शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर ती देखील जवस वाढायला मदत करतात. जवसाची […]

1 8 9 10 11 12 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..