नवीन लेखन...

किचन क्लिनीक – दुध

दुध हे पुर्णान्न आहे पण देशी गाईचेच बरं का!

देशी गाईमध्ये देखील गीर हि प्रजाती जी मुळ गुजरात येथील आहे तिचे दुध सगळ्यांपेक्षा गुणांनी श्रेष्ठ आहे. देशी गायीचे दुध हे तुलनेने  भरपूर गुणांनीयुक्त,पचायला हलके, स्निग्धांश कमी असणारे असे असते.

लहान मुलांना देखील काही कारणाने आईचे दुध मिळत नसेल तर पावडरचे दुध घालून त्यांचे पोट खराब करण्यापेक्षा गाईंचे दुध पाजावे.असे म्हंटलेच आहे ना माय नसेल तिथे गाय आहे.आणी कसा योगायोग आहे पहा ना आई जशी आपल्या बाळाला पोटात ९ महीने वाढवते तशी गाय देखील ९ महिन्यांनीच व्याते.

आपल्या भारतीय संस्कृतींत गाईला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे ते काही उगाच नव्हे.गाय हि खरोखरच पुजनीय आहे.असे म्हणतात कि गोमातेची सेवा केल्याने सर्व पापकर्मांचे क्षालन होते.तसेच गाईच्या उदरात ३३ कोट देव वसतात असे म्हणतात.

गाईंचे दुधच नव्हे तर मुत्र,शेण हे देखील औषधी गुणधर्म युक्त आहे.गाईच्या वाशिंडावर जी सुर्य किरणे पडतात त्याचे रूपांतर सोन्यामध्ये होते आणी ह्या सोन्याचे अंश गाईच्या दुधात सापडले आहेत हे संशोधनाने सिद्ध झाले आहे.  त्यामुळेच देशीगायीचे दुध हे पिवळया रंगाचे असते.

आधुनिक विज्ञानाच्या संशोधनातून असे आढळले कि देशी गाईच्या दूधामध्ये A-2 protein आढळते जे आपल्या आरोग्याला अत्यंत फायदेशीर आहे.

पण आपल्या देशाची विवंचनाच अशी आहे कि आपण हातचे सोडुन पळत्याच्या मागे धावत असतो.आणी ह्याच मुळे आपल्याला आपले अस्तित्व गमवायची पाळी आली आहे.होय बरोब्बर ओळखलेत तुम्ही माझा रोख कुठे आहे तो.

२५-३० वर्षांपूर्वी आपल्या देशांतील सरकारने काय केले. दुधाचे उत्पादन वाढवावे म्हणून जर्सी हा प्राणी आपल्या देशात आणला आणी त्याची बिजं आपल्या देशांतील दुग्ध उत्पादन क्षेत्रात रोवली.  आपण सगळे जर्सी गाय असे म्हणता पण मी त्याला फक्त एक प्राणीच म्हणेन कारण ज्या प्राण्याच्या शरीरात दुध उत्पादन वाढावे म्हणून डुक्कर ह्या प्राण्याचे जीन्स रोवले आहेत त्याला आपण गाय नाही ना म्हणू शकत.आणी ह्या जर्सीचे दुध हे दुध नसून दुधाच्या रूपातले सफेद विष आहे जे आपल्या देशांतल्या पिढीच्या रक्तात इतकी वर्षे भिनले आहे आणी आता ते आपले जहाल रूप दाखवू लागले आहे.थोडक्यात काय जर्सी ह्या पुतनामावशीचे विषारी दुध आपल्या देशांतील बाळकृष्ण दुध म्हणून पित आहेत किंबहुना आपल्या देशांतील यशोदा माताच त्यांना हे पाजत आहेत.तर सांगायचा मुद्दा हा कि जर्सीचे दुध हे slow poison आहे.

जर्सीच्या दुधात असणारे A-1 protein हे त्यामागील खरे कारण आहे.ह्याच प्रथिनामुळे जर्सीचे दुध हे विषारी बनले आहे .आणी त्यामुळे हे दुध पिऊन कर्करोग, डायबेटिस ,हृदयविकार,  मानसिक आजार,नपुंसकता इ अनेक भयानक रोग आपल्या देशात वाढले आहेत.खरं वाटत नसेल तर विचार करून बघा.

आता पुढे अजून हानी व्हायच्या आत आपण सर्वांनी शहाणे होऊया.आणी हे जर्सीचे दुध पिणे थांबवून देशी गाईंचे दुंध पिऊया.आपण सर्वांना माझी हि कळकळीची विनंती आहे कि देशी गाईचेच दुध प्या व आपल्या मुलांना पाजा.गाईचे दुध मिळत नसेल म्हशीचे प्या पण जर्सीच्या दुधापासून लांब रहा.

दुध ह्या विषयी पुढील माहिती देण्या आधी मला आपणा सर्वांना जागृत करणे गरजेचे वाटले म्हणून हा लेख.

(क्रमश:)

(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४

वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर 202 Articles
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..