नवीन लेखन...
प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २३

भगवान श्रीहरीच्या कमरेचे आणि त्यावरील मेखलेचे लोकविलक्षण सौंदर्य वर्णन केल्यानंतर आचार्य श्रींची प्रेम दृष्टी आणखी थोडी वर जाते. आणि त्यानंतर ती ज्या आनंद कल्लोळात डुबकी मारते ते स्थान म्हणजे भगवंताची नाभी. त्या आनंद कुंडाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २२

भगवान श्रीहरीच्या पीतांबरा चे वर्णन केल्यानंतर त्यावर कसलेल्या कंबरपट्ट्याकडे स्वाभाविकच लक्ष जाते. भगवान श्रीहरीच्या कमरेवर विराजमान त्या दिव्य मेखाले चे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री करीत आहेत. […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १९

भगवान श्रीवैकुंठनाथ श्रीहरीच्या विविध अवयवांचे अलौकिक वैभव वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज या श्लोकांमध्ये भगवंताच्या गुडघ्यांचे वर्णन करीत आहेत. […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १८

भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे वर्णन केल्यानंतर आता थोडे वर सरकत आचार्य श्री भगवंताच्या पिंढऱ्यांचे म्हणजे घोट्यापासून गुडघ्यापर्यंतच्या भागाचे वर्णन करीत आहे. या भागाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे देवी लक्ष्मी सतत या भागाला आपल्या हस्त कमलाने हळूवार चुरत असते. त्यामुळे त्यापासूनच आरंभ होतो. आचार्य श्री म्हणतात, […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १७

भगवान श्री वैकुंठनाथांच्या अनुपमेय चरणतलाचे, चरणांगुलींचे मनोहारी वर्णन केल्यानंतर आता आचार्यश्री त्या चरणांच्या वरच्या भागाचे वर्णन करीत आहेत. बोटां पासून घोट्यापर्यंत मध्ये जो उंचवटा आहे त्याचे वर्णन त्यांनी प्रस्तुत श्लोकात केलेले आहे. […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १६

भगवान श्रीविष्णूच्या चरणकमलांचे वर्णन करताना, त्यातही त्या चरणांगुलींना असणाऱ्या नयनमनोहर नखांचे वर्णन करताना आचार्य श्रींची प्रतिभा एखाद्या महाकवीला लाजवेल असे अलौकिक वर्णन करीत आहे. […]

1 3 4 5 6 7 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..