नवीन लेखन...
Avatar
About (वैद्य) सुविनय दामले
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग ५

आयुर्वेद म्हणजे काही केवळ पाळेमुळे नव्हे. हे जगण्याचे शास्त्र आहे. जीवन म्हणजे काय ? का जगावे ? कोणासाठी जगावे ? किती वर्षे जगावे ? कसे जगावे ? या सगळ्याची उत्तरे या शास्त्रात मिळतात, एका ओळीत सांगायचं तर, आयुर्वेद म्हणजे सगळ्यांचा बाप आहे. आता पिताश्री म्हटलं तर तत्वज्ञान ऐकून घेणं, ओघानं आलंच ना. ! […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ४

इथे वापरलेला सम शब्द हा सर्वधर्मसमभाव यामधल्या सम पेक्षा थोडा वेगळा आहे. समभाव हवाच, पण नको त्या ठिकाणी नको. इतर जण जर सम भावाने पाहात असतील, कृती करत असतील तर समभाव आपणही जरूर दाखवावा. नको त्या ठिकाणी समभाव दाखवत गेलो तर अबू चे रूपांतर बाबूत होते आणि नंतर हे डोक्यावर चढून बसतात. […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ३

आपले सगळे अवयव बघा कसे “दाते” आहेत. कोणत्याही अपेक्षांशिवाय आपल्याला आतून आपलेपणाने सतत देत राहातात. रसरक्त, अश्रु, स्तन्य, लाळ इ.इ. काही वेळा तर सर्व अंतस्रावी ग्रंथी आपली परवानगी न घेता सुद्धा आपल्याला जे आवश्यक आहे ते, न मागता तयार करून देतात. असा दाता व्हावं. […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग २

आपल्यासाठी हितकर काय आहे आणि अहितकर काय आहे, हे एकतर वैद्यबुवा सांगतील किंवा आपले स्वतःचे शरीर सांगेल. तसंच करावं. इतर कोणाचंही ऐकू नये. याचा अर्थ मनमानीपणा नव्हे. पण बिनधास्त खावं बिनधास्त फिरावं. खाताना भीती नको, खाल्ल्यानंतर खाल्लेल्याची आठवण नको. पावसात भिजताना सर्दीची आठवण नको. सर्दी झालीच तर रडतराहूपणा नको. सतत वर्तमानातील आनंद घेत राहवे. […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग १

रोग झाला की, वैद्य आठवावा, गरजेपुरता त्याला वापरावा. त्याने दिलेला औषधसल्ला पाळावा. नंतर रोग विसरावा. (आणि वैद्य देखील !) म्हणून तर आपल्याकडे म्हण पडली आहे, गरज सरो, वैद्य मरो ! […]

देवपूजेतील अंतिम उपचार – मंत्रपुष्प – भाग ३ 

हे परमेश्वरा, मला या जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे. यासाठी मला तू अंतिम सत्य सांग. मला एवढे कळते आहे, की माझे अंतिम सत्य तूच आहेस. तरीदेखील माझी बुद्धी मला वेळोवेळी तुझ्यापासून लांब नेते. माझ्या बुद्धीला तू स्थिर बनव. […]

देवपूजेतील अंतिम उपचार – मंत्रपुष्प – भाग १

वेदामधून घेतलेले, जवळपास सर्वांचेच पाठ असलेले, हे मंत्रपुष्प ही आपली भारतभूची राष्ट्रीय प्रार्थना आहे, हे कोणाला माहिती नसेल. ही जणु काही शपथ आहे. देवाच्या समोर उभे राहून एका सर्व शक्तीमान शक्तीला शरण जाऊन सांगतोय, की हे राष्ट्रदेवते, मी तुला साक्ष ठेऊन ही शपथ घेतोय, […]

नमस्कार – भाग ९

नमस्कारानंतर करायची प्रार्थना. या पूजेमधे माझे काही चुकले असेल तर देवा मला क्षमा कर. क्षमा मागण्यात कोणताही कमीपणा नाही. प्रत्येक धर्मात या प्रार्थना आहेत. प्रार्थनेमधे मोठी शक्ती आहे. सामुहिक प्रार्थनेत तर आणखी जास्त शक्ती मिळते. येथे शक्ती हा शब्द शब्दशः अर्थाने वापरायचा नाही. […]

नमस्कार – भाग ८

आरती करताना दोन्ही हातांनी टाळ्या वाजवल्या जातात.दोन्ही हातानी टाळ्या वाजवल्या की तळहातावरील प्रेशर पाॅईंट दाबले जाऊन आरोग्य मिळते. क्लॅपिंग थेरपी नावाची पोस्ट पण सगळीकडे फिरतेय…. त्यात तथ्य नाही, ते थोतांड आहे, असे आपण म्हणू शकत नाही. आणखी चौकस अभ्यास करायला हवा. […]

1 8 9 10 11 12 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..