नवीन लेखन...

नमस्कार – भाग ८

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग १०२
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ५८

आरती करताना दोन्ही हातांनी टाळ्या वाजवल्या जातात.दोन्ही हातानी टाळ्या वाजवल्या की तळहातावरील प्रेशर पाॅईंट दाबले जाऊन आरोग्य मिळते. क्लॅपिंग थेरपी नावाची पोस्ट पण सगळीकडे फिरतेय…. त्यात तथ्य नाही, ते थोतांड आहे, असे आपण म्हणू शकत नाही. आणखी चौकस अभ्यास करायला हवा.

आरती करताना तेल तुपाचा दिवा लावून झाल्यावर देखील पुनः कापूर का जाळला जातो ?

एक वडी कापूर जाळला की, वातावरण सुगंधी तर होतेच, पण सूक्ष्म जीव देखील नाहीसे होतात. एक वडी कापूर जाळल्याने जो धूर तयार होतो तो सुद्धा औषधी होतो, म्हणून तर आरती झाल्यावर आरतीवरून हात फिरवून तयार झालेला धूर आपल्या नाका तोंडाच्या दिशेला ओढतात. विशेषतः दमा, कफ, कानानाकाचे आजार, डोकेदुखी होऊ नये याकरीता हा धूर छान काम करतो. लक्षात ठेवा. एका कापराच्या वडीचा धूर ! आणि हा कापूर वडीच्या ऐवजी स्फटीक रूपातील मिळाला तर जास्ती औषधी. त्याला भीमसेनी म्हणतात. कापूर जाळायचा म्हणजे वाटीभर नव्हे. त्याचा त्रास होईल. अति सर्वत्र वर्ज्ययेत !

आरती झाली की, ताम्हनात पेटलेल्या दिव्यावरून, किंवा पेटवलेल्या कापरावरून हात फिरवला जातो. आणि वर येणारा धूर आपल्या दिशेला ओढून घ्यायचा असतो. केवळ शेकोटीसारखा तळहात गरम करण्यासाठी हात फिरवायचा नसतो. आपल्या हातानी हा धूर आपल्या कानानाकातोंडाडोळ्यापर्यंत आणला की या पोकळ्यांमधील सूक्ष्म राक्षस  नाहीसे होतात. राक्षस म्हणजे जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण आपले अस्तित्व दाखवतात, ते ! आजच्या वैज्ञानिक भाषेत व्हायरस बॅक्टेरीया म्हणूया ! ( वैज्ञानिक भाषा वापरली की शास्त्रीय वाटते ना ! ) यज्ञ म्हटला की धार्मिक कार्यक्रम आणि कॅम्प फायर म्हटलं तर चालतं ? ! संस्कृती समजून घेण्याचे घोटाळे आहेत. असो !

कापराचे गुणगान करणाऱ्या काही पोस्ट व्हायरल (राक्षसीय ) होताहेत. (व्हायरल म्हणजे त्या नेमक्या कुठे जन्म घेतात, आणि कुठे कशा पसरतात, याला काही धरबंद नसतो, यालाच पूर्वीच्या भाषेत भूत राक्षस म्हटले आहे. म्हणजेच व्हायरस.)

कापराच्या पण काही मर्यादा असतातच. डास, चिलटे जातात, पण घरमाश्या काही जात नाहीत. त्याला दुसरा काहीतरी उपाय शोधावा लागेल. आरतीमधे सर्वसाधारण तीळतेल किंवा शेंगतेल किंवा खोबरेल तेल वापरले जाते. तसेच कडूनिंब तेल अथवा करंज तेलाचा दिवा करून पेटवला तर तयार होणारा धूर हा आणखी कृमीघ्न म्हणजे कृमींना मारणारा असेल. प्रयोग करून पहावा. नुकसान नक्कीच नाही.

जसे भारतात आल्टरनेटीव मेडीसीन आहे, तसे, अन्य देशांतही एक्युप्रेशर, एक्युपंक्चर, सुजोक अशा अनेक पद्धती वापरात आहेत. कोणी कानावर संपूर्ण शरीराचा इलाज होऊ शकतो, असे सांगतात, तर कोणी तळहात तळपाय यावर पूर्ण शरीराची आकृती दाखवतात. तर कुणी फक्त बोटांवर संपूर्ण शरीरातील अवयवांचा संबंध आहे, असे सांगतात. या सर्वांचा आपण आदर राखूया, असे वाटते. पण ही पूर्ण चिकित्सा नाही. त्याबरोबरीने आयुर्वेदासारखी पूर्ण चिकित्सा पद्धत वापरणे गरजेचे आहे. ज्या चिकित्सा पद्धतीमधे केवळ शरीराचाच नाही तर मन आणि आत्म्याचा देखील विचार केला जातो. मन दिसत नाही, पण विज्ञानाला मान्य आहे. भारतातील विज्ञानवाद्यांनी आणखी अभ्यास केला तर मनापेक्षा आत्मा वेगळा आहे, हे पण त्यांना समजेल. जागतिक स्तरावर आरोग्य संघटनेसुद्धा आत्म्याचे अस्तित्व मान्य केलेच आहे. सुदैव तिकडे अंनिसच्या शाखा नाहीत.

भारतात तो सुदिन लवकरच येवो ही प्रार्थना.

— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021

02362-223423.
२२.०७.२०१७

आजची आरोग्यटीप

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..