श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

दोन हजार मंदिरांचं गाव 

नाना फडणविसांच्या वाड्यात शिरण्याआधी दोनशे वर्षाहून जुन्या डौलदार बाओबाब वृक्षाने आमचे स्वागत केले. वाड्याची अवस्था केविलवाणी असली तरी त्याच्या पाठीमागे असलेल्या शेकडो वर्षांपूर्वीच्या घाटांचा व मंदिरांचा एकही दगड आपल्या जागेवरून हललेला नाही. तिथेही कृष्णेच्या पाण्याचं डबकं झालं आहे. पण मंदिरांनी सजलेला तो सुरेख घाट डोळ्याचं पारणं फेडतो. […]

आमचे भाईकाका !

महाराष्ट्राने ज्या लाडक्या व्यक्तिमत्वावर जीव ओवाळून टाकला त्या पु.ल. उर्फ भाईंचा जन्मदिवस येताच मी आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलू लागलो. माझं वय होतं अकरा वर्षे. इयत्ता सहावी. एक दिवस आईने माझ्या हातात एक चिटोरा दिला व मला म्हणाली जोग काकांकडे जा आणि त्यांच्याकडे उतरलेल्या पाव्हण्यांची सही घेऊन ये. सही कशाला म्हणतात, ती कशासाठी घ्यायची असते हे न कळण्याच्या […]

केवळ कृषी पर्यटन नव्हे. . . . .तर एक संस्कार !

लक्ष्मीपूजन आटोपलं की दुसऱ्या दिवसापासून भटकंतीला निघण्याचा शिरस्ता आम्ही कसोशीने पाळतो. कृषी क्षेत्रातील कामाच्या निमित्ताने मी सतत देशभर भटकत असलो तरी आम्हा तिघांना एकत्र भटकंती करण्याची ही एकमेव संधी आम्ही कधीही सोडत नाही. या वर्षीच्या भटकंतीचा प्रारंभ झाला ‘आमंत्रण’ या कृषी पर्यटन केंद्राला भेट देऊन. पुणे व मुंबईपासून केवळ ९५ किमी अंतरावर असलेलं व सह्याद्रीच्या कुशीत […]

एक यशस्वी मित्र

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रत्येक रविवारी दुपारी ३.३० ते ४.३० सादर होणाऱ्या ‘दुसरी बाजू’ ह्या मुलाखतीवर आधारित कार्यक्रमात श्री. विक्रम गोखले त्याच्याशी विविध विषयांवर गप्पा मारत असताना माझं मन आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलू लागलं आणि काही वर्षांपूर्वी लिहिलेला माझा हा लेख आपल्या सर्वांसमोर ठेवण्याची इच्छा झाली. एक यशस्वी मित्र ३० वर्षांपूर्वी एका भारतीय कंपनीत कृषी अधिकारी म्हणून मी […]

सळसळता पदन्यास कायमचा थबकला !

२३ तारखेला सासवडजवळील एका गावात माझ्या कार्यक्रमासाठी पुण्यातून बाहेर पडताना टिळक स्मारक मंदिराकडे बघायचं नाही असं अगदी निक्षून मनाला बजावलं होतं. पण स्वारगेटच्या दिशेने जाताना टिळक स्मारकच्या प्रवेशद्वारासमोर ड्रायव्हरला एक क्षण गाडी थांबवायला सांगितलेच. अवघ्या काही तासांपूर्वीचा भरत नाट्य मंदिरातील सळसळता पदन्यास नाट्य परिषदेच्या कार्यालयासमोर निपचित पडलेला बघणं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडली गोष्ट होती. दुरूनच तिला हात […]

चांगुलपणाचं मृगजळ

कोणतीही पूर्वसूचना न देता विनायकराव ऊर्फ तात्या भेटायला आले. त्यांच्या अचानक येण्याने मला बऱ्यापैकी आश्चर्य वाटलं. कोणत्या तरी अनामिक कारणामुळे आलेल्या वैफल्याच्या झटक्याने त्यांचा चेहरा झाकोळून गेला होता. चेहऱ्यावरील विषण्णतेचे भाव त्यांना प्रयत्न करूनही लपवता येत नव्हते. अवघं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यागत ते खुर्चीत जवळपास कोसळलेच. हातात घेतलेलं महत्त्वाचं काम बाजूला ठेवून त्यांची समस्या समजावून घेण्याशिवाय गत्यंतर […]

ते दोघं

शाळकरी वयात दिवसा शाळा व संध्याकाळी गायनशाळा हा नित्यक्रम अनेक वर्षे अगदी कसोशीने पाळल्या गेला. पं. विष्णू दिगंबर पलुस्करांच्या पुण्यतिथीचे वेध लागले की कार्यक्रमाच्या तयारीसाठी आम्हा विद्यार्थ्यांची लगबग सुरु होत असे. वय काहीही असो, पण प्रत्येक विद्यार्थ्याने पंडितजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी काही ना काही सादर केलेच पाहिजे अशी आमच्या गुरुजींची आज्ञा होती व ती मोडण्याची कोणाचीही […]

इमान मातीशी

आपल्या सैनिकांनी गाजवलेल्या शौर्याला अंत:करणापासून सलाम करण्याऐवजी सर्जिकल स्ट्राईकवर किळसवाणं राजकारण करणाऱ्या कर्मदरिद्री राजकीय पक्षांच्या वर्तणुकीने व्यथित होऊन तीन वर्षांपूर्वी लिहिलेला हा माझा लेख आपल्या जांबाज सैनिकांना अर्पण करतो. शक्य असल्यास शेअर करून अनेकांपर्यंत पोहोचवा. जय हिंद ! […]

मुलं नावाचे मित्र

विद्यार्थ्यांचा उत्साह अगदी उतू जात होता. शाळेतील रोजच्या रसायन, भौतिक, गणित, इंग्रजी, मराठीऐवजी अगदी वेगळ्या, पण त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयांवरील चर्चेत प्रत्येकाला आपली मते हिरिरीने मांडण्याची इच्छा होती. आई, वडील, शिक्षक, मित्र, मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक या सर्वांबद्दल प्रत्येकाचं स्वत:चं असं खास मत होतं. मी त्यांच्या वयाचा असताना स्वत:चं मत कशाला म्हणतात याची मला कल्पनाही नव्हती. पण […]

एक अभिमानास्पद मित्र – डॉ. अब्दुल कलाम

एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी जगप्रसिध्द शास्त्रज्ञ व आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी जगाचा निरोप घेतला. माझ्या या अभिमानास्पद मित्राला अंत:करणापासून श्रध्दांजली. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे विशाल सभागृह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने ओसंडून वाहत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम मंचावर येऊन उभे राहिले आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून अख्खे सभागृह डोक्यावर घेतले. वातावरण चैतन्याने […]

1 2 3 4