‘चंद्रलेखा’चं ‘‘नटसम्राट’’ नाटक रंगमंचावर आलं
या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदूअसोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला होता. […]
या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदूअसोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला होता. […]
१९७६ मध्ये नितीन गडकरी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. वयाच्या २३व्या वर्षी ते भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) चे अध्यक्ष झाले. १९८९ मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेवर प्रथम निवडून गेले.२० वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले. […]
‘आयत्या कविता’ हा काव्यसंग्रह ‘अंतर्वेधी’ (१९७९) आणि ‘चरसी’ या दोन कादंबऱ्या’ प्रकाशित झाल्या आहेत. ओक यांच्या निधनानंतर त्यानंतर ३ वर्षांनी ज्येष्ठ कवी व समीक्षक चंद्रकांत पाटील आणि तुळसी परब यांनी ओक यांच्या कवितांचे संपादन करून ‘मनोहर ओकच्या ऐंशी कविता’ हा संग्रह तयार केला. […]
१९६१ मध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांच्या पुढाकाराने मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. त्यावेळी ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. साहित्य महामंडळाची स्थापना झाली, त्यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ, नागपूर अशा चार घटक संस्था मिळून महामंडळ असे त्याचे स्वरूप होते. मराठी भाषेसंबंधी असलेल्या आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समान प्रश्नांवर विचार करणे, त्यावर चर्चा घडवून आणणे, एकाच व्यासपीठावरून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यासाठी, समाजाच्या आणि शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते. […]
आशीर्वाद, घर एक मंदिर, कुटुंब अशा अनेक मालिका आणि हिंदी चित्रपटातून शमा देशपांडे यांनी नाव मिळवलं होतं. […]
साताऱ्याकडील ग्रामीण पार्श्वभूमीवरची, बेचाळीसच्या क्रांतिपर्वावर आधारलेली त्यांची ‘गावगुंड’ ही कादंबरी खूप गाजली. काही विद्यापीठांनी तर तिचा आपल्या अभ्यासक्रमातही समावेश केला. या काळात र. वा. दिघे यांच्या साहित्याने आपण झपाटले गेलो होतो असे ठोकळ सांगतात. अर्धशतकापूर्वी लिहिलेल्या ‘कडू साखर’, ‘गोफणगुंडा’, ‘निळे डोळे’, ‘सुगंध’, ‘मोत्याचा चारा’सारख्या ठोकळांच्या कथा आजही तितक्याच हृद्य, वेधक वाटतात. दिघ्यांच्या कादंबऱ्यांमधले अद्भुतरम्य आणि रोमांचकारक वातावरण काही प्रमाणात ‘गावगुंड’ मध्ये अवतरले आहे.’ […]
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतीलच एक महत्त्वाचं पात्र म्हणजे जेठालाल गडा. ‘जेठालाल गडा’, ‘दया’ आणि त्यांच्या कुटुंबाभोवतीच या मालिकेचं कथानक फिरतं. १९९७ मध्ये क्या बात है या टी.व्ही. मालिकेतून दिलीप जोशी यांनी करिअरला सुरुवात केली. […]
जागतिक मंदी आणि सामाजिक भारत, जागतिक मंदी आणि आपण, जागतिक मंदी आणि आपली गुंतवणूक, अर्थसंकल्पीय विष्लेषण, अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक, भारतीय भांडवल बाजार: २०१० आणि नंतर, आर्थिक घोटाळे आणि आम्ही, गुंतवणुकीचे समाजशास्त्र, गुंतवणूकीचे मानसशास्त्र, गुंतवणुकीतील धोक्यांचे नियोजन, स्वेच्छानिवृत्तीचे आव्हान, बदलते अर्थकारण – बदलते समाजकारण, जे.आर.डी. टाटा : शतकोत्तर विचार, आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक, ‘वंदे मातरम्’चा कालखंड, आजच्या संदर्भात वंदे मातरम् , आजचे अध्यात्म, चला नवा भारत घडवूया, राष्ट्रनिर्मितीचे आव्हान, राष्ट्रवादाची बदलती संकल्पना, अल्केमिस्ट टू सी गल, व्हाया यू कॉन विन अशा विविध विषयांवर चंद्रशेखर यांची व्याख्याने झाली आहेत. […]
आपल्या राजवटीखाली असलेल्या देशांना ‘स्वयंशिस्त’ लागावी, या हेतूने ब्रिटिशांनी सगळ्या देशांची एकत्रित स्पर्धा सुरू केली आणि त्यालाच कॉमनवेल्थ गेम्स अथवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असे नाव दिले.१९३० पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि दर चार वर्षांनी ही स्पर्धा होते.१९४२ आणि १९४६ साली दुसऱ्या महायुद्धामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.१९३० ते १९५० या कालावधीत राष्ट्रकुलला ‘ब्रिटिश राजवट क्रीडा स्पर्धा’ म्हणूनही ओळखले जात. […]
कुस्तीची वा मल्लयुध्दाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भरतात वैदिक वाङ्मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथातील मल्लविद्येचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किशकिंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुध्द होऊन सुग्रीवने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनुसार कृष्ण, बलीराम व भीम हे मल्लविद्येत प्रविण होते, हे त्यांनी केलेल्या महायुध्दांतील पराक्रमावरून दिसून येते. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions