कोल्हापूर-दरबारचे सुप्रसिद्ध प्रभावशाली गायक अल्लादिया खाँ
अल्लादिया खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष नाथ विश्वंभर. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८५५ रोजी झाला. मूळचे हे घराणे शांडिल्यगोत्री आद्यगौड ब्राह्मणांचे. पण दिल्लीजवळील अनूप-संस्थानाच्या आपल्या आश्रयदात्या अशा एका हिंदू अधिपतीला दिल्लीपती मुसलमान बादशहाच्या कैदेतून सोडविण्याच्या मोबदल्यात या घराण्यातील एक पूर्वज मुसलमान झाले. खाँसाहेबांचा जन्म जयपूर संस्थानामधील एका छोट्याशा जहागिरीच्या उनियारा या गावी झाला. मा.अल्लादिया खाँ यांचे पाळण्यातील नाव ‘गुलाम एहमद’ […]
