नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

मायकेल जॅक्सन

मायकेल जॅक्सन नावाचे एक भन्नाट आणि बेभान, चित्तथरारक आणि अचाट तुफान मनात आणि तनात १९८० ते १९९५ या काळात ते तुफान घोंघावले.त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९५८  रोजी झाला.मायकेल जॅक्सनमध्ये अशी काय ‘मॅजिक’ होती, असे काय गूढ होते, की ज्यामुळे प्रभुदेवा, मिथुन चक्रवर्तीपासून राज ठाकरेंपर्यंत आणि युरोपपासून जपानपर्यंत, जवळजवळ जगभरचे तत्कालीन तरुण-तरुणी त्याच्या प्रभावाखाली आले होते? मायकेल जॅक्सनची विलक्षण […]

अभिनेत्री करिश्मा कपूर

१९९१ साली चित्रपटसॄष्टीत पदार्पण केलेल्या करिश्माने कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांतून कामे करत १९९०च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले. तिचा जन्म २५ जून १९७४ रोजी झाला. तिने भूमिका साकारलेल्या चित्रपटांपैकी राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है, फिजा, झुबैदा हे चित्रपट विशेष गाजले. अभिनेत्री करिश्मा कपूर चे टोपणनाव लोलो आहे.हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता रणधीर कपूर तिचे वडील, तर […]

आणीबाणीचा २१ महिन्यांचा कालखंड

इंदिरा गांधी यांनी २५ जून रोजी देशात आणीबाणी लागू केली त्या घटनेला ४२ वर्षे होत आहेत. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ हा आणीबाणीचा २१ महिन्यांचा कालखंड तमोयुग म्हणून ओळखला जातो. १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी निवडणुकीतील गैरव्यवहारप्रकरणी राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्यात इंदिरा गांधी यांना दोषी ठरवून […]

संगीतकार मदन मोहन

मदन मोहन यांचे पूर्ण नाव मदन मोहन कोहली. त्यांचा जन्म २५ जून १९२४ रोजी बगदाद, इराक येथे झाला.मदन मोहन यांचे वडील रायबहादूर इराकमध्ये कामाला होते आणि मदन मोहन यांचा इराकमधला जन्म. १९३२ साली त्यांचे कुटुंब हिंदुस्थानात परत आले आणि मदन मोहन यांची रवानगी पंजाब मधील चाकवाल या त्यांच्या मूळच्या गावी झाली. तेथे त्यांची काळजी आजी आणि आजोबा घेत असत. […]

हिंदी चित्रपटतील खलनायक अमरीश पुरी

अभिनेता म्हणून अमरीश पुरी म्हणजे साधेपणा, कामातील वक्तशीरपणा याचा सुंदर मिलाफ, फिल्मी दुनियेत राहूनही ते अतिशय शिस्तबद्ध आणि नातेसंबंध जपणारे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी झाला. १९७० ते २००५ या काळात अमरीश पुरी यांनी हिंदी भाषेसह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांनी अनेक चित्रपटांतील विविध पात्रे […]

मराठी चित्रपट-अभिनेते विष्णूपंत जोग

चि. वि. जोशी यांच्या गुंड्याभाऊची भूमिका गाजविणारे जुन्या जमान्यातील प्रसिध्द नट विष्णूपंत जोग चिं. विं.च्या विनोद बागेतले दोन अफलातून नमुने म्हणजे ‘चिमणराव-गुंडय़ाभाऊ’. या दुकलीची लोकप्रियता आता आतापर्यंत टिकून होती. दामुअण्णा आणि विष्णुपंत जोग यांचा ‘सरकारी पाहुणे’ हा चित्रपट १९४२ मधला. पहिली मंगळागौर (लता मंगेशकर यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट), सरकारी पाहुणे, जय मल्हार, नवरा बायको, देव […]

चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते बाबूराव पेंढारकर

१९२० साली बाबूराव पेंढारकर यांनी सैरंध्री या मराठी चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. १९२० च्या दशकापासून. १९६० च्या दशकापर्यंतच्या सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचा जन्म २२ जून १८९६ रोजी झाला. मराठी चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे त्यांचे भाऊ होते. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संतपट, कौटुंबिक आणि ग्रामीण अशा ७५ हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. […]

जागतिक कीर्तीचे पियानोवादक व्ही.बलसारा

संगीतावर हुकूमत गाजविणारा कुशल कलाकार, प्रतिभासंपन्न संगीतकार व जागतिक कीर्तीचे पियानोवादक व्हिताज बलसारा उर्फ व्ही.बलसारा यांचा जन्म २२ जुन १९२२ रोजी झाला. व्हिताज अर्देशर बलसारा उर्फ व्ही. बलसारा हे पारशी असून सुद्धा व्ही.बलसारा यांनी एकेकाळी आपला हार्मोनियम, ऑर्गन व पियानोच्या अप्रतिम साथीने अवघ्या हिंदी फिल्मी संगीतावर हुकूमत गाजवली. ‘‘भारतीय संगीताचं बाळकडू त्यांना आईकडून मिळालं. तीच पहिली गुरू. संगीताची गोडी त्यांना […]

मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे

मराठवाडी बोलीच्या ढंगातील संवादफेकीसाठी व विनोदी अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत. मकरंद अनासपुरे यांचा जन्म २२ जून १९७३ रोजी औरंगाबाद येथे झाला. मकरंद अनासपुरे यांनी ”सरकारनामा” या चित्रपटातुन आपली मराठी चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. २००५ मध्ये आलेल्या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ”कायद्याच बोला” या चित्रपटाच्या यशाने त्यांना मराठी चित्रपटांमध्ये एक नवीन ओळख मिळाली. त्या नंतर अनेक विनोदी चित्रपटात त्यांनी अभिनय […]

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणा-या अभिनेत्री रीमा लागू

रीमा लागू यांचे लग्ना आधीचे नाव नयन भडभडे. त्यांचा जन्म २१ जून १९५८ रोजी झाला. एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांना मा.रीमा लागू यांचं नाव सुपरिचित होते. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ नावाने बालकलाकार म्हणून मा.रीमा […]

1 322 323 324 325 326 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..