नवीन लेखन...

संगीतकार मदन मोहन

Madan Mohan

मदन मोहन यांचे पूर्ण नाव मदन मोहन कोहली. त्यांचा जन्म २५ जून १९२४ रोजी बगदाद, इराक येथे झाला.मदन मोहन यांचे वडील रायबहादूर इराकमध्ये कामाला होते आणि मदन मोहन यांचा इराकमधला जन्म. १९३२ साली त्यांचे कुटुंब हिंदुस्थानात परत आले आणि मदन मोहन यांची रवानगी पंजाब मधील चाकवाल या त्यांच्या मूळच्या गावी झाली. तेथे त्यांची काळजी आजी आणि आजोबा घेत असत. त्यांचे वडील व्यवसायाच्या शोधात मुंबईला गेले. लखनउ, मुंबई आणि देहरादून ह्या शहरात शिक्षण पूर्ण करून मदन मोहन सैन्यात भरती झाले. मात्र, त्यांचे संवेदनशील मन सैन्यात काही रमले नाही आणि १९४६ साली संगीतात काही करावे या उद्देशाने त्यांनी सैन्यातील नोकरी सोडली.

सैन्य सोडल्यावर मदन मोहन यांना ऑल इंडिया रेडियोत नोकरी मिळाली आणि लखनौ आकाशवाणीवर ते रुजू झाले. तेथे त्यांची गाठ उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि उस्ताद फैय्याज खान यांच्यासारख्या महान संगीतकारांशी पडली. योगायोगाने, संगीतकार रोशन पण त्याच काळात लखनौ आकाशवाणीवर नोकरीस होते. पण मदन मोहन यांच्यावर खरा प्रभाव पडला तो बेगम अख्तर यांच्या संगीताचा. त्यांची कारकीर्द याच प्रभावामुळे घडली आणि हा प्रभाव शेवटपर्यंत टिकून होता. आकाशवाणीच्या वास्तव्यात त्यांना तेथील महान कलाकारांना ऐकून जे ज्ञान मिळाले तेच त्यांचे संगीताचे शिक्षण म्हणायला हवे कारण संगीताचे रीतसर शिक्षण त्यांना काही मिळाले नाही. फक्त लाहोरच्या वास्तव्यात कर्तार सिंग यांच्याकडून थोडेसे संगीताचे प्राथमिक शिक्षण मिळाले. हिराबाई बडोदेकराचा त्यांच्यावर प्रभाव होता व पुण्याच्या सवाई गधर्वची वारीही त्यांनी कधी चुकविली नाही.

फिल्मी दुनियेत मदन मोहन यांची सुरुवात गायक म्हणून झाली १९४८ साली ‘शाहीन’ चित्रपटात. मास्टर गुलाम हैदर यांचे संगीत होते आणि लता मंगेशकर यांच्या बरोबर त्यांनी दोन युगल गीते गायली. यानंतर ते संगीतकार एस. डी. बर्मन आणि श्यामसुंदर यांचे सहाय्यक झाले. त्यांना संगीत देण्याची पहिली संधी मिळाली १९५० साली ‘आँखें’ या चित्रपटात. चित्रपट काही फार चालला नाही पण काही चोखंदळ रसिकांनी संगीताच्या वेगळेपणाची नोंद जरूर घेतली. जेव्हा लता मंगेशकर यांना मदन मोहन यांच्या चित्रपटाकरता गाणार का असे विचारले तेव्हा त्यांचा दोन क्षण विश्वास बसला नाही आणि हसायला आले. याचे मुख्य कारण त्याकाळात मदन मोहन यांची ओळख एक धनिकाचा वाया गेलेले, लहान पोरांबरोबर क्रिकेट खेळणारा पोरगा अशीच होती. आज जेथे वानखेडे स्टेडियम आहे तेथे त्याकाळी एक खुले मैदान होते आणि मा.मदन मोहन तेथे सतत लहान मुलांबरोबर क्रिकेट खेळत असत आणि त्यांचे वडील याबद्दल अतिशय नाराज असत. मोठे झाल्यावर जेव्हा जेव्हा ब्रेबॉर्न स्टेडियमवर कसोटी सामने होत, तेव्हा मा.मदन मोहन सामन्यांना नियमित हजेरी देत असत. गॅरी सोबर्स हा त्यांचा आवडता खेळाडू होता. ब्रेबॉर्न स्टेडिअमवर कोणी ओळखीची व्यक्ती भेटली आणि ती त्यांच्याशी संगीतावर गप्पा मारायला लागली तर ते आवर्जून सांगत की हे ठिकाण फक्त क्रिकेटचा खेळ पाहण्याचे आणि त्यावर चर्चा करण्याचे आहे; तुम्हाला संगीतावर काही बोलायचे असल्यास उद्या माझ्या घरी या. सुरुवातीची पाच सहा वर्षे मदन मोहन यांची संघर्ष करण्यात गेली आणि पहिला चित्रपट गाजला तो ‘भाई भाई’, या चित्रपटाची सर्व गाणीही गाजली. मला त्यात आवडलेले एक श्रवणीय गीत आहे, ‘कदर जाने ना’. त्या अगोदर आलेला ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या चित्रपटातील ‘देख तेरे इन्सान की हालत’ आणि ‘बस्ती बस्ती पर्बत पर्बत’ ही गाणी गाजली पण इतर गाण्यांची फारशी नोंद घेतली गेली नाही.

‘भाई भाई’ भरपूर चालला आणि मा.मदन मोहन यांना प्रसिद्धी मिळाली आणि चित्रपटाचा रौप्य महोत्सव होणार पण मा.मदन मोहन यांचे दुर्दैव आड आले. २५ आठवडे पूर्ण व्हायच्या अगोदर चित्रपट पडद्यावरून काढला गेला आणि पहिल्या रौप्य महोत्सवाकरता मदन मोहन यांना आणखी काही वर्षे थांबायला लागले. मदनमोहन अतिशय शिस्तप्रिय संगीतकार होते. स्वच्छता, टापटिप आणि वेळेवर हजर राहणे हे त्याचे गुण होते. खवैय्या तर होताच पण स्वतः उत्तम कुकही होते. ते भेंडी मटण उत्कृष्ट बनवून दोस्ताना खिलवित असे अशी मन्ना डेनी आठवण सा॑गितली होती. हिंदूस्थानी वाद्याचा सुयोग्य वापर हे त्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य होते. मा.प्रभाकर जोग, उत्तम सिंग ह्यासारखे अव्वल दर्जाचे व्हायोलिन वादक तर मनोहारी सि॑गसारखे उत्कृष्ट सॅक्सोफोन वादक यांच्याशिवाय मदनमोहन यांचे पान हलत नसे. ते सतारीचा विशेष चाहते होते. मा.रईस खान यांनी वाजवलेली ‘आज सोचा तो आसू भर आये मधील सतार ऐकून लतादीदी रडल्या होत्या असे म्हणतात. ‘रस्मे उल्फत’ ‘वो चूप रहे तो ‘ नैनो मे॑ बदरा छाये इ गाण्यामधील सतार अगावर काटा उभा करते. ‘नौनिहाल’ मधील प. नेहरूच्या अत्यंयात्रेवर चित्रित केलेले ‘मेरी आवाज सुनो’ हे गाणे ऐकून इदिंराजी॑चे डोळेही भरून आले होते. मा.मदनमोहन यांचे १४ जुलै १९७५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / शैलेश दामले

मदनमोहन यांची गाणी.

मदनमोहन व लता मंगेशकर यांची गाणी.

https://www.youtube.com/watch?v=I8tVaKhVuBo

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..