मराठी कवयित्री आणि कथालेखक इंदिरा संत
पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९१४ रोजी झाला. शिक्षकीपेशात असलेल्या मा.इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले […]
