नवीन लेखन...

गायिका बेला शेंडे

‘बेला शेंडे’ म्हटलं की आपल्याला कुठली गाणी आठवतात? ‘नटरंग’ ची ‘वाजले की बारा’ आणि ‘अप्सरा आली’ ही प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली लावणीगीते आठवतात, ‘सर सुखाची श्रावणी’, ‘का कळेना कोणत्या क्षणी’ किंवा ‘ओल्या सांजवेळी’ सारखी हळुवार प्रेमगीते आठवतात. ‘जोधा अकबर’ मधलं ‘मन मोहना’ आठवतं.. पण तुम्ही बेलाचं कधी breathless गाणं ऐकलंय का? फार लोकांना माहिती नसलेलं हे एक अप्रतिम गाणं.. ‘कण्हेरीची फुलं’ album मधलं सुरेख लिहिलेलं आणि बेलाने अतिशय सुंदर गायलेलं. त्यांचा जन्म ४ जानेवारी रोजी झाला. त्यांची मोठी बहीण सावनी शेंडे ह्या त्यांच्या आजी म्हणजेच किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका ‘कुसुम शेंडे’ यांच्याकडे रीतसर शिक्षण घेऊ लागल्या होत्या. त्यावेळेस शेजारी बसून बेला शेंडे बहिणीचे गाणे ऐकत असत; आई वडिलांबरोबर अनेक कार्यक्रमांना जात असत. त्यांच्या आवाजाची पट्टी वरची आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी पुरुष गायकाकडे शिकावे असे सुचवले गेले. ह्यानंतर बेला शेंडे यांनी आपल्या वडिलांकडे गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या आजीमुळे त्यांच्या घरी माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे, शोभा गुर्टू अश्या गायिकांचे येणे-जाणे होते, त्यामुळे बेला शेंडे यांचे गाणे समृद्ध व्हायला खूप मदत झाली. बेला शेंडे यांनी वयाच्या ११-१२ व्या वर्षी स्टेजवर गाणे म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी झी ‘सा रे ग म’ ची लहान मुलांची स्पर्धा जिंकली. तेव्हा त्या १४-१५ वर्षाच्या होत्या.

दहावीत असतांना ही ‘सा रे ग म’ची ही स्पर्धा होती. त्या स्पर्धेत भाग घेण्याबद्दल त्या जरा साशंक होत्या, पण घरच्या आणि शाळेतल्या सार्यांयचा पाठिंबा होता. अभ्यास आणि गाणे हे दोन्ही सांभाळायचे होते, आणि हे त्यांनी सांभाळले आणि त्या ती स्पर्धा जिंकल्या. मोठ्यांच्या झी ‘सा रे ग म’ मेगा फायनलमध्ये भाग घेण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली. ही स्पर्धादेखील त्या जिंकल्या. त्या वेळेस पंडित जसराज,अनिल बिस्वास, हरिप्रसाद चौरसिया अशा अनेक महान मंडळींकडून त्यांना मार्गदर्शन आणि प्रशंसा मिळाली. तेव्हापासून बेला शेंडे यांच्या गाण्याच्या प्रवासाला खर्या् अर्थाने सुरुवात झाली. त्या ह्या स्पर्धेनंतर त्यांना अनेक अल्बममध्ये, हिंदी- मराठी चित्रपट, शीर्षक गीते गायला मिळाली. पार्श्वगायनाची पहिली संधी त्यांना महेश मांजरेकर यांनी दिली.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.विकीपिडीया.
http://www.belashende.com

बेला शेंडेची गाणी.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..