ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार डॉ. अशोक रानडे
ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार डॉ. अशोक रानडे यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. डॉ. रानडे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं. गजाननराव जोशी, पं. लक्ष्मणराव बोडस आणि प्रा. बी. आर. देवधर यांच्याकडून घेतले. संगीतशास्त्राचे गाढे विद्वान, अशी ख्याती असलेल्या डॉ. रानडे यांनी भारतीय लोकसंगीत आणि पाश्चिीमात्य शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास केला […]
