महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते हेमंत पाटील
आज पर्यंत हौशी रंगभूमीवर २३ नाटके, वेगवेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये २१ एकांकिका आणि व्यवसायिक नाटक केले आहे. यामध्ये महाराष्ट्र सांस्कृतिक कृती कार्य संचालनालय आयोजित मराठी आणि हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत सहा रौप्य पदक आणि वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धेत सात वेळा वाचिक अभिनयातील पारितोषिक प्राप्त करणारा खान्देशातील एकमेव कलाकार म्हणजे हेमंत पाटील होय. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रा या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात आपल्या खान्देशातील लेवा पाटील बोली भाषेचा वापर करून स्क्रिट सध्या हेमंत करीत आहे. या आधी हेमंत पाटील यांनी झी टीव्हीवरील चला हवा येऊ द्या.. होऊ दे .. व्हायरल यामध्ये महाराष्ट्रातून निवड होऊन लेवा बोली भाषेतून विडंबन साजरीकरण केले आहे. […]
