नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

डॉ. द्वारकानाथ कोटणीस

डॉ.कोटणीस यांचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या शहराचे घट्ट नाते होते. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे झाला. डॉ.कोटणीसांचा जन्म वेंगुर्ल्यात झाला नसला, तरीही कोटणीस कुटुंब हे मूळचे वेंगुर्ल्याचे असून अनेक वर्षे ते वेंगुर्ल्यातच राहत होते. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काही काळ वेंगुर्ल्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये झाले. तेथेच त्यांच्या भावी आयुष्याची पायाभरणी […]

सेनानी महाराणी ताराराणी

महाराणी ताराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म १६७५ रोजी झाला. छत्रपती राजाराम महाराजांशी त्यांचे लग्न १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोघलांनी रायगडांस वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या.रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली […]

कोबोल या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर

कंप्यूटरच्या भाषांपैकी एक “कोबोल” या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर यांचा जन्म ९ डिसेंबर १९०६ रोजी न्यूयॉर्क येथे झाला. सुमारे ८० वर्षांपूर्वी “इंटरनेट’चे अस्तित्व कुणाला माहिती नव्हते. संगणकविज्ञान ही शाखा अगदी नवी होती. संशोधनाची साधने नव्हती. अशा परिस्थितीत संगणकविज्ञान आत्मसात करून “प्रोग्रॅमिंग’मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या […]

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते उदय सबनीस

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने एक वेगळा ठसा उमटविणारे उदय सबनीस यांचा जन्म ८ डिसेंबर १९५९ रोजी झाला. उदय सबनीस यांना त्यांच्या जवळचे सॅबीदादा या नावानेच ओळखतात. ते उत्तम अभिनेते आहेतच पण त्या बरोबर ते उत्तम व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. मुळचे कोल्हापूरचे असलेले उदय सबनीस यांनी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, मुलुंड येथून तसेच नवभारत विद्यालय, मुंबई […]

पुण्यातील सिटी चर्च ला २२७ वर्षे पुर्ण

पुण्यातील नाना पेठ परिसरातील ऐतिहासिक सिटी चर्चने आज २२७ वर्षे पूर्ण केली आहेत. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील क्वार्टरगेट जवळील ऑर्नेलाज हायस्कूल शेजारी हे भव्य कॅथोलिक चर्च उभे आहे. “इमॅक्युलेट कन्सेप्शन ऑफ मदर मेरी” चर्च असेही याला संबोधले जाते. विशेष म्हणजे या सिटी चर्चच्या सभोवताली मोठी मुस्लिम वस्ती असून चर्चच्या कम्पाऊंड व भिंत व बाजूच्या मशिदीची भिंत एकच […]

इज्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मायर

इज्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म ३ मे १८९८ रोजी झाला. गोल्डा माबोविच म्हणजेच गोल्डा मायर या इज्रायलची “आयर्न लेडी” म्हणून ओळखल्या जात असत. १९६९ ते १९७४ त्यांनी इज्रायलचे पंतप्रधानपद भुषविले. ज्युईश धर्माभिमानी, कणखर देशभक्त, मुरलेली राजकारणी, लोकप्रिय व्यक्तिमत्व ह्या सर्व व्याख्यांनी ओळखली जाते. १९७० साली अमेरिकेत “सर्वात आवडती (admired) स्त्री” म्हणून निवडल्या गेलेल्या गोल्डा यांचा […]

सार्क परिषद स्थापना दिन

जागतिकीकरण तोंडावर आलं असताना आपलं प्रादेशिक वेगळेपण जपण्याच्या उद्देशाने सार्कची ८ डिसेंबर १९८५ ला ढाका येथे स्थापना झाली. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सार्कच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता. सार्क अर्थात दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेचा उद्देश परस्पर सहकार्यातून भारतीय उपखंडाला शांतता आणि समृद्धी मिळवून देणं, हा आहे. प्रारंभी […]

मोहन वाघ

छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार मोहन वाघ यांचा जन्म ७ डिसेंबर १९२९ रोजी झाला. मोहन वाघ मूळचे कारवारचे. जे. जे. कला महाविद्यालयातील शिक्षण अर्धवट सोडलेल्या वाघांनी नंतर छायाचित्रण सुरू केले. छायाचित्रणापासून करिअरची सुरूवात करणारे मोहन वाघ नंतर नेपथ्य, नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते म्हणून नावारूपास आले. कमाल अमरोहींच्या पाकिजासाठी त्यांना डिझाईनचा राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला. नाटकाच्या प्रेमापोटी ते त्या कलेकडे […]

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे

आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला. अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना […]

जपानने पर्ल हार्बर वर केलेला हल्ला – ७ डिसेंबर १९४१

७ डिसेंबर – आजच्या दिवशी १९४१ साली जपानने पर्ल हार्बर वर हल्ला केला. ७ डिसेंबर १९४१ रोजी सकाळी जपानी बॉम्बर्सनी पर्ल हार्बरमधील यूएस नेव्ही बेसवर कोणताही इशारा न देता कार्पेट बॉम्बिंग केली होती. जपानच्या एअरफोर्सने अचानक अमेरिकेवर हल्ला केला होता. त्यात अमेरिकेचे सुमारे २,५०० नागरिक मारले गेले होते. तसेच नेव्हीची १८ जहाजेही उध्वस्त झाली होती. हल्ल्यात […]

1 133 134 135 136 137 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..