महान क्रांतिकारक सरदार उधमसिंग
पंजाबातील अमृतसर येथे १३ एप्रिल १९१९ ला झालेल्या जालियानवाला हत्याकांडाचे ते साक्षीदार होते. त्यामध्ये गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. या घटनेत हजारो भारतीयांच्या हत्येस कारणीभूत कमांडर डायर व जनरल ओडवायर आहेत ही माहिती मिळाल्यानंतर या दोहोंचा प्रतिशोध घ्यायची खूणगाठ उधमसिंग यांनी मनात बांधली. […]
