नवीन लेखन...
Sanket
About Sanket
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

अशी जपा आपल्या प्रेमाची नाती

सध्या मोबाईलच्या युगात बरेच जण प्रत्यक्ष भेटणं कमी आणि सोशिअल मीडियावर चॅटिंग करण्यात  जास्त वेळ घालवतात तसेच सध्याच्या जगात बरेच जण स्वतःचा खूप विचार करतात पण आपल्या नात्यांना फारस महत्व देत नाही. सध्या सोशिअल मीडियाच्या जमान्यात आणि धावत्या आयुष्यात महत्वाची असणारी नाती हरवत चालली आहेत.त्याच नात्यांना जपण्यासाठी काही खास टिप्स येथे देत आहे… […]

कोणतेही काम आनंदाने केल्यास आपल्याला समाधान मिळते

कुठलंही काम जड होऊन न करता आनंदाने केल्यास ते काम पूर्ण झाल्यावर आपल्याला समाधान मिळते. आपण केलेल्या कामाने जर आपणच समाधानी नसू तर, समोरच्या व्यक्तीकडून चांगल्या प्रतिक्रियेची आपण कशी काय अपेक्षा ठेवणार? जेव्हा आपण एखादं काम आनंदाने तसेच संपूर्ण न्यायाने पूर्ण केल्यास, प्रथम आपल्यालाच त्याचे समाधान मिळते व असे काम आपल्याला समोरच्या व्यक्तीकडूनही चांगली पोचपावती मिळवून देते. […]

शरीराची अंतर्गत तसेच बाह्य काळजी घेणं महत्त्वपूर्ण

शरीराची अंतर्गत तसेच बाह्य काळजी घेणं हे खूप महत्त्वपूर्ण ठरतं. आतापर्यंत विविध लेखाद्वारे आपण ते पहिले. माणसाच्या जीवनात त्याचा व्यक्तिमत्त्व विकास होणं हे खूप आवश्यक आहे. आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात आपल्या व्यक्तिमत्त्वाने आपली छाप इतरांवर पडते. […]

नवीन माहिती मिळाल्यामुळे आपल्या ज्ञानात नेहमीच भर पडते

सतत काहीतरी नवीन शिकण्याने आपल्या मनाला ताजेतवाने वाटते. वयाची मर्यादा न बाळगता आपल्याला जे आवश्यक आहे, जे आपल्या ध्येयाप्रती गरजेचे आहे किंवा जे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोगी आहे ते शिकण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. […]

विड्याच्या पानांचे महत्त्व जाणून घ्या

पूर्वीच्या काळात प्रत्येकाच्या घरात हक्काने आढळणारी गोष्ट म्हणजे विडाच्या पानाचा डब्बा. ज्यामध्ये ताजी विड्याची पाने, चुना, कात, सुपारी आणि अडकित्ता ठेवलेला असायचा. रोजच्या जेवणानंतर किंवा एखाद्या मेजवानीनंतर घरातील सर्व जण मिळून विड्याचे पान खायचे. विड्याची पाने आणि त्यामध्ये असलेल्या इतर पदार्थांमुळे शरीरात अन्नाचे पचन नीट होण्यास मदत होते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर विडा खाण्याची परंपरा पूर्वीपासून आपल्याकडे आहे. […]

शरीराच्या योग्य वाढीसाठी लागणाऱ्या पाण्याबद्दल

“अन्न हे पूर्ण ब्रह्म” हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या शरीराची वाढ ही आपण घेत असलेल्या पौष्टिक व संतुलित आहारावर अवलंबून असते. अन्नाप्रमाणेच एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामुळे आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीतपणे चालण्यास मदत होते ते म्हणजे “पाणी”. […]

आपल्या आयुष्यात पाण्याचे काय महत्व आहे

शरीरातील आम्लाचा प्रभाव कमी करण्यासाठी दिवसभरात चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करून जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर देणे, शरीरासाठी केव्हाही उपयुक्त ठरते. दिवसभरात कुठलेही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा पाणी पिण्यावर आपण भर देणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होईल. […]

जाणून घेऊयात काय आहे नक्की कोलेस्टेरॉल

आपण व्यायामाने कोलेस्टेरॉल कमी करू शकतो का? कोलेस्टेरॉल हा मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ असला तरी आपण जसा व्यायाम करून आपण शरीरातील चरबी कमी करू शकतो तसा, शरीरातील कोलेस्टेरॉलचा स्तर कमी करू शकत नाही. […]

जाणून घ्या हळदीचे औषधी फायदे

आपल्या रोजच्या जेवणात सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हळद. कुठलाही पदार्थ बनवताना आपण फोडणीमध्ये प्रथम हळद घालतो. हळद ही अत्यंत गुणकारी समजली जाते. जखमेवर अँटिसेप्टिक म्हणून काम करून आपली जखम लवकर बरी होण्यास हळद मदत करते. सुंदर त्वचेसाठी हळद विशेषकरून वापरली जाते. अशा ह्या सर्वगुणसंपन्न हळदीचे काही औषधी गुणधर्म आपण जाणून घेऊयात: […]

1 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..