शरीराची अंतर्गत तसेच बाह्य काळजी घेणं महत्त्वपूर्ण

शरीराची अंतर्गत तसेच बाह्य काळजी घेणं हे खूप महत्त्वपूर्ण ठरतं. आतापर्यंत विविध लेखाद्वारे आपण ते पहिले. माणसाच्या जीवनात त्याचा व्यक्तिमत्त्व विकास होणं हे खूप आवश्यक आहे. आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात आपल्या व्यक्तिमत्त्वाने आपली छाप इतरांवर पडते.

आपल्यातला आत्मविश्वास, जोखीम उचलण्याची कला, धैर्य, संयम, कुठलीही गोष्ट कलात्मकतेने करण्याची खुबी, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली प्रतिक्रिया, एखाद्या समस्यांचे केलेले निराकरण ह्या आणि अशा अनेक गोष्टीतून आपल्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. जसं आपण रोज न चुकता आंघोळ करतो, तसं आपण आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे. आपल्या हवामानाप्रमाणे येणाऱ्या घामामुळे तसेच आपल्या शरीराला ताजेतवाने करण्यासाठी रोजच्या रोज आंघोळ करणं गरजेचे आहे. आपल्याला लहानपणी समजलेली ही गोष्ट आपण आयुष्यभर इमानेइतबारे पाळतो, आपल्याला रोज कोणी आंघोळ कर असे सांगावे लागत नाही. त्याचप्रमाणे स्वतःसाठी योग्य वेळ काढून स्वतःच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याची काळजी घेणं ही तितकेच जरुरीचे आहे.

आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आपण सतत काहीतरी नवीन शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. जेव्हा लहानपणी आपण शाळेत जातो, तेव्हा प्रथम शालेय शिक्षण नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेतो. कुणी डॉक्टर तर कुणी इंजिनिअर तर कुणी शिक्षक होतं. प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे किंवा आलेल्या परिस्थितीनुसार शिक्षण पूर्ण करून सरकारी किंवा खाजगी कंपनीमध्ये नोकरी करू लागतात. काही जण स्वतःचा किंवा पिढीजात व्यवसाय पुढे चालवतात.

एकदा का शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले की, सर्व जण आपल्याला रोजगार मिळाला आता आपल्याला काही शिकायची गरज नाही असं समजतात. खरं पाहता, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे आपल्याला फक्त रोजगार मिळ्वण्याच्याच कामी येतं. हे झाले तांत्रिक शिक्षण, पण जेव्हा आपण खऱ्या अर्थाने एखाद्या कामाला सुरुवात करतो तेव्हा मिळणारे अनुभव हे आपल्याला खूप काही शिकवून जातात. असं म्हणतात ना, आयुष्य प्रथम आपली परीक्षा घेते व नंतर आपल्याला धडा शिकवते. थोडक्यात काय, आपण आयुष्यात सतत काहीतरी नवीन शिकत राहण्याने आपल्याला आपल्या ज्ञानात भर घालता येते. सतत काहीतरी नवीन शिकल्याने आपल्याला आपलं व्यक्तिमत्त्व घडवायला मदत होते.

नवीन काहीतरी शिकणे ह्याचा अर्थ कुठला तरी कोर्स करणं किंवा कुठलीतरी पदवी घेणं असं न समजता, आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या अनुभवावतूनही आपण काही ना काही शिकत असतो.

संकेत रमेश प्रसादे
About संकेत रमेश प्रसादे 36 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…