जाणून घेऊयात काय आहे नक्की कोलेस्टेरॉल

आपण व्यायामाने कोलेस्टेरॉल कमी करू शकतो का? कोलेस्टेरॉल हा मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ असला तरी आपण जसा व्यायाम करून आपण शरीरातील चरबी कमी करू शकतो तसा, शरीरातील कोलेस्टेरॉलचा स्तर कमी करू शकत नाही.

शरीरातील कोलेस्टेरॉल हे नक्की चांगले असते की वाईट असते?

आपल्या सर्वांनाच माहित आहे कि आपण तूप हे पाण्यात किंवा गरम दुधात टाकल्यास ते त्यामध्ये मिसळून न जाता त्यावर सहजपणे तरंगते. तसेच जर शरीरामध्ये कोलेस्टेरॉल हे आपल्या रक्तामध्ये सोडले तर ते रक्तात मिसळले जावू नये म्हणून शरीराने एक विशिष्ट योजना केलेली आहे. शरीरातून चरबी अथवा कोलेस्टेरॉल रक्तातून वाहून नेण्यासाठी ते एका बुडबुड्यासारख्या असण्याऱ्या घटकांत लपेटले जाते हे घटक प्रथिनांचे बनलेले असल्यामुळे ते रक्तामध्ये विरघळत नाही. या बुडबुड्यालाच लायपोप्रोटीन असे म्हटले जाते. शरीरात कमी-अधिक घनतेप्रमाणे लायपोप्रोटीनचे 2 ते 3 प्रकार आढळून येतात.

शरीरातील हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन (HDLs) हे शरीरासाठी चांगले असते कारण, ते शरीरातल्या विविध पेशींकडून यकृताकडे कोलेस्टेरॉल वाहून नेण्याचं काम करते. तर शरीरातील लो डेन्सिटी लायपोप्रोटीन (LDLs) हे शरीरासाठी वाईट असते कारण, ते यकृताकडून शरीरातल्या विविध पेशींकडे कोलेस्टेरॉल वाहून नेण्याचं काम करते. आपल्या शरीरातील रक्तामध्ये HDLचे प्रमाण जेवढे जास्त तेवढा आपल्याला  हृदयविकार होण्याचा धोका कमी असतो.

शरीरातील रक्तामध्ये अजून एक कोलेस्टेरॉलचा प्रकार असतो तो म्हणजे व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन (VLDLs). VLDL, HDL आणि LDL हे सर्व आपल्या रक्तामध्ये आढळून येतात. आपल्या अन्नामध्ये ह्यातील कुठलाही कोलेस्ट्रेलचा प्रकार आढळून येत नाही.

शरीरातील कोलेस्टेरॉलची काळजी घेण्याची गरज का असते?

शरीरातील रक्तात कोलेस्टेरॉलचा स्तर जर योग्य प्रमाणात नसेल तर आपल्याला हृदयविकार, पक्षाघात यांसारखा आजार होण्याचा संभव असल्याचे तज्ञांचे मत आहे. शरीरातील रक्तातल्या कोलेस्टेरॉलचा स्तर जास्त झाल्यास हृदयासहीत शरीरातील सर्व धमन्यांच्या भिंती टणक होतात, त्यामुळे त्यांची लवचिकता कमी होऊ लागते आणि त्या हळूहळू अरुंद होण्यास सुरुवात होते. अशाप्रकारे अरुंद झालेल्या धमन्यांमधून शरीरातील प्रत्येक अवयवाला ऑक्सीजन आणि ग्लुकोज यांचा पुरवठा योग्यप्रकारे होऊ शकत नाही. म्हणूनच हृदयाच्या बाबतीत हे घडून आले तर त्या व्यक्तीला हृदयविकार आणि मेंदूच्या बाबतीत घडून आले तर त्या व्यक्तीला पक्षाघात हे आजार होताना दिसून येते.

— संकेत प्रसादे

 

संकेत रमेश प्रसादे
About संकेत रमेश प्रसादे 37 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…