जाणून घ्या हळदीचे औषधी फायदे

आपल्या रोजच्या जेवणात सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हळद. कुठलाही पदार्थ बनवताना आपण फोडणीमध्ये प्रथम हळद घालतो. हळद ही अत्यंत गुणकारी समजली जाते. आपल्याला जखम झाल्यास त्यावर जर आपण हळद लावली तर जखमेवर हळद अँटिसेप्टिक म्हणून काम करून आपली जखम लवकर बरी होण्यास मदत होते. तसेच सर्वाना माहित आहे, सुंदर त्वचेसाठी हळद विशेषकरून वापरली जाते. आपल्या लग्नसमारंभात नवरा-नवरीला हळद लावण्याचा एक पूर्वापार चालत आलेला अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. अशा ह्या सर्वगुणसंपन्न हळदीचे काही औषधी गुणधर्म आपण जाणून घेऊयात:

१) हळदीत असलेले नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले ’करक्युमिन’ नावाचे रसायन अत्यंत प्रभावी आणि गुणकारी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील सूज कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

२) बऱ्याचदा आपण डोकेदुखीने हैराण असतो, अशावेळी हळदीचे पाणी पिण्यामुळे आपल्या डोक्याला शांत होण्यास मदत मिळते.

३) हळदीचे पाणी नियमितपणे पिण्याने आपली बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.

४) ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी हळदीचा वापर केल्यास गुडघेदुखीच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते.

५) आपल्या रोजच्या आहारात नियमितपणे हळदीचा वापर केल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

६) ज्या मुलींना अथवा स्त्रियांना मासिक पाळीची समस्या भेडसावत असेल त्यांनी नियमित हळदीचे पाणी सेवन केल्यास त्यांना त्याचा उपयोग होतो.

७) ज्याचे पोट साफ होत नसेल त्यांनी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून ते पाणी घेतल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि पोटही साफ होते.

८) अतिरिक्त वजन वाढ कमी करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे हळदीचे पाणी नियमितपणे पिणे, त्याने वजन कमी होण्यास मदत होते.

९) हळदीच्या पाण्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि होणारी जळजळ थांबते.

१०) हळदीमध्ये असे एक अँटीऑक्सिडेंट आहे, जे कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यास मदत करते, यामुळे कर्करोग असलेल्या रुग्णाला हळद उपयोगी पडते.

अशा ह्या बहुगुणसंपन्न हळदीचा जास्तीत जास्त समावेश आपल्या आहारात तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये केल्यास त्याचा आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी फायदा होतो.

संकेत रमेश प्रसादे
About संकेत रमेश प्रसादे 36 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…