नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

जीवन रंगभूमीवरील यशस्वी कलाकार

वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो. […]

मला समजलेले कर्मफळ

प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या चक्रामध्ये सतत कोणते ना कोणते काम करावेच लागते. त्याची प्रत्येक हालचाल हे छोटेसे कर्म बनत जाते. प्रत्येक क्षण हा कर्माने बांधलेला असतो. कर्माववर सभोवताल, परिस्थिती आणि व्यक्तीच्या चेतना ह्याचा परिणाम होत असतो.  व्यक्तीचे अंतरंग व बाह्यांग प्रत्येक कर्माचे परिणाम ठरवतात. ते चांगले वा वाईट, सुख वा दुःख निर्माण करणारे ठरतात. व्यक्तीच्या आवडी निवडीवर ते […]

सर्वस्व अर्पा प्रभुला

केला सुखाचा शोध धनसंपत्ती ठायीं उशीरा झाला बोध ऐष आरामांत ते नाहीं एका गोष्टीची उकलन कळली विचारापोटीं आयुष्य हवे होते वाढवून देह सुखासाठीं परि लागता ध्यान प्रभूचे चरणावरी नको मजसी जीवन हीच भावना उरीं सर्वस्व अर्पा प्रभुला हाच मार्ग सुखाचा तेव्हांच मिळेल सर्वाला आनंद जीवनाचा डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

वर्तमान काळांत जगा

काळाला तीन भागांत विभागले जाते. भविष्य, भूत आणि वर्तमान काळ. भविष्य काळ अर्थात येणारा भावी काळ आणि भूत काळ गेलेला अर्थात मागचा काळ. दोन्ही काळाच्या मध्यभागी येणाऱ्या व जाणाऱ्या सिमा रेषेवर ज्याचे अस्तित्व मानले गेले तो वर्तमानकाळ. त्यामुळे वर्तमानकाळाचे मोजमाप किती वेळेचा तो काळ ह्याचे परीमाण ठरवीणेकेवळ शक्य नाही. येणारा काळ जो ज्या क्षणाला जातो तेव्हांच […]

माझे बाळ: नियती

आम्हाला बाळाविषयी काहीतरी लिहावं असं नेहमी वाटत होतं. कधीतरी विचारशृंखलेत असलो कि काय लिहावं माझ्या बाळाविषयी ? असा प्रश्न नेहमी डोळ्यांसमोर उभा राही.अगदी काही दिवसांचे असताना त्याला आम्ही आमच्या घरी आणले होते.दुपारची वेळ होती.त्याला कपड्यात असं गुंडाळल होतं की,अगदी गाठोडं करकचून बांधावं ,तसं परंतु इतर अवयवाची हालचाल नव्हती डोळे भिरभिरत होते..मी कुठेतरी वाचले होते ‘ते फुल […]

नाहीं विसरलो देवा

नाहीं रे मी विसरलो देवा तुजलो संसारात अडकलो, वेळ ना मिळाला ।।१।। तूंच गुंतविले, लक्ष्य मोहांत चित्त देण्या सांगितले, तुझ्याच खेळांत ।।२।। तुलाची हवे यश, तुझ्या खेळांतले माझ्या कौशल्यास, तूं मार्गदर्शन केले ।।३।। तुझ्याच साठीं, गुंतविले मन बनोनी सोंगटी, फिरे पटावरी ।।४।। काय दोष माझा, न दिले लक्ष्य मी खेळवण्यातील मजा, आलो तिला कामीं ।।५।। डॉ. […]

नदीच्या पाण्यातील ओंडके

अमेरीकेला कांही महीने राहण्याचा योग आला होता. मुलाकडे गेलो होतो. छोटेसे, सुंदर आणि अद्यावत शहर. नदीच्या तीरावर वसलेले सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य. फक्त एकच खंत जाणवत होती. ती म्हणजे मन मोकळे करुन गप्पा मारण्यासाठी कुणी मित्र नव्हते. येथील लोक त्यांच्या आपसांत देखील गप्पा मारताना दिसत नव्हते. बागेत एकटे वा एखादा लहानसा कुत्रा बाळगणे. कुणाशी ही न बोलणे. […]

अमेरिकेतील एक – – Dating Center

Dating ची संकल्पना ही वैचारीक आणि एका मर्यादेपर्यंत भावनिक स्वातंत्र्याला मान्यता देते.पाश्चिमात्य लोकानी त्यांच्या संस्कृती, सामाजिक, कौटूंबीक जडन घडन इतकी बदलून टाकली की त्या ठिकाणी कुणाच्याही विचारांना, भावनेला आणि म्हणून वागण्याला पायबंद राहात नाही. […]

दुःख कसे विसरलो

काय केले दुःख विसरण्याला मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला ।।धृ।। निराशेच्या काळांत दुःख होते मनांत हार झाली जीवनांत शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला ।।१।। मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला चूक राई एवढे दुःखाचा पर्वत पडे मनीं पश्चाताप घडे भोग भोगण्या, झालो तयार ।।२।। मुक्ति जमली नामीं आनंद आणण्याला एकाग्र चित्तांत जातां ध्यानांत डूबता आनंदात विसरुन गेलो […]

आनंदी किटक.

सहसा घर सोडून जाण्याचा प्रसंग येत नसे. त्यामुळे दैनंदिन चालणारय़ा गोष्टीमध्ये बाधा येते ही खंत. असेच १५ दिवस घर बंद करुन सर्वानाच गांवाकडे जाणे भाग पडले. आज घरी परत आलो. घर सारे कड्या कुलपे लाऊन बंद करुन गेलो होतो. दारे उघडताच एक उग्र वास दरवळत असल्याचे जाणवले. थोडीशी मोकळी हवा येताच सर्व हवेचे वातावरण पूर्ववृत होऊ […]

1 188 189 190 191 192 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..