Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

क्रौंच पक्षाला मुजरा

पौराणिक कथा सांगते. क्रौंच पक्षाची जोडी रासक्रिडा करीत असता, निषादाने नेम साधला व एकास घायाळ केले. तो तडपडू लागला. जवळून त्याच वेळी महान ऋषी वाल्मिकी जात होते. ते करुण दृष्य बघतांच त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते पद्य रुपातले होते. ” मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः यत् क्रौंचमिथुनादेकमवधीः काम मोहितम् ” (जगातले तेच प्रथम […]

मला भाराऊन टाकल याने

बी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक  लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन कथा. आणि वेगळाच संदेश जगाला देत निघून जातात. मी मला आवडलेल्या टीपण्या देत आहे. तूम्हीपण आनंद लूटा.
[…]

माना न माना !

हजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या खूप वाढत गेल्या.
[…]

शुर्पणखाची एक सुडकथा

सौंदर्याचा अभिमान, प्रचंड अहंकार, हट्टीपणा, आणि आवडलेली कोणतीही गोष्ट हस्तगत करण्याची जीद्द हे तीच्या स्वभावांत होते. एक गमतीची गोष्ट म्हणजे तीची नखे पसरट सुपाप्रमाणे होती ( winnow- like nails ). ती तिक्ष्ण होती. म्हणून तीचे टोपण नांव शुर्पणखा […]

श्री हनुमान जन्मकथा

श्री हनुमान जन्मकथा वंदन तुज मारुतीराया तुझा आशीर्वाद मिळाया न कळे कुणास तुझी माया भक्ताविना १ रुद्राचे तू रुप असता शक्तीची तू देवता अचाट कामे क्षणांत ह्या पृथ्वीवरी २ शक्ती बुद्धी नि सेवा ह्याचा तूं मुर्तीमंत ठेवा भक्तीभाव मनीं यावा हीच माझी इच्छा ३ शक्तीचे तूं दैवत बुद्धीदाता तूं होत शक्ती नि बुद्धी एकांत मिळे तुझ्या आशिर्वादे ४ हनुमंताची जन्मकथा आनंद होई सांगता चितीं समाधान देता तुमच्या ठायीं ५ अंजनी एक वानरी भक्ती तिची शिवावरी रात्रंदिनी भजन करी सदाशिवाचे ६ प्रभू भक्तीचा भूकेला पावन होई भक्ताला लक्ष देई शंकेला भक्तांच्या ७ भक्तीचा महिमा थोर सर्वांसी उघडे द्वार असेल नर अथवा वानर कुणासही पावत असे ८ अंजनीची पाहून भक्ति शिव प्रसन्न होती आशिर्वाद तिजला देती विश्वनाथे ९ अंजनी होती वानरी इच्छा ती करी तुम्ही यावे उदरीं लाभावा प्रभू सहवास १० […]

श्रीराम जन्म कथा

श्रीराम जन्म कथा श्रीरामाचा अवतार दुष्टांचा करण्या संहार जन्म घेतला पृथ्वीवर परमेश्वरानी //१// रामासी लाभले मोठेपण तयाठायीं तन मन धन अर्पिती सर्व भक्तजन प्रेमभरे //२// थोर ग्रंथ रामायण त्यातील जन्मकथा निवडून करीत असे अर्पण तुमचेसाठीं //३// लंकाधीपती रावण होता शिवभक्त महान उन्मत्त झाला वर पावून त्रास देई सर्वाना //४// युद्ध केले स्वर्गासी बंदी केले देवांसी छळूं […]

कविता स्फूर्ति

पूर्णपणें मज पटले आतां कविता कुणी करवून घेतो कोण असेल तो माहित नाहीं मजकडून तो लिहून घेतो घ्यानी मनीं कांहींही नसतां विषय एकदम समोर येतो भाव तयांचे जागृत होऊन शब्द फुले ती गुंफून जातो एका शब्दानंतर दुसरे आणि तिसरे, लगेच चौथे शब्दांची ती भरुनी ओंजळ माझ्या पदरीं कुणी टाकतो गुंफण करुनी हार बनता त्याजकडे मी बघत […]

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ? ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते. व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे. ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात वावरतात. कुटूंब वत्सल असतात. जीवन व व्यवहार ह्या दोन प्रमुख मार्गावर अनेक पदे सांभाळलेली. प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, अशा अनेक क्षेत्राचे अद्यावत ज्ञान मिळालेली असतात. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा योग्य फायदा समाजाच्या विकासांत व्हावा वा त्यांच्याकडून करुन घ्यावा ही अपेक्षा.
[…]

1 187 188 189 190 191 192
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..