नवीन लेखन...
Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

दसरा, कोजागिरी आणि आपले स्वास्थ्य

दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा हे अश्विन महिन्यातील महत्वाचे दिवस. आयुर्वेदाच्या दृष्टीनेही हे दिवस किंवा सण तसेच महत्वाचे आहेत कारण त्यांचा आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वाचा संबंध आहे. भाद्रपद महिन्यात गणपतीची धावपळ आटोपते आणि मध्ये १५ दिवस गेले की नवरात्र सुरु होतं .हा बदल होताना वातावरणही बदलत असतं ,पाऊस कमी होऊन हळूहळू परतीचा रस्ता धरतो आणि पिवळेधमक ऊन पडायला […]

हातानेच कां जेवावे ???

पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करून आजकाल लोकं हाताऐवजी चमच्याने जेवतात. आणि या प्रकारे जेवताना स्वत:ला श्रेष्ठ समजतात. मात्र आपल्या संस्कृतीमध्ये हाताने जेवण्याची पद्धत असून त्यामागे काही वैज्ञानिक कारणंदेखील आहेत. आयुर्वेदाप्रमाणे आमचे शरीर पंचतत्त्वांनी निर्मित झाले असून हाताच्या प्रत्येक बोटाच्या अग्रभागी एका तत्त्वाचे अस्तित्व आहे. अंगठा- अग्नी तर्जनी- वायू मध्यमा- आकाश अनामिका- पृथ्वी कनिष्का- पाणी जेव्हा आपण हाताने […]

पिताम / दादड येणे

अंगावर गांधी (दादड) उठून, अत्यंत त्रास देणाऱ्या अश्या “पिताम” बद्दल आज पाहुया. ह्या पिताम/दादड सोबत खाज येत असेल तर त्याला उदर्द, कोठ असे म्हणतात तर वेदना जास्त असल्यास आयुर्वेदात शीतपित्त असे नाव आहे. आधुनिक शास्त्रानुसार त्यास Urticaria म्हणतात. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वास हा रोग जडू शकतो, ह्या रोगात अंगावर अचानक गांधी (दादड) उठतात व अंगास खाज सुटते. […]

श्रावणमास आणि उपवास

श्रावणात जलधारा बरसत असताना सूर्य नारायण मात्र ढगांच्या आड रुसून बसतो. बाहेर ही अवस्था तर शरीरातील सूर्य नारायण म्हणजेच उदरस्थ पाचकाग्नी ही थोडा मंदच असतो, तो जड पदार्थ पचवण्यास समर्थ नसतो आणि तरीही असा आहार घडलाच तर मात्र अजीर्ण,अतिसार,ताप याला पर्याय नाही. जवळपास सर्वच जण याचा अनुभव घेतात.(म्हणूनच वैद्य वर्गात या महिन्यास सिझन असं म्हणतात. ) […]

डोक्याला ताप देणार्‍या उवा

उवा या कीटकवर्गात मोडतात. डोक्याचे केस, जांघेतले केस व कधीकधी पापण्यांचे केस यांच्या मुळाशी उवा अंडी घालतात. त्या अंडयांमधून लिखा बाहेर पडतात. उवा त्वचेच्या वरच्या भागात घरे करतात. त्यामुळे खूप खाज सुटते. डोक्यात एखादीही ऊ असली तरी खूप खाज सुटते. उवांची अंडी केसांच्या मुळांना चिकटून राहतात. उवा अस्वच्छतेमुळे व निकृष्ट राहणीमानामुळे एकमेकांत पसरतात. एकमेकांचे कपडे, पांघरूण, इत्यादी वस्तूंमार्फत, तसेच प्रवासात – शाळेत जवळ बसल्याने […]

मक्याच्या कणसाचे औषधी उपयोग

१. मक्याचं कणीस खाल्यामुळे दात मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलांना देखील मका खाऊ घाला. २. मक्याचे दाणे पूर्ण खाऊन झाल्यानंतर ते टाकून देऊ नका. मक्याच्या कणसाचे दोन तुकडे करा आणि मधल्या भागाचा नाकाद्वारे सुंगध घ्या. यामुळे सर्दी कमी होते. ३. मक्याचं कणीस खाऊन झाल्यानंतर त्याला वाळवून ठेवा आणि त्यानंतर त्याला जाळून त्याची राख गरम पाण्यात टाकून […]

1 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..