नवीन लेखन...

प्रेषित (कथा)

धर्मेन्द्रला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणल्यावर नर्स साफसफाई, औषध देण्यासाठी रूममध्ये आल्या. धर्मेन्द्रची कॉट खिडकीजवळच होती. त्यामुळे बसल्या बसल्या तो बाहेरचे पाहू शकत होता. मधूनच विमान धूर सोडत आवाज करत गेल्याचेही दिसू शकत होते.आवाज ऐकताच त्याला आठवले त्याने राधिकाला हाक मारली. […]

नकोशी (कथा)

मी जेमतेम पाच वर्षांचा होतो. शेजारपाजारच्या काकू, आजी, आत्या म्हणायच्या, ‘या वक्ताला पोर्गी होऊ दे मंजी शिवा ले राखी बांधाले भन भेटल.’ मलाही ते ऐकून वाटायचं की आपल्या घरात लहान बाळ आलं की किती मज्जा येईल. मला ती राखी बांधेल, भाऊबीजेला ओवाळेल, असा विचार मनात आला की सतत आईभोवती फिरायचो. […]

वाटणी (कथा)

प्रत्येक गावात दादा, काका, मामा, नाना अशा नावाने ओळखली जाणारी माणसे असतात. अशाच एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला सर्व गाव ‘आबा’ म्हणायचा. साऱ्या गावाचे ते ‘आबा’ होते.. […]

गेट टुगेदर (कथा)

स्पृहाचं म्हणणं ऐकून घेईपर्यंत अनिकेतने कॉल कट केलासुद्धा. दुपारपासून स्पृहाचं डोकं धरलंय त्यात कालच गुडघा सुजलाय. हल्ली थोडी जरी चाल पडली तरी सुजतो. मग घ्या पेनकिलर. मग अॅसिडिटी, अपचन, डोकेदुखी. गेल्या दहा वर्षात या सगळ्या दुखण्याची सवय कशी झाली नाही शरीराला असा स्पृहा स्वत:ला प्रश्न विचारी. […]

माय रेट्रो… व्हॅलेन्टाईन

ही कथा सुरू होत आहे १९७२-७३ च्या काळात… तो काळ हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या राजेश खन्नाचा. तो त्या काळचा सुपरस्टार आणि जोडीला चटपटीत गोल चेहऱ्याची मुमताज ही जबरदस्त हीट जोडी! ‘कटी पतंग,’ ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘सफर’, ‘आनंद’, ‘अपना देश’, ‘दो रास्ते’ सारखे जबरदस्त हिट सिनेमे देणारा आमचा हिरो राजेश खन्ना. जणू आमचे दैवतच! अपऱ्या नाकाची, फुगीर गोबऱ्या गालांची मुमताज साथीला आल्यावर सिनेमात प्रेमसरिता खळाळून वाहू लागायची. मग आमचा अवतारही काही वेगळा नव्हता… […]

नूतनीकरण

आठ-दहा दिवसांनंतरची गोष्ट. रविवारचा दिवस होता. मी दासबोधाचा क्लास संपवून घरी आले. दार उघडले तर समोरच एक मुलगा बसलेला होता. निळे जीन्स पँट आणि पिवळ्या-निळ्या चौकडीचा शर्ट त्याने घातलेला होता. पंख्याच्या वाऱ्याच्या झोताने हलके हलके उडणारे त्याचे सिल्की केस मस्त दिसत होते. […]

कोणीतरी आयुष्यात डोकावते तेव्हा…

आज शाळेचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. कारणसुद्धा तसेच आहे. शाळेसाठी तब्बल ८० लाख रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधांसह एक एकर क्षेत्रात शाळेची इमारत दिमाखात उभी आहे. आज शाळासुद्धा सर्वांसोबत त्या व्यक्तींची वाट बघत आहे जी व्यक्ती शाळेचे उद्घाटन करणार आहे. […]

कथे, सरिते, प्रिये… (कथा)

कथे, सरिते, प्रिये! तू एक आदिम सरिता आहेस. हजार वर्षांपासून तुझ्या काठानेच फुलत राहिले माणसाचे आयुष्य आणि भावविश्व. तुला प्राशून, मनामनावर तुझे सिंचन करून समृद्ध होत गेला माणूस! बहरत गेली त्याची संस्कृती हजारो वर्षे केवळ तुझ्यामुळे! […]

हेच खरे प्रेम! हाच खरा विश्वास (कथा)

संज्ञा आणि सुकृत बालसोबती. दोघांची घरे शेजारी शेजारी होती. त्यामुळे दोन्ही घरात छान एकोपा होता. एकाच्या घरात शिजले तर दुसऱ्याच्या घरी द्यावे एवढेच नाहीतर एकाला वेदना झाली तर त्याची सल दुसऱ्याला जाणवायची. अशा प्रेमळ आणि सुसंस्कारित वातावरणात संज्ञा आणि सुकृत वाढत होते. […]

ती पण एक सावित्री (कथा)

दहा वर्षे झाली, हरीष अंथरुणाला खिळला होता. जिवंत असून नसल्यासारखा. अर्धांगवायूच्या झटक्याने त्याच्या शरीराचा गोळा झाला होता. सर्व गरजांसाठी त्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. त्याला त्याच्या बायकोकडे रागिणीकडे बघून अतिशय दु:ख होत होते. मनात सारखे विचार यायचे माझ्याशी लग्न करून हिला कोणते सुख मिळाले. […]

1 9 10 11 12 13 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..