नवीन लेखन...

उगाच काहीतरी – ११ (भारतीय शालेय वर्ष – एक (रिकामटेकडा) विचार)

भारतातील शिक्षण व्यवस्था ही इंग्रजांनी बनवलेल्या प्रमाणे चालते आहे. त्यात आपले शालेय वर्षाचा कालावधी पण येतो जसं पावसाळा ते हिवाळा शाळा आणि उन्हाळ्यात सुट्ट्या. तसं पाहायला गेलं तर अशी रचना त्यांनी त्यांच्या सोयीसाठी बनवली होती त्याला माझ्या माहिती प्रमाणे एक प्रमुख कारण होतं भारतातील कडक उन जे इंग्रजांना सहन होत नव्हते. त्यासाठी ते भर उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी मुक्काम ठोकत आणि त्याच प्रमाणे त्यांनी शालेय वर्ष पण योजले होते. […]

उगाच काहीतरी – १० (एक प्रश्न आणि उत्तर)

“….. मग कसं चाललंय लाईफ ?” ….. ” समजा बायको ने तुम्हाला एक विशिष्ट भाजी आणायला सांगितली. तुम्ही बाजारात जाऊन ४ चकरा मारता पण तुम्हाला ती कुठेच दिसत नाही शेवटी कुठल्यातरी एक कोपऱ्यातल्या दुकानात तुम्हाला ती दिसते आणि काहीतरी मोठा तीर मारल्याच्या जोशात तुम्ही ती ५० रु किलो ने घेऊन येता आणि नेमका तुमच्याच बिल्डिंग खाली […]

उगाच काहीतरी – ९

शहराबाहेर जाणार्यांपैकी स्कूटरवर मी पण एक. अचानक समोरून येणारी ट्रॅफिक एकदम बंद झाली. माझ्यासारखे इतर आणि त्याचबरोबर या बाजूला असलेले पोलीस दादा पण बुचकळ्यात पडलेले. […]

उगाच काहीतरी – ८ (एंट्रन्स एक्साम्स , क्लासेस आणि पालक)

सूचना – इथे कोणावरही टीका करण्याचा किंवा सल्ला देण्याचा काहीही हेतू नाहीये. त्यावरून प्लिज कोणताही निर्णय घेऊ नये. मीना ची दहावी अर्ध्यात पोहोचली म्हणजे सप्टेंबर/ऑक्टोबर उजाडला आणि तिच्या पालकांच्या मोबाईलवर अचानक क्लासेसचे फोन यायला लागले. आमच्या क्लास ची स्कॉलरशिपची परीक्षा तुमच्या मुलीला द्यायला लावा म्हणजे तिचा आता पर्यंतचा अभ्यास कसा चाललंय तेही कळेल आणि त्या मार्क्सवर […]

उगाच काहीतरी – ७ (सर्कल ऑफ मॅरिड लाईफ)

त्या : अहो, हे हॅण्डल (किंवा जे काही इतर असेल ते) खराब झालंय जरा दुरुस्त करून द्या ते : रविवारी करतो. रविवारी….. ते : नाश्ता करून झालं की दुरुस्त करतो. ते : दुपारी दुरुस्त करतो. ते : आता थोडं पडू दे, संध्याकाळी दुरुस्त करतो. ते : उद्या ऑफिस वरून आल्यावर करून देतो. सोमवारी….. ते : रविवारी […]

उगाच काहीतरी – ६

अननस घेऊन आलेला शेठ जाताना बखोटयाला धरून तो काटेरी फणस घेऊन गेला आणि मी पुन्हा सलूनवाल्याच्या खुर्चीवर अर्धवट राहिलेली कटिंग पूर्ण करायला निवांत जाऊन बसलो. […]

उगाच काहीतरी – ५ (टिपिकल भारतीय गृहिणी)

टिपिकल भारतीय गृहिणी: ” अहो, तुम्हाला साधा चहा नीट करता येत नाही, चालले भाजी करायला. राहू द्या तुम्ही” ” तू राहू दे रे कार्ट्या, तू झाडू कमी मारशील आणि कचरा जास्त करशील. मलाच करावं लागेल” ” ताई, तू लादी पुसता पुसता दहा वेळा पडशील आणि कपडे धुणे तर राहूच दे जसेच्या तसे ठेवशील. मीच करते” ………आणि […]

उगाच काहीतरी – ४ (आमच्या आधीच्या पिढीचे दुःख)

आमच्या ओळखीचे एक मावशी आणि काका आहेत. दोघं ही रिटायर्ड शिक्षक. दोघंही उत्तम तब्येत राखून आहेत. मुलं माझ्याच वयाच्या आसपास. मोठा उमेश नोर्वे ला स्थायिक आहे आणि धाकटा राजेश हैदराबादला असतो. मुलं आमची लहानपणापासून मित्र. मावशी फेसबुक आणि व्हॉटसअप वर फुल्टू ॲ‍क्टिव. काका आपलं काहीतरी थातुर मातुर टाकत असतात जास्त करून या ना त्या पोस्टवर कॉमेंट […]

उगाच काहीतरी -३ (बिस्किट्स नॉस्टॅल्जिया)

हल्लीच दुकानात बिस्किटांचे विविध प्रकार पाहत होतो. किती प्रकार, किती रंग, किती फ्लेवर्स काय नि काय. अचानकपणे आमचे दिवस आठवले.
त्यावेळेस ही बिस्किटांचे बरेच प्रकार असावेत पण आमच्या माहितीत हेच मुख्य होते. […]

उगाच काहीतरी – २

सोशल मीडिया आल्यापासून काही नतद्रष्ट लोकांनी चंगच बांधलेला आहे की आपल्याला एक ही सण आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने करू द्यायचा नाही. हे लोक इतर वेळेस झोपलेले असतात पण एखादा सण आला की यांना जाग येते आणि मग पोस्ट सुरु होतात. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..