नवीन लेखन...

थोरांच्या ऐतिहासिक वास्तूंतून प्रेरणा

पुणे शहरात खासगी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करणार्‍या डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेजचा परिसर म्हणजे तर ज्ञानवंतांच्या वास्तव्याने पुनित झालेला परिसर होय. गोपाळ कृष्ण गोखले, रॅंग्लर परांजपे, रॅंग्लर महाजनी यांसारख्या अनेक ज्ञानी व व्यासंगी शिक्षणतज्ञांचे वास्तव्य व वावर या परिसरात झालेला आहे. येथील प्रत्येक इमारतीला वैभवशाली इतिहास व परंपरेची पार्श्वभूमी लाभलेली आहे. आईवडिलांच्या अशिर्वादाने मला या फर्ग्युसन कॉलेजचा आवारात तब्बल ८ वर्षे बंगला नं.१ म्हणजे, प्राचार्य आगरकरांच्या बंगल्यात राहण्याचा योग आला. त्या वास्तूतील रम्य आठवणी एकत्र करण्याचा हा प्रयत्न आहे.
[…]

रात्र राणी

अहाहऽआ काय सुंदर उद्यान ! उंच उडणारी कारंजी, पुष्कराणी, तर्‍हतर्‍हेची फुलझाडे – फळझाडे, थंडगार हवा दाट झाडांची सावली, पक्ष्यांचे मंजुळ कुंजन… मन उल्हसीत करणारा सगळा देखावा. जणू स्वर्गातलेच उद्यान असावे असा भास व्हावा.
[…]

भाव अंतरी उमलत होते…

दत्ता डावजेकर यांच्या संगीतसाजाने नटलेलं हे गीत डोळ्यांत पाणी उभे करते. किंवा

‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती

परि जयाच्या दहन भूमीवर नाही चिरा, नाही पणती…‘

त्याचप्रमाणे मनात राष्ट्रभक्तीची, मातृभूमीची, मायबोलीची ज्वाला तेजाने तळपत ठेवणारी गीते वेगळेच स्फुरण आणतात. अगदी वाचता क्षणी जीव

ओवाळून टाकायचीही तयारी व्हावी, इतकं वजन त्या गाण्यांतून असे.
[…]

1 174 175 176 177 178 184
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..